loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, January 23, 2026

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट लिहीत आहे कारण ती खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला गोष्टी सांगायला पण खूप आवडतात आणि मला तशाही गप्पा मारायला खूप आवडतात ज्यांच्याशी माझा जमतं त्यांच्याशी

रुक्मिणी ही कृष्णाची पहिली पत्नी म्हणून त्यांच्या महालामध्ये असताना पुढच्या लग्नाविषयीच्या गोष्टी घडल्या रुक्मिणीच्या आणि कृष्णाच्या विवाहाची स्टोरी मी नवीन एका पोस्टमध्ये वेगळी लिहील

सीमांतक मणी
तर जेव्हा कृष्णाचा आनंदी संसार चालू होता आणि कृष्ण एक प्रिय राजा म्हणून राज्य करत होता त्यावेळेस द्वारिकेच्या प्रजेमध्ये एका विशिष्ट गोष्टीविषयी चर्चा चालू होती ही गोष्ट म्हणजे एक अतिशय अनमोल रत्न ज्याला सीमांतक मणी असे म्हणले जात.
एका प्रजाजनाच्या शेतामध्ये हा एक जादुई मणी त्याला सापडला होता जो रोज त्याला अनेक आणि अनेक पटींमध्ये सोने देत असे आणि असा अतिशय अनमोल आणि दुर्मिळ म्हणी त्यांनी कृष्णाला द्यावा कारण कृष्ण हा त्या राज्याचा राजा आहे आणि सर्व संपत्ती त्याच्या अधिकारक्षेत्राखाली येते अशी चर्चा काही प्रजाजनांमध्ये चालू होती आणि अचानक हा जादूचा मणी चोरीला गेला आणि अर्थातच कृष्णाच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्याने या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यातील ठरविले आणि मी स्वतः या मण्याचा शोध घेईन असे त्याने आश्वासन दिले.

शोध घेता घेता निबीड अरण्यामध्ये कृष्ण एका विशिष्ट गुहे पाशी पोहोचला जेथून त्याला अत्यंत दिव्य प्रकाश आणि खूपच तेजस्वी आणि प्रखर प्रकाश त्या गुहेच्या द्वारातून बाहेर घेताना दिसला त्यामुळे कृष्ण ते लक्ष त्याकडे विशेष करून वेदले गेले आणि हा जादुई मणी नक्कीच या गुहेच्या आत मध्ये असेल अशी त्याची खात्री पटली त्याने या गुहेमध्ये जाऊन शोध घेण्याचे ठरविले

आत गेल्यानंतर अत्यंत दिव्य प्रकाश ज्या जादूच्या मण्यामधून येत होता तो जादूचा मणी देखील त्याला दिसला आणि तो मणी हातात घेतलेली एक अतिशय सुंदर तरुणी त्याला दिसली आणि अर्थातच प्रेमाची मूर्ती असलेल्या कृष्णाला पाहून ही तरुणी तक्षणी श्रीकृष्णांच्या प्रेमात पडली. आणि जादूच्या मण्याची मागणी करताना कृष्णाला देखील हे प्रेम जाणविले मात्र ह्या तरुणीने तरी देखील जादूचा मणी देण्यास नकार दिला आणि हा जादूचा मणी हवा असेल तर माझ्या बाबांची युद्ध करा असे तिने कृष्णाला सांगितले.
आणि लगेचच जांबुवंत कृष्णाशी युद्ध करायला तेथे उपस्थित झाले आणि नाव जर तुम्हाला परिचित असेल तर हे तेच जांबुवंत होते जे कृष्णाच्या आधीच्या जन्मात म्हणजेच श्री राम जन्मामध्ये त्रितायुगात श्रीरामाच्या बाजूने रावणाशी युद्ध करण्यास अत्यंत मोलाचे कार्यकर्ते ठरले होते. महापराक्रमी अस्वलाचे शरीर असणाऱ्या या जांबुवंताला जेव्हा श्रीकृष्णांनी हरविले तेव्हा त्यांना गतजन्मीच्या श्रीकृष्णांनी दिलेले म्हणजेच श्रीरामांनी दिलेले वचन पाठविले आणि त्यांच्या मनाची दिव्य खूण पटली आणि त्यांनी त्यांच्या श्रीरामांना ओळखले. श्रीकृष्णाने देखील हसूनच या सर्व गोष्टीची संमती दर्शविली. गेल्या जन्मीचे एक पत्नीनिष्ठ श्रीराम यांनी या जन्मी शक्य नाही परंतु पुढच्या जन्मी मी तुझ्याशी नक्कीच विवाह करेन असे वचन जांबुवंतांना दिले होते आणि प्रेमाने आधीच एकमेकांचे झालेल्या जांबुवंती आणि श्रीकृष्णांचे अशाप्रकारे जांबुवंतांनी लग्न लावून दिले आणि श्रीकृष्णाला त्यांची दुसरी राणी मिळाली.

अर्थातच श्रीकृष्णांनी हा मणी जांबवंतीकडून घेऊन त्यांच्या प्रजाजनाला परत केला तेव्हा त्यांनी अतिशय प्रसन्न होऊन आपली मुलगी म्हणजेच सत्यभामा हिला आणि ह्या अतिशय जादुई सीमांतक मण्याला देखील श्रीकृष्णांना समर्पण करण्याचे इपसीत बोलून दाखविले. पुन्हा एकदा श्रीकृष्णांच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या या अतिशय सुंदर यादव कन्येला श्रीकृष्णांनी आपली पत्नी म्हणून हसतच स्वीकारले आणि अशाप्रकारे श्रीकृष्णांना आपली तिसरी राणी मिळाली.

नरकासुराचा वध आणि पारिजातकाचा वृक्ष

अशाप्रकारे आपल्या तीन राहण्यांबरोबर सुखाने राज्य करत असताना देवलोकेंकडून श्रीकृष्णांना अतिशय आजीची विनंती करण्यात आली की त्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करावा कारण ब्रह्मदेवांच्या वरदान प्रमाणे कोणताही देव त्यांना मारू शकत नव्हता म्हणूनच मनुष्य रुपातील श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून पृथ्वीला आणि देवांना त्यांच्या त्रासातून मुक्त करावे असा प्रस्ताव सर्व देवांकडून श्रीकृष्णांकडे ठेवण्यात आला.

या प्रस्तावाला मान्यता देऊन धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण जेव्हा नरकासुराचा वध करण्यासाठी आपल्या गरुडावरून निघाले तेव्हा यादव कन्या सत्यभामा देखील कृष्णांबरोबर या युद्धामध्ये सामील झाल्या आणि त्यांनी देखील अतिशय मोलाची मदत केली ज्यामुळे नरकासुराचा वध शक्य झाला.
त्या सत्यभामा राणीचे हे साहस आणि पती निष्ठा बघून देवमाता आदिती या अतिशय प्रसन्न झाल्या आणि त्यांनी राणी सत्यभामेला चिरतारुण्य-वरदान दिले. स्वर्गातून विजयी होऊन द्वारकेस परतताना श्रीकृष्णांनी स्वर्गातील नंदनवन मध्ये असलेल्या पारिजातक वृक्षाचे एक फुल आपल्या लाडक्या रुक्मिणी राणीसाठी भेट म्हणून आणले आणि या फुलामुळेच देवलोकी मध्ये कोणीही कधीच वृद्ध होत नाही आणि नेहमीच चिरतरुण राहतात त्यामुळे ही अनमोल भेट आपल्या लाडक्या रुक्मिणी राणीसाठी देखील चिरतारुण्याचा एक अफलातून खजिना आहे हे श्रीकृष्ण जाणत होते आणि ही बातमी समजल्यानंतर सत्यभामा राणी दुःखी झाल्या आणि श्रीकृष्णांनी फक्त आपल्यावरच सर्वाधिक प्रेम केले पाहिजे या त्यांच्या भावनीला यामुळे फार मोठा धक्का बसला.

