पावसाळा किंवा आवडता ऋतू यावर शाळेत निबंध लिहिला असेल मी बर्याचदा . पण आज
आमच्या पुण्याच्या पावसावर लिहिते. केतकी इतराज आणि पावसाचा काय संबंध ते
आधी बघू ! :D
कधीही पावसात चिंब भिजायला आवडते अशी " ती " म्हणजे केतकी इतराज ( म्हणजे मी :D )
लहान असताना हुजुरपागेतून ( शाळेचे नाव ) नारायण पेठेतल्या घरी म्हणजे बेताचेच अंतर. मग सगळ्या लक्ष्मी रोडला प्रदक्षिणा घालून मग आमची स्वारी भिजत घरी येत. :D येताना साडेतीन रुपयांची क. दा . खायची गरम गरम ! झकास ! :D शाळेचा पहिला दिवस - ७ जून . नवे रेनकोट घालून शाळेत जायचे या पिढीचे स्वप्न साकारायला या वर्षी मान्सून वेळेत दाखल झालेला आहे. हे भाग्य माझ्या पिढीला नेहमीच लाभले. शाळेत नवे पावसाळी फ्लोटस आणि गुढघ्या पर्यंत स्कर्ट घालून जायचे. वर्गात सार्यांचे निथळत लावलेले रेनकोट खिडक्यांच्या दारांची शोभा वाढवत :D काय मस्त असतो नव्या रेनकोट चा वास ! झक्क !
मी भिजून शाळेत बसले आहे. चित्रकलेच्या वर्गात , मधल्या सुट्टीत , लायब्ररीतून धावत बाहेर येउन सुद्धा मी भिजले आहे. शाळेतला पाउस नेहमीच धमाल होता.
पुण्याचा पाऊस ………. ! तर , अजूनही पाणी बघायला बा .
पुं . वर जाणे म्हणजे पुण्याचा पाऊस . आमच्या ओम्कारेश्वारास नदीचे पाणी
लागणे म्हणजे पुण्याचा पाऊस . भिडे पूल पाण्याखाली गेला ; म्हणून माझे
कोलेज बुडले आहे. आजी माझी - ओमकारेश्वराजवळ रहाते न … नारायण पेठेत . तेथे
" नदीपात्रा जवळील लोकांना सतर्कतेचा इशारा ! " असे सांगत फिरणाऱ्या
कॉर्पोरेशन च्या गाड्या बघत थांबणे म्हणजे पुण्याचा पाऊस. आमचे आजोबा 1९६२ च्या पुराच्या रिअल स्टोरीज पण सांगतात मग .
गेल्यावर्षी पेठेतल्या अष्टभुजा देवीच्या देवळात छतापर्यंत पाणी शिरले . ते बघायला दारापर्यंत जाणे म्हणजे पुण्याचा पाऊस. :D माझा काका रहातो तेथे काही वर्षांपूर्वी पहिला मजला पाण्याखाली गेला ; तेव्हा होडीतून त्यांना बाहेर काढले ; काकू घाबरून यायलाच तयार नव्हती - हा असा पण आमच्या पुण्याचा पाऊस !
आत्ता पण , माझी स्कूटी माझासार्खीच! तिला पण वाटते भिजावे म्हणून पडते बंद पावसात ! :D मागच्या महिन्यात गम्मत च झाली ! आमची लाडाची स्कुटी माझ्या घरासमोर च्या गल्लीत भिजायला थांबली :D मी मस्त तिला हाताशी घेऊन भिजत येत होते . कित्ती तरी जणांनी " madam , काही मदत करू का ? " विचारले ! ( आमच्या पुण्यात अजूनही माणुसकी आहे हो ! :D ) मी म्हणले , " No thanks ! " ( मनात म्हणले , भिजू दे की लेको ! :p ) हो , मी छत्री असूनही बरेचदा भिजले आहे ! अजूनही भिजते . आजकाल मी भारीच्या चपला डिकीत ठेऊन गाडी चालवते. हे खूप जणांना माहित आहेच ! :D कारण चपला आणि पाऊस दोन्ही माझा विक point आहेत . चपला खराब झालेल्या मला चालत नाहीत . आणि पावसात भिजण्यासाठी पावसाची सर आली कि मी बाहेर पडते :D
नीलायम च्या चौकात रस्त्याची चाळणी आणि डबक्यातले पाणी चुकवीत गरम गरम रगडा patice च्या पार्टीला मी गेले आहे.
