loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, March 6, 2017

साऱ्यांसाठी पूरक योगा: शवासन

साऱ्यांसाठी पूरक योगा: शवासन

yoga, shavasan, yoga treatment : 91 976 436 4946

आजच्या दैनंदिन जीवनात घड्याळाच्या तालावर नाचताना व्यायाम करा अशी पुस्तके आपण इंटरनेट वर वाचतो ! काय हे उपरोधात्मक वागणे !
व्यायाम करा म्हणून पूर्वी आजी -आजोबा सक्तीने जोर -बैठका काढावयास लावत. टेकड्यांवर धावायला -पळायला मिळे . उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी / आजोळी जाऊन दिवसभर धुडगूस चाले. कधी परसातल्या विटी दांडू - क्रिकेट च्या मॅचेस . कधी आंबा - माडाच्या झाडावर चढून गोळा केलेला अमृततुल्य माल , कधी रानातल्या करवंदे - मैना - आवळ्यांने भरलेली ओंजळ ! धमाल !  आता मात्र समर -कॅम्प  किंवा व्हेकेशन बॅच मध्ये जाऊन पोरं नाकावर चष्मे चढवून कॉम्पिटिशन च्या चक्रावर चालण्याचे बाळकडू घेत असतात. मग ऐन तिशीत , डोक्यावर चाकाकता चांदोबा , पोटाचा नगारा , खिशात बीपी -डायबेटीस च्या गोळ्यांची पाकिटे आणि खूपच यशस्वी उद्योजक आहात याचं प्रूफ म्हणजे झोपेच्या गोळ्या ! असा राजेशाही थाट दिसतो. तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट रेट च्या चक्रवाढ व्याजात बोनस म्हणूनही असे निरोगी आयुष्य आणि निवांत पणा मिळेना !

कालाय तस्मै नमः ! हे वचन ध्यानी ठेऊन माणसाने आनंदाने जगावे . अगदी बरोबर . पण माणसाच्या हुशार बुद्धीला यातून योग्य पर्याय निवडून तब्बेत सांभाळणे सहज शक्य आहे. सांगतेय भन्नाट -फट्टू आयडिया - फास्ट फूड च्या जमान्यात फिट राहण्याच्या !

१. साऱ्यांसाठी शक्य आणि उपयुक्त व्यायाम :
फास्ट चालणे
जॉगिंग करणे
दोरीवरच्या उड्या मारणे
टेनिस, बॅडमिंटन यांसारखे खेळ.
पोहण्याचा नियमित व्यायाम
सायकल

मायक्रो -एक्सरसाइज
लिफ्ट न वापरता जिने वापरणे
सूर्यनमस्कार

२. शवासन : साऱ्यांना प्रिय ! अति उपयुक्त !

शवासन हा शब्द शव या सौस्कृत शब्दाचा भाऊ . शव म्हणजे मृत वयक्तीचा देह . म्हणजे चक्क मृत वयक्तीच्या देहाप्रमाणे पडून राहणे. जमिनीवर पाठीवर झोपून शरीर अत्यंत निवांत ठेऊन पडून राहणे. हा निवांतपणा आणण्याची एक नामी युक्ती !
विचार करा , प्रचंड उन्हातून दुपारी १२-१ च्या प्रहरी तुम्ही घरी येऊन पंख्याखाली पडला आहात . अंगाची लाही -लाही होत आहे , घामाच्या धारांनी शरीर डबडबले आहे , तोंडाला कोरड पडून ओठांना भेगा पडल्या आहेत . लिफ्ट बंद म्हणून तुम्ही १२ मजले चढून घरी आला आहात . आणि आल्या आल्या दुसरे - तिसरे काही नको ; पंख फूल आणि जमिनीवर मेल्यासारखे पडून वाऱ्याच्या सुखद झळा फायनली तुम्हाला शांत करीत आहेत . मस्तक गार पाण्यात बुडवून तुम्हाला आता हुश्य झाले आहे . आनंद - थंडगार - शांत .... ! अहाहा !!! झकास !!!
कोणी पगारवाढीचा फोन जरी केला तरी वाटते , “गप मेल्या ! मला असाच जरा वेळ पडू दे ...... !!!”
हे भाव शवासन करतानाच्या अखेरच्या टप्य्यात अनुभवा आणि मग जो आनंद मिळेल तो अप्रतिम ! अशी योगिक साधना आणि रिलॅक्सएशन म्हणजे अप्रतिम ताजेपणा ! करून बघा , तुम्हाला जाणवेल त्या दिवशी पुरेशी झोप न मिळताही तुम्ही उत्साहाने १००% देऊन अधिक कामे करू शकाल !
शवासनात पडून अनेक जण चक्क झोपतात ! घोरतात ! कृती १-५ करा असे तक्ते वाचून पडून राहतात. लक्ष मात्र कृती १ झाली , २ झाली का  यावरच असते ! मग ते शवासन होणार कसे ! म्हणून येथे कृतीचा कित्ता न गिरवीता , खरी मेख देत आहे. योग्य पद्धतीने हे आसन केल्यास शारीरिक फायदे तर होतीलच , पण याचबरोबर अत्यंत निवांत , शांत आणि प्रसन्न वाटू लागेल.
हृदय रोग्यांना देखील हे आसन करता येणे शक्य आहे.