या सर्व प्रकारामुळे राणी सत्यभामा श्रीकृष्णांवर आणि त्यांनी अख्खा पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणण्याची श्रीकृष्णांकडे मागणी केली. देवराज इंद्र यांनी अर्थातच तो देण्यास नकार दिला आणि इंद्राचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णांनी मात्र त्यांच्याशी युद्धात जिंकून महादेवांच्या सहाय्याने पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणला आणि ह्या वृक्षाच्या सानिध्यामध्ये अत्यंत भाग्यकारी समजले जाणारे पुण्यक व्रत करण्याचा राणी सत्यभामा यांनी निर्धार केला.

सत्यभामेचे गर्वहरण

अत्यंत अहंकारी झालेल्या सत्यभामेला श्रीकृष्णांनी आपल्या हट्ट हा तर आजपर्यंत कधीही न घडलेली घटना घडवून आणली आणि देवलोकीचा वृक्ष आपल्या दारी आणला यामुळे राणी सत्यभामा ह्यांना अतिशय गर्व झाला होता.
आता भाग्यकारी पुण्यक व्रत केल्यामुळे संपूर्ण जन्म पतीचा सहवास त्यांना मिळणार होता आणि सर्व प्रकारच्या सुखाची या व्रतामुळे प्राप्ती त्यांना होणार होती त्यामुळे त्या अतिशय सुखावलेल्या होत्या.

श्रीकृष्णांनी नारदाला या गर्वहरणाचा बेत सांगितला आणि व्रताच्या ठिकाणी पुरोहित म्हणून उपस्थित राहण्यासाठी सांगितले. आपल्या स्वामींच्या ह्या खट्याळ बेतामध्ये अर्थातच नारद मुनी हसत हसत सहभागी झाले आणि त्यांनी सर्व व्रत राणी सत्यभामेला सांगितले आणि पुरोहित म्हणून संपूर्ण व्रताचा कार्यक्रम पार पाडला. अखेरी काहीतरी दान म्हणून द्यावे अशी राणी सत्यभामेला मागणी केली आणि त्यांना विचारले की तुमची सर्वात प्रिय गोष्ट काय आहे यावर राणी सत्यभामा सत्वर म्हणल्या की माझी सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे माझे पती श्रीकृष्ण आहेत. यावर नारद चतुराईने म्हणाले म्हणूनच तुमची सर्वात प्रिय गोष्ट तुम्हाला मला दान म्हणून द्यावी लागेल आणि श्रीकृष्णांचे दान तुम्हाला मला करावे लागेल या गोष्टीमुळे श्रीकृष्णाच्या तीनही राण्या चक्रावून गेल्या.

व्रत संपूर्ण झाल्यामुळे पुरोहितांना इच्छित दान द्यावेच लागणार होते आणि नाईलाजाने राणी सत्यभामेने आपली पती साक्षात श्रीकृष्णांचे दान, नारायणांचे दान नारदाला केले आणि सर्व जगाचे त्रिलोकीचे स्वामी नारद मुनींचे दास होऊन राहिले..!!!

कुठेही शोधाशोध केली श्रीकृष्ण महालात सापडेनात आणि जेव्हा सापडले तेव्हा नारद मुलींच्या आज्ञेवरून ते स्वयंपाक घरामध्ये कोथिंबीर मिरचीची वाटून चटणी करत होते ...!! 
हे पाहून मात्र श्रीकृष्णाच्या तीनही राण्यांना रडू फोटो फुटले आणि राणी सत्यभामेने आपले पती श्रीकृष्णांना या दास्यत्वातून मुक्त करण्याची नारद मुनींना विनंती केली.

यावर नाराज चतुराईने म्हणले सोपी गोष्ट आहे आपण श्रीकृष्णांच्या ऐवजी अशीच एखादी अमूल्य गोष्ट मला द्यावी आणि श्रीकृष्णांना या दास्यत्वातून सोडवून घ्यावे यावर राणी सत्यभामा अतिशय खुश झाल्या कारण त्यांना माहीत होते की त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. त्यांनी तक्षणी या विचारास संमती दिली आणि एका पारड्यामध्ये श्रीकृष्णांना बसवून त्यांच्याच इतके मोलाचे अनमोल रत्न सुवर्ण अलंकार सोने नाणे अशा अनेक मौल्यवान गोष्टींचे दान त्या नारद मुनींना करायला निघाल्या..!!!

सर्व त्रिलोकीचे स्वामी असणाऱ्या आणि साक्षात प्रेमाचे स्वरूप असणाऱ्या श्रीकृष्णांचे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे कसे मोल ठरवले जाईल इतकी साधी गोष्ट अहंकाराने भरलेल्या सत्यभामा राणीच्या मनाला स्पर्शही करून गेली नाही...!

मी त्यानंतर अतिशय चमत्कारी घटना घडल्या महालातील सर्व धनधान्य नायब रत्न आणि सर्व संपत्ती श्रीकृष्णांच्या शेजारील पारड्यामध्ये घातली तरी देखील श्रीकृष्णांचे पारडे जडच राहत होते आणि अखेरीस राणी सत्यभामा रडकुंडीला आल्या आणि हे पाहून श्रीकृष्णाने हळूच आपल्या लाडक्या रुक्मिणी राणी खुणेने काही समजावले.

श्रीकृष्णांचा हा प्रेमळ संदेश हसतच रुक्मिणींना समजून गेला आणि त्यांनी हळूच सत्यभामेच्या कानी सांगितले की श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असलेल्या अतिशय पवित्र अशा तुळशीचे एक देठ श्रीकृष्णांच्या शेजारील पारड्यामध्ये घालावे. त्या क्षणी फार मोठा चमत्कार झाला आणि श्रीकृष्णांची पारडे त्या पारड्याच्या समसमान उभे राहिले आणि हे पाहून राणी सत्यभामा चक्रावून गेल्या. 


सर्व महालांमधील अचाट संपत्ती इतकेच नव्हे त्यांच्या अंगावरील सर्व स्त्रीधन देखील त्यांनी श्रीकृष्णांच्या शेजारील पारड्यामध्ये घातले परंतु पारडे अजिबात हल्ले नाही आणि या एका तुळशीच्या देठामुळे पारडे समसमान कसे झाले. 
आणि आपले काहीतरी चुकते आहे अशी काहीतरी जाणीव त्यांना होऊन गेली आणि त्या क्षणी राणी रुक्मिणी या गोष्टीचा खुलासा केला. 

विश्वाचे स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णांची तुला या काही रत्न माणिक सोन्या नाण्याने कशी होईल...! आणि प्रेम ही तर सर्वात मोठी शक्ती आहे ज्या शक्तीमुळे परमेश्वर देखील आपले होतात आणि ते प्रेम ह्या तुळशीच्या देठामुळे परमेश्वरांना मिळाले आणि मग ही तुला संपन्न झाली. 
प्रेमाची तुलना प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाने कशी होईल...? प्रेमाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे कसे मापले जाईल..!! 


या सर्व प्रकारामुळे आणि गोष्टी लक्षात आल्यामुळे राणी सत्यभामीचा अहंकार निखळून पडला त्यांचे सौंदर्य त्यांची युद्धनीती आणि कौशल्य तसेच चिरतारुण्याचा देवमाता आदिती यांचा आशीर्वाद या सर्व गोष्टी असून देखील खरे प्रेम त्यांना समजले नव्हते जे श्रीकृष्णांनी आपल्या या लिहिले मधून त्यांना दाखवून दिले आणि गर्व,मागणी या गोष्टीचे खऱ्या प्रेमामध्ये काहीही स्थान नाही हा एक अतिशय मोलाचा संदेश सर्व संसारासाठी श्रीकृष्णांनी तेथे दिला. 

