बाळासाहेब ठाकरे ( 1926-2012)
आजचा दिवस समस्त महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून गणला जाईल. २०१२ हे साल खर्या अर्थाने अनेक लोकप्रिय , माननीय दिगाजांना आपल्यापासून हिरावून घेत आले आहे. मात्र वर्ष सरते वेळी , शिवसेने प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत आज मालवली. अर्थातच हा मथळा इंग्रजीतून लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ महाराष्ट्र नव्हे , तर भारताच्या इतिहासातील , राजकारणातील एक सोनेरी पान आज हरवले. अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांना राजकीय भाषणातून टीका म्हणजे काय हे आपल्या जहाल , विनोदी किनार असणार्या , सामन्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आपल्या वाणीतून त्यांनी दाखवून दिले. मात्र परस्पर संबंध आणि राजकीय टीका या दोहोंचे भान ठेवणारे "साहेब" राजकारणातला मानाचा आध्याय ठरले.
अनेक मोठे मोठे नेते त्यांच्या वडिलकीच्या मार्गदर्शनामुळे देशाच्या राजकारणाला मिळाले. सी लिंक पासून आपल्या मुंबई - पुणे एक्स्प्रेस हाय वे पर्यंत कित्येक आताच्या जमान्यातली स्वप्ने या दृष्ट्या साहेबांनी घडवून आणली. मराठी माणसासाठी , मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी त्यांनी तब्बल ४ दशके त्यांच्या इशार्यांवर महाराष्ट्राचे राजकारण नाचविले !! बाळासाहेब ठाकरे माझ्या आजोबांच्या वयाचे! त्यांचे हे कर्तृत्व , हे धडाडीचे काम, वाक्चातुर्य (खरे पाहता , वाक्चातुर्यया शब्दाचा समानार्थ म्हणजे बाळासाहेब ठाकरे!) , आपल्या माती आणि माणसाविषयीचे प्रेम, अखिल विश्व आपल्याभोवती खेचून घेण्याचे सामर्थ्य पाहून आम्ही या पिढीतील त्यांची नातवंडे निश्चितच त्यांची हि स्वाभिमानाची धुरा पुढे चालवू याची खात्री वाटते.
गेल्या ४दिवसांपासून त्यांनी केलेला वैद्यकीय संघर्ष देखील त्यांच्यातल्या खर्या लढव्यया व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवितो. शेवटच्या श्वासापर्यंत "साहेब" शिवसेनेच्या वाघासारखेच झंजावाती राहिले. अजूनही बाळासाहेब आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही! अगदी हे लिहिताना सुद्धा ! बाळासाहेब आपल्यात असतील ..राहतील...अगदी नेहमीच! त्यांची राजकीय व्यंगचित्रे , त्यांची विचारप्रणाली, त्यांचे वक्तृत्व ,त्यांचे कर्तृत्व, त्यांचे लिखाण केवळ अजरामर आहे. बाळासाहेब ठाकरे हे यापुढे केवळ कोण व्यक्तीचे नाव राहणार नाही, किंबहुना आजदेखील ते एका स्वाभिमानी , स्वतंत्र , मराठी विचारप्रणालीचे नाव आहे. शिवसेनेचा ते खरा आत्मा आहेत . ज्वलंत विषयावरील त्यांचे "सामना" मधील मथळे , त्यांची भाषाशैली , त्यांचे हे अचाट कर्तृत्व या सार्या गोष्टी शब्दात बसविण्याचे सामर्थ्य माझे नाही. राजकारण आणि लोकप्रियता हातात हात धरून नांदू शकते याचे द्योतक म्हणजे केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे.
" झाले बहु , होतील बहु , परंतु यांसम हे " इतकेच काय ते ठामपणे लिहिणे शक्य आहे.
त्यांना माझे लक्ष लक्ष सलाम !
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!