मला चिखल आवडत नाही , केसांचे गुंतवले बघून उलटी येते . मला स्वछ भिजणे आवडते. मुसळधार पाऊस , गरम गरम आवडीचे जेवण , टीन - टीन किवा स्कूबी डू बघत कुडकुडत झोपा काढणे , माझ्या आवडीची पुस्तकं वाचत लोळणे -
बास की राव ! अजून काय पाहिजे ………………………… ! :D
कधीही पावसात चिंब भिजायला आवडते अशी " ती " म्हणजे केतकी इतराज ( म्हणजे मी :D )
लहान असताना हुजुरपागेतून ( शाळेचे नाव ) नारायण पेठेतल्या घरी म्हणजे बेताचेच अंतर. मग सगळ्या लक्ष्मी रोडला प्रदक्षिणा घालून मग आमची स्वारी भिजत घरी येत. :D येताना साडेतीन रुपयांची क. दा . खायची गरम गरम ! झकास ! :D शाळेचा पहिला दिवस - ७ जून . नवे रेनकोट घालून शाळेत जायचे या पिढीचे स्वप्न साकारायला या वर्षी मान्सून वेळेत दाखल झालेला आहे. हे भाग्य माझ्या पिढीला नेहमीच लाभले. शाळेत नवे पावसाळी फ्लोटस आणि गुढघ्या पर्यंत स्कर्ट घालून जायचे. वर्गात सार्यांचे निथळत लावलेले रेनकोट खिडक्यांच्या दारांची शोभा वाढवत :D काय मस्त असतो नव्या रेनकोट चा वास ! झक्क !
मी भिजून शाळेत बसले आहे. चित्रकलेच्या वर्गात , मधल्या सुट्टीत , लायब्ररीतून धावत बाहेर येउन सुद्धा मी भिजले आहे. शाळेतला पाउस नेहमीच धमाल होता.
गेल्यावर्षी पेठेतल्या अष्टभुजा देवीच्या देवळात छतापर्यंत पाणी शिरले . ते बघायला दारापर्यंत जाणे म्हणजे पुण्याचा पाऊस. :D माझा काका रहातो तेथे काही वर्षांपूर्वी पहिला मजला पाण्याखाली गेला ; तेव्हा होडीतून त्यांना बाहेर काढले ; काकू घाबरून यायलाच तयार नव्हती - हा असा पण आमच्या पुण्याचा पाऊस !
आत्ता पण , माझी स्कूटी माझासार्खीच! तिला पण वाटते भिजावे म्हणून पडते बंद पावसात ! :D मागच्या महिन्यात गम्मत च झाली ! आमची लाडाची स्कुटी माझ्या घरासमोर च्या गल्लीत भिजायला थांबली :D मी मस्त तिला हाताशी घेऊन भिजत येत होते . कित्ती तरी जणांनी " madam , काही मदत करू का ? " विचारले ! ( आमच्या पुण्यात अजूनही माणुसकी आहे हो ! :D ) मी म्हणले , " No thanks ! " ( मनात म्हणले , भिजू दे की लेको ! :p ) हो , मी छत्री असूनही बरेचदा भिजले आहे ! अजूनही भिजते . आजकाल मी भारीच्या चपला डिकीत ठेऊन गाडी चालवते. हे खूप जणांना माहित आहेच ! :D कारण चपला आणि पाऊस दोन्ही माझा विक point आहेत . चपला खराब झालेल्या मला चालत नाहीत . आणि पावसात भिजण्यासाठी पावसाची सर आली कि मी बाहेर पडते :D
नीलायम च्या चौकात रस्त्याची चाळणी आणि डबक्यातले पाणी चुकवीत गरम गरम रगडा patice च्या पार्टीला मी गेले आहे.
मला चिखल आवडत नाही , केसांचे गुंतवले बघून उलटी येते . मला स्वछ भिजणे आवडते. मुसळधार पाऊस , गरम गरम आवडीचे जेवण , टीन - टीन किवा स्कूबी डू बघत कुडकुडत झोपा काढणे , माझ्या आवडीची पुस्तकं वाचत लोळणे -
बास की राव ! अजून काय पाहिजे ………………………… ! :D
Good article
ReplyDeleteThx ...... but this is not an article !
DeleteJust gppa..... dil se :D