खरे प्रेम हे निखळ प्रेम असते जिथे फक्त आणि फक्त देणे असते प्रेमामध्ये सर्वस्व समर्पण महत्त्वाचे असते प्रेमामध्ये कोणताच अहंकार कोणतीच अपेक्षा कोणतीच मागणी कोणताही व्यवहार कधीच असू शकत नाही. कृष्णांनी अशाप्रकारे पुन्हा एकदा प्रेम म्हणजे काय हे साऱ्या जगताला दाखवून दिले या प्रेमाशिवाय आज कलियुगामध्ये देखील अनेक लोकांची आयुष्य ही अपुरी आहेत आणि हे कळण्यासाठी श्रीकृष्णांचा धावा करणे हा फार सोपा मार्ग आहे. 

खरे प्रेम शाश्वत असते जन्म मृत्यूच्या बंधनांच्या पलीकडे असते प्रेम विश्वाच्या कणाकणामध्ये आहे ते स्त्री-पुरुषांमध्ये आहे ते माता आणि पुत्रामध्ये आहे.
ते आपल्या आजूबाजूच्या सर्व पशुपक्षांमध्ये आहे निरभ्र आकाशामध्ये आणि रात्रीच्या चमचमणाऱ्या तारकांमध्ये आहे या सूर्यामध्ये या चंद्रामध्ये आहे या संपूर्ण विश्वामध्ये फक्त आणि फक्त प्रेम आहे. प्रेमाची ही व्याख्या ज्याला कळली समजली त्याचे आयुष्य प्रेमाचे होते आणि परमेश्वराच्या हृदयामध्ये त्यांना कायमस्वरूपी प्रेमाचे स्थान मिळते. 

Thursday, October 30, 2025

पृथ्वीवर कलियुगाचे आगमन याची कथा - पौराणिक

राजा परीक्षित जो कृष्णाचा नातू आणि अभिमन्यू चा मुलगा होता तो एकदा जंगलात फिरायला गेला असताना त्याला काळा पुरुष दिसला त्यांनी त्याला विचारले असता तो म्हणाला की मी कलियुग आहे आणि काळाच्या आज्ञेनुसार मी पृथ्वीवर दाखल झालो आहे तेव्हा परीक्षिताने आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला
धर्माचा विनाश करणाऱ्या खलीला पृथ्वीवर घेण्यापासून मी थांबवेल असे राजा परीक्षित निर्धाराने म्हणले आणि कली त्यांना अखेरीस शरण आला आणि काही सीमित जागा परीक्षेत राजाने आपल्याला द्याव्यात अशी त्याने शरणागत म्हणून प्रार्थना केली व परीक्षित राजाच्या जीवनकालापर्यंत तो स्वतःला या विशिष्ट जागांमध्ये निर्धारित करून ठेवेल असे त्यांनी सांगितले. 


शरणागत आलेल्या कलीला परीक्षेत राजाने चार जागा सांगितल्या. 
जुगार मद्यपान परस्त्रीसंग हिंसा येथे अनुक्रमे असत्य मद काम आणि निर्दयता हे चारधर्म आहेत म्हणून तू तिथेच राहा. जागा अत्यंत सीमित असल्याने कलीने अजूनही एक जागा मागितली तेव्हा परीक्षेत राजाने त्याला धनामध्ये रजगुणाचा वास असल्याने तो सोन्यातही राहू शकतो असे सांगितले. 

तर क्षणी राजाच्या मुकुटामध्ये सोने असल्याने कलियुग त्या सुवर्ण मुकुटावर बसून हसू लागले त्यादिवशी परीक्षेत शिकाऱ्याच्या शोधामध्ये भटकले परंतु त्यांना शिकार मिळाली नाही संध्याकाळी थकून भागून ते शौमिक ऋषींच्या आश्रमात पोहोचले ऋषी समाधीत असताना तहानेने व्याकुळ परीक्षित राजाने त्यांच्याकडे पाण्याची मागणी केली.

राजमुकुटात मुकुटात बसलेल्या कलियुगाच्या प्रेरणेमुळे राजाची सात्विक बुद्धी भ्रष्ट झाली आणि समाधीस्थ ऋषींनी आपल्याकडे लक्ष न दिल्यामुळे परीक्षेत राज्यात त्यांना मारून टाकावे अशी बुद्धी झाली परंतु पूर्व संस्कारांमुळे परीक्षेत राजाने स्वतःच सावरले.. 

रागावून त्यांनी एक मेलेला शाप महर्षी शोमिक यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि कलियुग हसू लागले. ऋषींचा मुलगा ऋषीशृंग अत्यंत तेजस्वी होता आणि नदीच नाम करताना त्याच्या इतर आश्रमातील मित्रांनी त्याला घटना सांगितलं. आपल्या पित्याचा अपमान झालेला सहन होऊन तात्काळ त्याच नदीतील पाणी हातात घेऊन या तेजस्वी बालकाने या राजाला शाप दिला की तो आज पासून सात दिवसानंतर तक्षक नागाच्या शापाने मृत पावेल आणि कोणीही हा शाप बदलू शकत नाही. 

ध्यानात असलेल्या ऋषींना परिस्थिती लक्षात येतात त्यांनी डोळे उघडले परीक्षित सारखा  राजा पुन्हा कुठे मिळेल या काळजीने राजा परीक्षितकडे स्वतः जाऊन याविषयी माहिती दिली.

उरलेल्या सात दिवसांमध्ये परीक्षित राजाने सर्व सुखांचा त्याग करून मनविरक्त करावे तसेच आपल्या कुटुंबीयांची सोय करावी व आपल्या गुरूंना भेटून केवळ सात दिवसांमध्ये असे काय करता येईल जेणेकरून पुण्यातमा परिक्षित राजाला ज्याप्रमाणे पृथ्वीवर मान सन्मान उत्तम स्थान मिळाले त्याचप्रमाणे परलोकामध्ये देखील उत्तम स्थान मिळेल व त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल याची त्यांनी सोय करावी असे ऋषींनी स्वतः भेटून राजाला सांगितले.

यानंतर राजाने आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार महर्षी व्यासांचे पुत्र शुक्र यांच्याकडे भागवत कथा ऐकण्यासाठी धाव घेतली. कलियुगामध्ये जेव्हा धर्माचा केवळ एकच चरण शिल्लक राहील तेव्हा भागवत पुराण ऐकल्यानेच भक्तिमार्गाने मनुष्याला मुक्ती मिळू शकेल असे त्यांच्या गुरुंनी सांगितले. यानंतर संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र त्यांनी भागवत कथेच्या रूपाने श्रवण केली केले आणि परीक्षित राजाच्या मृत्यूनंतर कलीने पृथ्वीवर आपले स्थान अधिकाधिक बळकट करण्यास सुरुवात केली.
..........
अर्थातच कलियुगाच्या आगमनाने द्वापार युगाचा अंत झाला. सत युगानंतर त्रेता युग अवतारीले जेव्हा श्रीराम रूपाने तर त्यानंतरच्या द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण रूपाने महाविष्णूंनी अवतार घेऊन पृथ्वीवरील जीवनाविषयी मानवाला महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. आपण कलियुगामध्ये जगत असून कलियुगाच्या अखेरीस मोठा महाप्रलय होऊन पुन्हा सर्व पृथ्वी आणि विश्व निर्माण केले जाईल जेणेकरून सर्व पापाचा आणि अधर्माचा नाश होऊन विष्णूचा कलकी अवतार पुन्हा एकदा धर्माची स्थापना करून सतीयुगाचा प्रारंभ करतील.
...........
ही अतिशय सुंदर कथा रामानंद सागर कृत श्रीकृष्ण या टीव्ही सिरीज मध्ये सुरुवातीला सांगण्यात आली आहे जी मला आवर्जून येथे नमूद करावी आणि सजग वाचकांना देखील उपलब्ध करून द्यावी असे वाटले म्हणून येथे लिहिली आहे अभिप्राय जरूर कळवावा. 

Monday, June 16, 2025

मोठ्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अनुभवानुसार शिकत जातो देव आपल्याला शिकवत जातो यामध्ये काही गोष्टी ज्या आपली मोठी माणसं आपल्याला सांगायची त्या गोष्टी खऱ्या आहेत हे मला समजलं त्या गोष्टी मी इथे लिहीत आहे ज्यांनी अनेकांना झाला तर फायदा होईल.