शवासन : फायदा
ह्या आसनसाठी तज्ञांच्या मॉनिटरिंग ची आवश्यकता नाही.
ह्या आसनामुळे मानसिक तणाव , नैराश्य , थकवा दूर होते.
मोठ्या ऑपरेशन / ऍक्सीडेन्ट नंतर लवकर रिकव्हरी साठी याचा उपयोग होतो.
डायबेटीस , ब्लड प्रेशर विकारात याचा लक्षणीय फायदा होतो.
** डायबेटीस च्या लोकांनी उपाशीपोटी आसन करू नये .
चुकीच्या पद्धतीने आसन झाल्यास / झोप लागल्यास , झोपेत साखर कमी होऊन धोका उदभवतो.

तुमच्या समस्येवर योग्य योग-उपचार  हवेत ?
तुमच्या वयक्तिक शारीरिक / मानसिक / भावनिक समस्यांवर योग - उपचार जाणून घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी :
१. तुमच्या आजारानुसार काही आसने तुम्हाला वर्ज असू शकतात . म्हणजेच साऱ्यांसाठी सर्व आसने उपयुक्त नाहीत . चुकीचे आसन केल्यास तुमचा रोग वाढू शकतो.
२. तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय आसने करू नयेत. यामुळे मुरगळणे , सांधेदुखी इत्यादी आजार बळावू शकतात .
सत्यघटना : वय वर्षे २४ असणाऱ्या एका मुलाने चुकीच्या पद्धतीने घरच्या घरी केलेल्या आसनामुळे  गेली २ वर्षे तो मानेच्या दुखण्याने हैराण आहे.
अनेक उपचाराअंती गूण नाही . अशी दुखणी आयुष्यभरासाठी देखील मागे लागू शकतात.
तात्पर्य : योगा करणे म्हणजे हाय - फाय क्लब ला जाऊन शायनिंग खाणे नव्हे. योगा म्हणजे साधू मुनींनी किंवा विशिष्ठ वयोगटाच्या करण्याच्या गोष्टी नव्हेत . कोणीही उठला , काहीही कधीही केलं म्हणजे योगा नव्हे. शरीर आणि मनाचा योग्य समन्वय साधून आरोग्य ते आध्यात्म असा अफलातून प्रवास साध्य करणारा एक अचाट चमत्कार म्हणजे योगा . सर्व रोगांवर उपचार पद्धतीस पूरक ठरणारा असा योगा .

तुमच्या प्रतिसाद / अनुभव / फायदे आणि प्रश्नांसाठी संपर्क:
डॉ. केतकी स. इतराज ( +९१ 976 436 4946)
   


No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

Different stages in my life.. lets connect like minded 😊

Hi everyone...!!!  It's really after long time writing on my blog.  I have gone through a considerable phases in my life where I have al...