Donald Trump & India
ट्रम्प आजोबा आणि टिपिकल अमेरिकन पुरुष :
ट्रम्प आजोबांचे हेअरकट आणि टिपिकल अमेरिकन पुरुषाचा लूक माझ्या आवडत्या " स्मॉल वन्डर्स " सिरीयल मधल्या " टेड " या टिपिकल अमेरिकी रोबोट इंजिनियर ची आठवण करून गेला. १९८० च्या गाजलेल्या अमेरिकन सिटकॉम पैकी ही सिरीज सोनी आणि स्टार प्लस या चॅनेल च्या भारतातील विस्तारत्या धोरणामुळे १९९६-९७ च्या सुमारास ( जेव्हा मी हायस्कुल कीड होते ) मला खूप छान एन्जॉय करता आली . ट्रम्प आणि टेडी रियल लाईफ मध्ये कदाचित एकाच वयाचे असावेत. मला वाटते , पुराणमतवादी अमेरिकन विचारांचा पगडा तर नसेल ट्रम्प आजोबांवर ! " अमेरिका प्रथम " म्हणताना त्यांची सध्याची ३री पत्नी मेलॅनिया जन्माने अमेरिकन नाही हे विसरलेत वाटतं ! ज्या वयात पार्किन्सन्स आणि अल्झायमर ची औषधं घेत लोकं दिवस कंठतात , त्या वयात ट्रम्प आजोबांची शारीरिक , मानसिक आरोग्य संम्पदा वाखाणण्याजोगी आहे , हे निश्चित ! (त्यामुळे हा विसर पडला असेल तर हरकत नाही !)