            Pic Curtsy kkhh movie media
आणि प्रत्येक घरामध्ये जनरेशन गॅप असते कारण माणसाच्या अब्रिंग पासून त्याच्या आयुष्यातील अनुभव हे त्या माणसाचे विचार ठरवतात जे दोन जनरेशनचे अर्थातच वेगळे असतात कारण आजच्या जगात तर अनेक नवीन गोष्टी फार पटापट येत आहेत आणि आपण बघितलं तर वर्षभरामध्ये मोबाईल फोनची फार अप्रतिम मॉडेल्स आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये खूप पटींनी प्रगती दिसते कशाच अनेक गोष्टी आणि बदल काळानुसार झालेले असतात ज्यानुसार नवीन पिढी तयार झालेली असते आणि यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी आपण नेहमी सर्व बाजूंनी मिळणारा ज्ञान आणि सकारात्मकता घेण्यासाठी ओपन राहायला हवं मग ती आपल्यापेक्षा मोठे किंवा लहान कोणापासूनही मिळू शकते हे प्रत्येक वयाच्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि इतकं समजूतदार घरातील सर्वच व्यक्ती नसतात काही व्यक्ती वाईट देखील असतात काही व्यक्ती कमी जास्त इमोशनल असतात आणि मुळातच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो त्यानुसार काही फ्रिक्शन घरामध्ये घडत असतात आणि हे नवीन नाही हे प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतात

ज्या वयोगटामध्ये आपला हे लक्षात येतं त्यावेळी आपल्याला हे हँडल करून खूप कठीण जातात कारण हे नव्याने आपल्याला समजत असतं आणि आपल्या मनातील आई-बाबा किंवा तत्सम काका काकू ह्या इमेज ज्या लहानपणी आयडियल आहेत असं आपल्याला दाखवण्याचा हे सगळे प्रयत्न करतात जो चांगल्यासाठी पण असतो ज्यामुळे आपल्या मनात या सर्वांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो त्या इमेज बदलायला जातात आणि आपण माणूस म्हणून या सगळ्यांना बघू शकतो त्यामुळे अशावेळी सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे तुमच्याच बाबतीत होत नाहीये हे सगळीकडे चालू आहे आणि हे योग्य वेळी समजलं नाही तर आपण खूप मोठ्या टेन्शनमध्ये असतो कारण त्यावेळी आपण प्रीपेर नसतो पुढच्या आयुष्यासाठी किंवा आपल्याला या घटना या गोष्टी नॉर्मल आहेत हे समजत नाही म्हणून आपल्या मनावर बराच आघात होण्याची शक्यता असते.

सर्वात पहिल्यांदा आनंदी कौटुंबिक आयुष्यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया
1. प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टी असतील तीच नाती ठेवावीत बाकी कुठेही भरकटू नये मग ती कुटुंबातील असतील किंवा कुटुंबा बाहेरील कम्युनिटी कॉन्टॅक्ट असले तरीसुद्धा
2. प्रेम म्हणजे परमेश्वर आहे आणि खरे प्रेम मिळणारा निश्चितच सुखी होतो
3. आपण अतिशय शुद्ध आचार विचार ठेवून देव भक्ती करत चांगल्या मार्गाने आयुष्य जगावे आणि जमेल तितकी आडलेल्यांना मदत करावी.
4. माणसाने आपले मन आणि बुद्धी नेहमी चांगल्या कामांमध्ये व्यस्त ठेवावी आणि कोणत्याही उद्दिष्ट शिवाय कधीही बसू नये. आपल्याला योग्य ते उद्दिष्ट आयुष्यात प्रत्येक वळणावर स्टेट केले पाहिजे आणि त्यानुसार आपल्या आचरण असले पाहिजे. 
5. आपल्याला आवडतील अशा गोष्टी नेहमी करत रहाव्यात. अर्थातच त्या गोष्टी दुसऱ्यांना त्रास देणे दुसऱ्यांना कमी लेखणे कोणाशी तुलना करणे आणि कुणालाही हानी पोहोचवणे अशा असू नयेत. कशामुळे आपण दुसऱ्यांकडून अखंड अपेक्षा करत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा त्यांचा आयुष्य जगण्याची स्पेस आपल्याला देता येते. 
6. आपण स्वतः परमेश्वराची भक्ती करून ताकदवान व्हावे आणि आपल्या कुटुंबातील साऱ्यांच्या आयुष्यातील आपल्या भूमिका चोक निभावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करावा आणि बाकी परमेश्वरावर सोडावे. 
7. चांगले आणि वाईट दिवस हे ऋतूप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अधिक वाईट वाटून घेऊ नये आणि अति आनंदामध्ये हुरळूनही वेडे वागू नये. 
8. संकटकाळी एकटे राहून परमेश्वराची उपासना करावी संकट कधीही उपसरवू नयेत आणि आनंद सुद्धा साजरा करताना केवळ योग्य व्यक्तींबरोबरच साजरा करावा कारण सर्व व्यक्ती आपल्या आनंदामुळे आनंदी होत नाहीत हे या जगात एक कटू सत्य आहे. 
9. महाभारतामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकच कुटुंबामध्ये काही प्रेमाची आणि काही फक्त हिशोब चुकविण्याची नाती असतात म्हणूनच ते आपल्या आयुष्यात कुटुंब म्हणून येऊ शकतात तरी प्रेमाची नाती ओळखून धर्माच्या मार्गावर चालावे आपले आणि परके कोण हे देव योग्य त्या वेळेला दाखवतो ज्याला आपण ज्योतिषामध्ये शनीची साडेसाती महादशा अशा व्याख्या मध्ये ओळखतो
10. वाईट घटना चटकन विसरून चांगली शुभ घटना करावी घरातील वातावरण कधीही खराब होऊ देऊ नये वाईट गोष्टींची चर्चा सुद्धा करू नये आणि कधीही आलेल्या अनुभवावरून संपूर्ण आयुष्य किंवा जगच वाईट असा आंबट तोंड करू नये कारण शेअर बाजार जसा वर खाली जातो तसाच आयुष्य सुद्धा ऊन पावसाचा खेळ आहे हा आयुष्याचा स्वभाव आहे आणि तो समजून घेतला तरच आपण हे आयुष्य जगू शकतो. 


आता मी अशा गोष्टी लिहीत आहे ज्या जुनी लोकं आपल्याला नेहमी सांगत आणि आपण देखील आपल्या पुढच्या जनरेशनला लहान असतानाच चांगलं फार गरजेचे आहे एकतर ते त्यांना समजते किंवा वाईट अनुभव आल्यामुळे त्यांना हे धडे मिळतात प्रत्येकाला एखादी गोष्ट कशी सांगायची ते देव ठरवतो. 
***** कोणतीही शुभ घटना मंगल कार्य घडण्याच्या आधी कोणालाही सांगू नये घडल्यानंतर आवश्यक त्या व्यक्तींना सांगावे. 
******* कृपा करून सोशल मीडिया च्या नादी लागणे त्याच्या आहारी जाणे त्याचा अतिरिक्त आणि गैरवापर आणि त्याचा आपल्या मनावर होणारा अतिशय गैर परिणाम ह्यांपासून प्रत्येकाने जपावे ही गोष्ट आनंदी कुटुंब व्यवस्थेसाठी अतिशय गरजेची आहे आजच्या काळामध्ये. 
******* सर्व गोष्टी आजकाल आपल्या भारतामध्येच सोशल मीडिया वरती काही लोक शेअर करत असतात ज्यांनी प्रचंड फटकेही त्यांना बसतात आणि मला अशा अनेक केसेस माहित आहेत तरी प्रत्येक गोष्ट ही लोकांना दाखवायची नसते आणि त्याचा शो बिजनेस करायचा नसतो ही गोष्ट ज्यांना आनंदी वैवाहिक आयुष्य आणि सुखी कौटुंबिक आयुष्य हवे आहे त्यांनी पाळावे. 

1. घरातील गोष्टी बाहेर जाऊ नये इतक्या हळू आवाजात बोलावे कारण भिंतीला कान असतात
2. कामवाली भांडीवाली घरात आल्यानंतर घरातल्यांनी तोंड बंद ठेवावे आणि घरातली जी स्त्री तिला हँडल करत असेल तिने तिच्याशी हळू आवाजामध्ये सर्व काम झाल्यानंतर तिच्या काही समस्या असतील तर त्याविषयी बोलावे आणि त्याच पद्धतीने पहिल्यापासून तिला सवय लावावी. 
3. नेहमी आपल्यासारख्या लोकांमध्ये राहावे आपल्या  बरोबरीच्या लोकांमध्ये राहावे. यामुळे आपल्या आजूबाजूचे घरातले वातावरण आपल्या परंपरा आपल्या समजूती आपले अनेक बाबतीतले विचार असल्याने आपण व्यवस्थित राहू शकतो आणि आपल्या समस्या आणि आपले फायदे आनंद जीवन जगण्याची पद्धती एक असल्यामुळे डोक्याला ताप नसतो मत भिन्नता आली किंवा वाईट विचार आले तर घरातील सगळ्यांची डोकी फिरायला वेळ लागत नाही
4. तिन्ही सांजाच्या वेळेला घरात असावे तुळशीपाशी दिवा लावावा आणि धार्मिक गोष्टी जसे की धूपदीप कुलदेवी कुलदेवी यांचे कुलाचार हे व्यवस्थित पार पाडावेत. 
5. फॅमिली आणि इतर कॉन्टॅक्ट यांच्यामध्ये बॅलन्स साधावा आणि कोणाशी काय बोलावे हे समजणे म्हणजे विवेक बुद्धी असते जी फॅमिली असो किंवा बाहेरचे कॉन्टॅक्ट सर्वांच्याच बाबतीत आपल्याला वापरली पाहिजे. 
6. प्रत्येकाची रोजची देवाची उपासना ही झालीच पाहिजे आणि ती तुम्ही काय करता हे सर्व लोकांना अजिबात सांगू नये. 
7. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आनंदाने साजरा कराव्यात घरामध्ये त्यामुळे अतिशय आनंदी वातावरण राहते आणि अधिकाधिक चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. 
8. काही माणसे अतिशय वाईट विचारांची दुसऱ्यांना चिकटणारी दुसऱ्यांना त्रास देणारी वाईट बोलणारी दुसऱ्याला कमी लेखणारी दुसऱ्याला नेहमी कॉपी करणारी दुसऱ्यांशी स्वतःची आणि सगळ्यांचीच एकमेकांशी तुलना करणारी अशा अनेक त्रासदायक पद्धतीची असू शकतात अशांपासून अजिबात न बोलता लांब राहावे. 
9. हे माझ्या आजोबांचं खास वाक्य जे तर मला नेहमी सांगायचे नेहमी माणसाने गोड बोलावं त्यामुळे त्याची निम्म्यापेक्षा जास्त काम होतात 😊🧿
10. दुर्लक्ष करणे हे जमलेच पाहिजे आणि अनेक गोष्टींकडे आयुष्यात आपल्याला दुर्लक्ष करावे लागते कारण प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्ट सुधरवण्याचा आपण एकट्याने ठेका घेतलेला नाही अखिल विश्वाचा लावणाऱ्या देवावर ते सोडून द्यावे रात्री झोपताना देवाला सर्व गोष्टींचा रिपोर्ट द्यावा आणि आपण देवावर सोपवून निर्धास्त झोपावे. 
12. तोंड बंद ठेवल्याने आयुष्यात चमत्कार होतात हे 100 वर एक टक्का सत्य आहे आणि माझ्या आयुष्यामधील काही कठीण टप्प्यावर हे केल्याने अक्षरशः मी खूप चांगल्या पद्धतीने हे सांगू शकते याने असे चमत्कार होतात ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. 
13. आपल्याशी कोणी बोलत असेल तर तर ते खूप छान ऐकून घ्यावे त्यामुळे सुद्धा समोरच्याला खूप छान वाटते बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या त्यांना यामुळे समजतात असं माझ्या बाबतीत सुद्धा होतं आणि काही विशिष्ट व्यक्तींची बोलणे हे आपल्याला आपल्यातूनच प्रश्नांची उत्तरं देत जातात आणि आपण कोणाबरोबर आहोत या गोष्टीमुळेच त्या माणसाला इतके बळ मिळते की त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या तो स्वतःबरोबर हँडल करतो त्यामुळे चांगल्या व्यक्तीला आपण सपोर्ट देऊ शकलो तर ही खूप छान गोष्ट असते
14. कोणतीही गोष्ट अति ताणू नये आणि अति समजूतदार कोणत्या बाबतीत असू नये. 
15. कोणत्याही अशुभ व्यक्ती गोष्ट घटनेचे नाव किंवा त्याविषयी चर्चा अजिबात करू नये. 
16. तिन्ही सांजेला देवापाशी दिवा लावून रामरक्षा सारखी स्तोत्र अवश्य म्हटली जावीत आणि घरात विष्णुसहस्त्रनाम रामरक्षा अशी स्तोत्र मुद्दाम मोठ्या आवाजात अवश्य लावावी. अजून एकदा तरी हे केले तरी संपूर्ण घराला त्यामुळे दैवी सुरक्षा प्राप्त होते. 
17. पितृ शांती श्राद्ध अशा गोष्टी आपल्या पितरांसाठी प्रत्येकाने अवश्य कराव्यात. 
18. आपले वर्षभराचे ठरलेले धार्मिक शेडूल प्रत्येकाने पाळावे ज्यामध्ये अनेक गोष्टी जसे की श्रावणामध्ये तिन्ही सांजेला कहाणी वाचणे ते कृष्ण जन्माच्या रात्री सगळ्यांनी मिळून काला करून कृष्णाची भक्ती करून त्याची मजा  चाखणे असो, अशा गोष्टी अवश्य कराव्यात ज्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीच राहते. कुटुंबातील विविध वयोगटाच्या विविध स्वभावाच्या व्यक्तींना प्रेम श्रद्धा आनंद या गोष्टी आपोआपच एकत्र आणतात आणि प्रेमामध्ये गुरफटून ठेवतात. 
19. जर कुटुंबासाठी कोणी आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांचे अवश्य ऐकावे आणि सरांनी साऱ्यांचे कल्याण करून घ्यावे. 


मुळातच घरातील वातावरण हे आनंदी असावे आणि प्रेम विश्वास मजा मस्तीत असावे योग्य त्या गोष्टी लहान मुलांना छान समजावून सांगाव्यात त्यांच्या भाषेमध्ये जेणेकरून त्यांना त्या पटतील आणि मोठ्यांच्या अनेक गोष्टी दुर्लक्ष करून त्याविषयी आपल्या जनरेशन नुसार चालू काळानुसार च्या गोष्टी आपण करत आपली प्रगती खुंटवू नये उदाहरणार्थ एका मुलीशी आज बोलले तेव्हा तिने सांगितल्याप्रमाणे एटीएम कार्ड वापरण्याविषयी देखील त्यांच्या ासू-सासर्‍यांना आजच्या जगातही सिक्युअर वाटत नाही आणि अशा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात ज्या इतक्या बारीक असतात म्हणूनच त्याचा खूप त्रास होतो तर त्याच्या त्याला समजतात जेव्हा आपण देवाची उपासना करतो त्यामुळे ती चालू ठेवावी

मला वैयक्तिक रित्या असे वाटते की हळदीकुंकू साऱ्यांनी मिळून वडाला जाणे नवरात्राच्या वेळेस भोंडला करणे अशा काही बायकांच्या गोष्टी अगदी व्यवस्थित साऱ्यांनी चालू ठेवाव्यात म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही पती-पत्नींच नातं अधिक फुलायला मदत होते. 

जगामध्ये अनेक विचित्र गोष्टी भरलेल्या आहेत कारण हे संपूर्ण विश्व मायावी आहे आणि आपण या मायेमध्ये न ओळखता परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंदर सर्व चार आश्रम जगावेत आणि कधी गरज लागली तर रामायण महाभारत गीता अशा ग्रंथांचा जरूर अभ्यास करावा आपल्याला योग्य ते उत्तर नक्की मिळते. 

आवडते इतके या लेखासाठी पुरेसे आहे मी सुद्धा अनेक गोष्टी शिकले आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये लोकांना मदत करण्याविषयीच्या काही गोष्टी मी शिकले या गोष्टी मला नक्कीच उपयोगी पडतील कारण त्या माझ्या आधीच्या विचारांपेक्षा पूर्ण वेगळ्या गोष्टी मला अनुभवाने आणि देवाने शिकवल्या तरी या लेखामुळे अनेकांना रिलीफ मिळू दे त्यांचं टेन्शन जाऊ दे आणि आनंदी आयुष्य जगण्यात आली त्यांना एक मैत्रीपूर्वक छान गप्पा मारल्या सारख्या मस्त सूत्र सांगितल्यासारख्या या लेखाने फायदा होवो अशी परमेश्वरा चरणी प्रार्थना
❤ 




Friday, May 23, 2025

हे सही आहे ! :) लेखन - वाचन ..

 मी ब्लॉग लिहिला इथे , परवाची पोस्ट .  बरं वाटतंय ... लेखन वाचन आपल्याला आपल्या विश्वात आणून सोडते आणि आपण वेळेचा पण छान उपयोग करतो .  नाहीतर सतत बाहेर काहीतरी शोधत राहतो .  

१ . कुठे थांबायचं हे प्रत्येकासाठी वेगळं असतं आणि ते ज्याचे त्याला समजले पाहिजे . आणि आपापल्या स्वभावानुसार आपण आपल्याला छान वाटेल ते करत राहावे .  

२ . आपल्या स्पेशल विश्वाचा ऍक्सेस स्पेशल लोकांना असावा आणि असे खास लोकं आपल्या आयुष्यात असावेत .  

३ . मला वाटतं , कोणाशी बोलल्याने किंवा युट्युब करून आपण ते सगळं बाहेर टाकून देतो .  लिहितो तेव्हा ते सुंदर मऊ मुलायम विश्व आपल्या भोवती थंडीतल्या शालीसारखं गुरफटून राहतं आणि त्या भावविश्वात आपण सुखाने जगतो 

४ . डोकं शांत राहतं लिहिताना आणि लिहिल्यावर .  मग सुचत जातं अजून काही ,  काय करावे वगरे आणि गोष्ट पुढे जाते .  बोलून आपण तिथेच अडकतो आणि कोणाशी बोलले तर त्याला पण प्रोब्लेमच्या त्याच टप्यावर आणून उभे करतो.  :)

५ . आपल्या बेस्ट लोकांशी गप्पा मारायला मला पण खूप आवडते ,  पण त्यासाठी आपला विचारमंथन होऊन आपण रेडी असलो तर मजा येते .  



माझे अपडेट्स -

मला आयुष्यात ह्या वळणावर आपले परके कळले .  त्यामुळे फायदाच असतो .  पण कळण्याची दैवी योजना धक्कादायक आणि संकटासारखी भासते .  पण हे शहाणपण म्हणजे सुखी आयुष्याची गुरुकिल्लीच नव्हे का . .! 

मला हे पण समजले ,  की अनेकदा काही प्रेमाच्या लोकांनी सहज काही छान क्षण मला दिले , माझ्या लक्षात पण नाही आले .  म्हणूनच ,  ह्या अनुभवांना मी थँक्स म्हणेन .  जिथे असं नसतं ते ओझरतं का होईना बघितलं आणि जे आहे ते अनमोल आहे हे समजले :) म्हणजे मी परीक्षा वगरे तत्सम आयुष्यात व्यस्त होते . हे लोकं छान वागले मी पण .  आम्ही मजा केली .  तेव्हा त्यात काही विशेष आहे मला समजले नाही .  आज समजले .  


आयुष्यात प्रेमाच्या माणसांना जोडायचे मी पुन्हा ठरवले आहे :) मी शिकलेले अनुभवाचे आणि शहाणपणाचे धडे ह्यातही माझे मार्गदर्शन करतील .  हेल्थी बाउंड्रीज दोन्ही पक्षांच्या दोन्ही पक्षाने पाळाव्या .  प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर सारी नाती असावीत .  सिक्रसी फार महत्वाची. आणि आपल्या खास लोकांना हे फक्त जाणवून द्यावे की तुम्ही स्पेशल आहात माझ्यासाठी .  सर्व लोकांबाबत आणि निगेटिव्ह लोकांबाबत हे करू नये .  लांब राहावे .  आपले आयुष्य प्रेम ,  शांततेने जगण्याचा आपल्याला अधिकार आहे साऱ्यांनाच ..हेहे.. :) बरं , तर इथे उल्लेखित एक स्त्री असून त्यांच्याशी मी काही कालांतराने बोलण्याचे ठरविले आहे . सिक्रेट गप्पा :)

मी देवप्रेमी आहे ,  देवाने खूप प्रेम केले आणि पदोपदी माझ्याबरोबर राहिला .  म्हणून आज मी इथे पोहोचले .  बरेच काही हॅन्डल करून .  पण हे सही आहे ...  :)

ह्याआधी मला हे इतके समजले नव्हते .  कोणाच्या बरोबर राहणे ...ह्यात आमूलाग्र बदल झाला माझ्या आयुष्यातील घडामोडींमुळे .  मी तशी प्रेमी , आळस हा माझा मित्र आहे हे ब्रीदवाक्य पाळणारी. हेहे ........... पुस्तकं , झकास यमी फूड , ( सिक्रेट -  माझं वॉलेट .. :p ) झकास स्टाईलिश लूक आणि मग आपले कॅट्स - डॉग्गी वगरे आणि लॅपटॉप मोबाईल टॅबलेट . आपण सेट .  प्रेमात ..... स्वतःच्या ,  आयुष्याच्या ..आणि हो ,  माझ्या आयुष्यात एक टाळकं आहे खास - प्रेमात आहे त्याच्या पण .  

शॉपिंग ऑनलाईन आणि गप्पा इन द शाल , मुव्ही ऑन द सोफा ----------------------------

झक्कास ! ही मी .  

Thursday, May 15, 2025

प्रेम आणि फक्त प्रेम


माझ्या आयुष्यामध्ये काही वळणावरती असताना आयुष्यामध्ये अचानक काही सुंदर प्रेमी जीवांनी आगमन केले आणि आयुष्य अधिकाधिक प्रेमाचे बनवून टाकले. 
वरच्या फोटोमध्ये असणारा आमचा हिरो त्यानंतर आमच्या गल्लीतली प्रेमळ डॉगी यांनी सगळ्या लोकांना प्रेमाने एकत्र बांधून टाकलं. 
आणि खालच्या फोटोमध्ये माझा शेरलॉक.. 
माझ्या आयुष्यामध्ये काही असे होते जिथे प्रेम देवावर विश्वास आणि बुद्धीचा वापर करून नुसतं त्या परिस्थितीला हँडल करूनच नव्हे तर संपूर्ण ती परिस्थिती चांगल्या परिस्थितीमध्ये बदलण्याचं काम माझं चालू होतं आणि अर्थातच परिस्थिती काहीशी तणावजन्य होती आणि देवाने मात्र आयुष्यात चौकोन रंगीबेरंगी रंगांची आणि प्रिय सुगंधांचे उधळण केली असे दिव्य अनुभव मला आले.


आमच्या शेजारच्या बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग करण्याचा प्रकरण वाटतंय त्यापेक्षा जास्त सेंटीमेंटल निघालं काही चांगली मंडळी आमच्या घरातून नेहमी दिसणारी अनेक वर्षा त बोलणार तर आता काही विशेष निमित्त झालं नव्हतं म्हणून बोलणं झालं नव्हतं अशी काही.. गुडबाय म्हणण्याच्या निमित्ताने का होईना पण प्रत्येकाच्या अंतरंगातला त्यांच्या मनाचा आरसा त्यांच्या स्वरातून त्यांच्या भावनांमधून दिसून आला मला वाटलं आपण उगाचच म्हणतो की जग बदललाय आणि आता पूर्वीसारखं प्रेमाचे लोक मिळत नाहीत किंवा लोकं खूप प्रॅक्टिकल वागतात आणि एकमेकांशी बोलायला त्यांना आवडत नाही.. वास्तविक पाहता आपण सगळे मनातून प्रेमळ आणि भावनाशील असतो. योग्य वेळेला योग्य भावनेने फक्त एक सुवर्णाची किल्ली या ठिकाणी वापरायचे असते ज्यांनी आपापसातल्या प्रेमाची सगळी दार होतात उघडी होतात. 

मला सगळ्यात विशेष वाटलं ते आमच्या किचनचे खिडकीतून दिसणाऱ्या एका काकूंचा. अनेक वर्ष इथे असून सुद्धा आपण आपल्या विश्वात इतके दंग असतो की शेजारी काय घडत आहे किंवा कोण आहे याकडे आपले विशेष लक्ष जात नाही. पण काही कालावधी जेव्हा माझा मला वेळ मिळाला त्यावेळी मला आजूबाजूच्या इतक्या गोष्टी कळल्या ज्या मला इतक्या वर्षांमध्ये कधीच कळलं नव्हत्या. 
या काकूंना काकू म्हणावे की काय म्हणावे मला समजेना कारण त्या मस्त टी-शर्ट घालायच्या आणि घरामध्ये टी-शर्ट घालून सुद्धा संध्याकाळी खूप छान भाकरी करायचा गॅलरीमध्ये उभे राहिल्यानंतर भाकरी थापण्याचा आवाज मी अनेकदा ऐकला होता. यांच्या घरामध्ये मोलकरीण नव्हती आणि सगळी काम घरातले हे सगळे मिळून करायचे यांचं अगदी रुटीन खूप छान लागलेलं आणि स्वयंशिस्त माझ्यासारखी त्यांच्याकडेही मला दिसायचे त्या त्या वेळेला त्यांच्या खिडक्या उघड्या आणि बंद व्हायच्या आणि किचनचे नॅपकिन खिडक्यांवरती वाळत टाकले जायचे आणि काढले जायचे. चेहऱ्यावरून फारसा इमोशन न देणाऱ्या त्या काकूंना शेवटी बाय करावे तरी कसे असा माझ्या मनात विचार चालू होता पण त्यांच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या आमच्या खिडकीतून दिसणाऱ्या बिऱ्हाडांना मी एक्सक्युज मी म्हणून गुडबाय चे दोन वाक्य बोलले ती त्यांनी नक्कीच ऐकले असतील म्हणून त्यांना बाय तर करायला हवे असे मला बुद्धी सांगत होती मनातून आमची एकमेकांना इतकी सवय होती की आमचा चहा एकत्रच असल्यासारखा होता फक्त त्या त्यांच्या घरात आणि आम्ही आमच्या घरात आणि संध्याकाळच्या चहाची जी गंमत आहे आणि त्याचा जो माहोल आहे त्याचे ते महत्त्व आहे ते माझ्या आयुष्यात खूप आहे आणि आनंदाचा एक खूप मोठा असा प्रोग्राम असतो. 


दुपारी देवाला उदबत्ती लावताना मनात म्हणले त्या खिडकीपाशी आल्या तर मी नक्की त्यांना बाय म्हणेन कारण त्यांच्या घरात त्यांचे सामानाची आवरावरी चालू होती आणि त्यांना दुसऱ्या घरी शिफ्ट व्हायचं होते त्यांचे नवीन घर बांधून होईपर्यंत काही कालावधी ही लोक आता दुसऱ्याच घरी राहणार. अचानक आलेल्या वाऱ्याने आणि मोकळ्या झालेल्या त्या बिल्डिंग मुळे अनेक विविध भावना सुंदर आठवणी मनामध्ये तरळून गेल्या ज्याने आधी मी इमोशनल सुद्धा झाले होते पण त्या क्षणी अचानक सुंदर वारा आलं आणि खिडकीतून आलेला वार माझ्या हातातल्या उदबत्तीचा सुवास यामुळे मी चटकन माझ्या तोंडून बोलून गेले किंवा काय मोकळं मोकळं वाटतंय आणि ह्या एका वाक्यामुळे त्या काकूंनी पटकन माझ्याकडे वळून बघितलं आणि मी मात्र उदबत्ती हातात घेऊन घरभर फिरवत होते. त्या क्षणी मला जाणवलं की त्यांना सुद्धा बोलायचं आहे. 

मी उदबत्ती लावून खिडकी जवळ मस्त मांडी घालून बसले. मनात देवाचं नाव घेतलं आणि म्हणलं योग्य असेल तर आमचा नक्की बोलणं हो आणि जेव्हा त्या खिडकीपाशी आल्या तेव्हा मी फक्त त्यांना बाय करण्यासाठी हाक मारली आणि त्यांचा जो स्पॉंटनेस रिस्पॉन्स होता तो मला आज या गोष्टीला दहा पंधरा दिवस झाल्यानंतर सुद्धा आतून हलवून टाकतोय त्या क्षणी काहीतरी वेगळं घडलं माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यातली खूप मोठी एनर्जी मोकळी झाल्यासारखं मला वाटल
त्या इतक्या हसून आणि इतक्या प्रेमाने आणि इतक्या भावनाप्रधान होऊन बोलल्या आणि ते सुद्धा आमच्या कम्युनिटी कॅट म्हणजे हिरो विषयी त्यांनी काळजी सुद्धा व्यक्त केली ज्यातून मला समजलं की अरे त्यांचं सुद्धा आमच्या या सगळ्या प्रकाराकडे लक्ष होतं आणि तेही चांगल्या अर्थाने... त्यांनी तर थेट तू बोलली नाहीस असं हक्काने मला सुनावलं आणि मी अशीच आहे शांत असं मी म्हणल्यानंतर त्या मनमोकळा हसल्या सुद्धा. इतकच नव्हे तर त्या पुन्हा त्यांच्या नवीन घरात इथे आल्यावर मला गप्पा मारायला येणार तर त्यांनी आमंत्रण सुद्धा देऊन टाकलं आणि मी सुद्धा ते स्वीकारलं सुद्धा आणि त्या क्षणी आम्ही दोघीही आमची जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखं अगदी ज्यांनी येऊन बोलत होतो बिल्डिंग कशी दिसते आणि बोका वगैरे... 


आयुष्यात चांगली आणि प्रेमाची माणसं असणं हा नक्कीच खूप मोठा परमेश्वरी आशीर्वाद आहे आणि जेव्हा आपल्याला अशी माणसं आयुष्यामध्ये नसतात किंवा काही नकारात्मक माणसांच्या मधून आपल्याला आपल्या आयुष्यातून मार्गक्रमण करावे लागते तेव्हा आपल्याला आपली कवचकुंडल सांभाळून तोंड बंद करून आपलं संरक्षण करीत संरक्षणात्मक पवित्रा अनुसरावा लागतो हेही सत्य आहे. 

ह्या एका घटनेमुळे माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा काही नवीन प्रेमाची माणसं आलेली आहेत याची मला जाणीव झाली आणि खरंच जणू दुसरा नवीन अध्याय सुरू झाला. 



आपण छान असलं पाहिजे आणि जमेल तितक्यांना मदत केली पाहिजे की मदत बहुतांशी भावनिक असते आणि घरी असणाऱ्या मुलींची आणि महिलांची कशा पद्धतीने होते किंवा त्यांना काय चांगले फायदे मिळतात या अनेक गोष्टी या कालावधीत मला अनुभवायला आल्या. आपण किती प्रॅक्टिकल रहायचे म्हणल
आणि जरी मी जीन्स किंवा slacks घालून फिरले तरीसुद्धा आपल्यातलं प्रेम आणि ममत्व हे स्त्रीच्या विविध रूपांमधून दिसून येत. आणि आपल्यातली बहिण मैत्रीण मुलगी प्रेयसी पत्नी या सगळ्या गोष्टी जेव्हा व्यवस्थित असतात तेव्हाच आयुष्य खूप छान आणि प्रेमाचा होतं प्रेमाशिवाय इथे काहीच शक्य नाही आणि केवळ कपड्यांचा त्याच्याशी अजिबात संबंध नाही. 


आणखीन एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्याला असलेल्या कम्युनिकेशनच्या साधनांचा आपण अतिशय अतिरेकी वापर करीत आहोत आणि त्यामुळे ओव्हर कम्युनिकेशन झाल्यामुळे होणारे अनेक दुष्परिणाम देखील आपल्या आयुष्यामध्ये नकळतच आपण अनुभवत आहोत. हायस्कूलमध्ये असताना आम्ही मैत्रिणी रात्रंदिवस आमच्या सुख स्वप्नांमध्ये रंगलेल्या असायचो प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचो जसा मी आत्ताही घेते आणि आकाशातले ढग येणारा पाऊस रोमांटिक वातावरण आमचे सगळे मांजर परिवार वगैरे या साऱ्यांमध्ये इतकं प्रेम आहे आणि आपलं घर आणि आपण इतके सुखात आहोत हे प्रत्येक क्षणात अनुभवायला येते ही केवळ देवाची कृपा आहे. 
नाहीतर बहुतांशी माणसं आपल्या आयुष्यात आपण काय करतोय कशासाठी करतोय आपण कुठे आहोत आपल्या बाजूला काय घडलं काय नाही याची जाणीवही न होता कुठल्यातरी काहीतरी विचारांमध्ये वेळेच्या तालावर नाचत कशीतरी जगतात जेव्हा ते कोणत्याही अन्नाच्या एका दाण्याचा आस्वाद प्रेमाने घेऊ शकत नाहीत आणि घाईघाईने काय खातात कधी कुठे दैनिक कामे करतात आणि कशी कशी झोप काढून पुन्हा चक्र चालू.

यासाठी लोकांना मेडिटेशन करावे लागते आणि मेडिटेशन मी स्वतः सुद्धा करते आणि प्रेमाने आयुष्य जगणं हे सगळ्यात पावरफुल मेडिटेशन आहे हे मी समजले. 

माझ्या बाबतीत मला विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे या ओवर कम्युनिकेशनच्यामुळे आपण कधीतरी कोणाशी तरी बोलण्यासाठी फोन करतो पण म्हणूनच मुद्दाम आता मी ब्लॉगवर लिहिते कारण पूर्वी सुद्धा आम्ही अशा सगळ्या गोष्टी आमच्या सिक्रेट डायरीमध्ये नोंद करायचं आणि या सगळ्या गोष्टी आमच्या भावविश्व आमच्याबरोबर सुरक्षित असायचं मनाच्या आतल्या कोपऱ्यात ज्याचा एक्सेस कोणाकडेच नसायचा. आपल्या मनातल्या या आनंदाच्या खजिन्यात असणाऱ्या एकेक गोष्टींचा विचार करत आपण कितीही वेळ आपल्या सीक्रेट आनंद मध्ये जात असायचो. 

ही गोष्ट पुन्हा करायला हवी असं मला वाटतं याचा परिणाम म्हणजे माझ्या ब्लॉगवर काही जास्त पोस्ट येतील हे तरी नक्की.. 😜 भावनांच्या जगामध्ये शिरणं आणि त्या खूप छान समजून घेणं आणि एखाद्या गोष्टींवरती मार्ग काढणं अशा गोष्टी करण्याऐवजी लोकं अचानकपणे निराश होतात किंवा त्याच्यातून काहीतरी वेगळंच घडतं किंवा ते स्वतःला भावना शून्य करून घेतात अशा काही विचित्र गोष्टी लोकं करतात असा मला अनुभव आला पण देवकृपेने तो फक्त एक अनुभवच होता आणि आयुष्यामध्ये अशी सुंदर प्रेमाची माणसं अजून खूप आहेत आणि ती येत आहेत हे मला कळल्यामुळे मी एकदम आनंदी आहे. 



ह्या फोटोमध्ये आमचा शेरलॉक त्याच्या टेंट मध्ये जाऊन बसला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित अरे बापरे असे आहेत कारण आमच्याकडे मायक्रोवेव्ह रिपेअर साठी एक माणूस आला होता आणि ह्याला जास्त माणसांची सवय नाही आणि चांगली माणसं मांजरांना बरोबर कळतात त्यामुळे नकोशी माणसं असली तर हे धूम ठोकतात आमचा हा नवीन cat tent. खूप मोठा गोल होतो याचा आणि आमच्या बोक्याला हा खूप आवडतो तो दार वगैरे उघडतो त्यामुळे रात्री झोपण्यासाठी म्हणून विशेष त्याला घेतला आणि तो अर्धवट फोल्ड करून ठेवलाय पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्याचं दार शोधून अनेक वेळा तो त्याच्यामध्ये शिरून निवांतपणे लोळत असतो.

त्यामुळे मला लिहायला छान वाटतंय आणि स्पेशल थँक्यू गुगल ला की मी बोलते आणि गुगल इतका छान टाईप करतोय ज्यामुळे अजून छान पोस्ट लिहायला काही हरकत नाही.

बर मला काही वर्षांपूर्वी काही लोकांनी संपर्क केले सांगितलं की तुमच्या पोस्ट खूप सुंदर आहेत आजच्या जगामध्ये असं दिलखुलास बोलायला हवं तुमच्याशी कनेक्ट होता येईल का कारण आज जरा कॉर्पोरेट विश्व जास्त आहे नीट वागणं मलाही आवडतं पण म्हणून भावना शून्य होणं मला आवडत नाही आणि इनर सर्कलची माझ्या आयुष्यातली जागा ही खूप महत्त्वाची आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी दिलखुलास बोलायला हवं चांगल्या लोकांशी अर्थातच.. चांगली लोकं म्हणजे तसं म्हटलं तर सगळेच चांगले आहेत असं सगळेच म्हणतील पण मला इथे इतकंच म्हणायला की ज्यांच्याशी आपलं पटतं अशा लोकांची सगळ्यांनी छान गप्पा मारायला हव्यात जर सगळे माझे ब्लॉग वाचून ज्यांना खूप छान वाटतं आणि ज्यांना अशा पद्धतीचा काही माझ्याशी बोलायला आवडेल त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क करावा

Google Chat&Meet ID 
sweet.ketaki2008@gmail.com 

या ॲपवरून आपल्याला मेसेंजर प्रमाणे बोलता येते चॅटिंग करता येतं आणि फोनही करता येतो पूर्वी याचं नाव हँग आऊट होता आणि त्याच्याही आधी याचा नाव Gtalk.

नुसती मेल करण्यापेक्षा आपण चॅट वरती गप्पा मारू शकतो अर्थातच मी लिहीत बसत नाही पण फोनवरून गप्पा आपण नक्कीच मारू शकतो त्यासाठी हे ॲप सगळ्यांना निशुल्क उपलब्ध आहे ते गुगल तर्फेच आहे.

गप्पांचा अड्डा जमवायला मला नक्की आवडेल आणि असा अजून छान पोस्ट मी लिहिणार आहे काही कालावधीसाठी तरी नक्कीच लिहिणार आहे तर सगळ्यांनी इथे नक्की येत राहा बघत रहा आणि गप्पा मारू या मजा करूया हसत राहया

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...