अक्षरशः अनेक वर्षांनी मी इथे लेख लिहीत असेन. मराठी ललित / वैचारिक मधला मोडणारा. अनेक मुद्दे आहेत , कुठेतरी खुपणारे. मी काही कोणी प्राज्ञ, वैचारिक म्हणून लिहीत नाहीए. पण दिलखुलास , बडबड्या , मस्तीखोर केतकीचे हे म्हणणे आहे.
मला पुन्हा एकदा खूप छान वाटते , की मी खूप छान काळात जन्म घेतला. आम्हाला खूप छान शाळा , मराठी सौस्कृती , खूपच अप्रतिम मैत्री , टिपिकल पुणेरी चौकोनी कुटूंब , पुणेरी पेठेतील बालपण , पुण्याचा गणपती उत्सव अनुभवायला मिळाले ; आणि करिअरच्या टप्यावर इंटरनेट , आयटीचा जमाना पण आम्हाला मिळाला. मला इंटरनेटशिवाय जगणे आज अशक्य आहे. मी कामासाठी सोशल नेटवर्क वापरते, वैयक्तिक आजिबात नाही. पण तरीही ऑनलाईन शॉपिंग , वाचन , यु ट्यूब , भाऊ परदेशी असल्याने व्हिडीओ कॉल , मग तो येताना मला हवे त्याची मी इथून परदेशी वेबसाईटवर त्याच्या परदेशी पत्त्यावर होम - डिलिव्हरी पाठवा म्हणून ऑर्डर देते त्याची मजा , अनेक नव्या लोकांना भेटणं - गप्पा मारणं इंटरनेट मुळे शक्य आहे. अनेक देशातले , विविध वयोगटातले लोक विविध निमित्ताने संपर्कात आहेत. पण मला असे वाटते , ह्या साऱ्या शिवायचे आयुष्य आजच्या पिढीला माहीतच नाही. मी काही म्हातारी नव्हे. जेमतेम कॉलेज मधली दिसते - त्यापेक्षा वयाने थोडी मोठी आहे. पण पिढीचे अंतर पडावे इतके आयुष्य १० वर्षांत बदलले.
आम्ही काय करायचो ? कॉलेजमध्ये मोबाईल नव्हते. ग्रॅजुएशनला असताना नोकिया ११००. कॉलेजमधली साऱ्यांची प्रेम प्रकरणे , ओळखी , गप्पा , भटकंती , पार्ट्या सारे काही ह्या इंटरनेट / मोबाइलशिवाय. शाळेत असताना फोन वरून खूप गप्पा मारायचो. शेजारच्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या मैत्रिणीशी सुद्धा ! एकमेकींबरोबर भटकायचो संध्याकाळी. तेव्हा जंक फूड पार्लर नव्हती. आम्ही आपले नारायण पेठी , बालगंधर्व पुलावर जायचो. लायब्ररीत गाठी भेटी व्हायच्या. मी आज माझी ३-४ ई- बुक प्रकाशित केली. पण अगदी ४ वर्षांपूर्वी सुद्धा मी पण लायब्ररीत नवीन येणाऱ्या भारी पुस्तकांसाठी नंबर लावून असायचे. दुपारचे लोक , संध्याकाळचे लोक वेगळे. आपापल्या कामानुसार काही लोकांच्या ठरलेल्या वेळा. मग गाठी भेटी होत. आणि काय करूया असा प्रश्नच कधी पडत नसे ! मला आठवतंय , एकदा माझ्या शाळेतल्या बेस्ट फ्रेंड च्या घरी - गच्चीवर आम्ही कित्ती वेळ गप्पा मारत होतो !
लोकं बोलतात म्हणजे , विचार करतात , काही प्रश्न - उत्तरे मिळवतात, चर्चा होते. कौटुंबिक ते प्रेमप्रकरणे. नॉर्मल मुलींचे नॉर्मल विषय. कॉलेज बुडवून गुडलक चौकापर्यंत भटकायचो. तेव्हा अक्कल नव्हती - सन टॅन वगरे ! आजकाल उन्हाची तीव्रताही वाढली. लहानग्या शाळेतल्या पोरींना पण लवकर अक्कल येते , भुवया कोरून - बिरून फिरतात. शाळेतल्या कुमारिकेच साजिरं रूप लोभस असतं ! आम्ही छान होतो बाई !
आत्ता एका परदेशी बाईच्या यु ट्यूब वरून ऐकलं , कित्ती लोकांचे डिप्रेशन दूर झाले त्या चॅनेल मूळे , इंटरनेट शिवाय कसे झाले असते ! म्हणजे अजून १० वर्षांनी भारतात असे होणार !तत्क्षणी संपर्क म्हणून लोक अखंड ओकतच राहतात ! मग ओकलेले बघितले कि नाही ते बघत राहतात ! ह्यांना स्वतःचे आयुष्य नसते का !पूर्वी असे काही नव्हते म्हणून - मेरे पिया गए रंगून --- असे रोमँटिक गाणे झाले. मी जुने पिच्चर बघितले की मला फार अप्रुप वाटते. १९५०-१९६० मधले काळे - पांढरे बॉलिवूड पिच्चर ! परिणिता मध्ये किशोर कुमार शेवटपर्यंत ऐकूनच घेत नाहीत , 'ती थांबली आहे तुझ्यासाठी बाळ्या !'नौकरी पिच्चर मध्ये किशोर कुमार अक्षर घाण आहे म्हणून नोकरीचे अर्ज लिहिण्यासाठी टाईपरायटर भाड्याने घेतात! १५ रु. किंमत , १० रु. दरमहा भाडे. सेकंड हॅन्ड ! आता आपण हजारो साईटवर एका क्लिकमध्ये अप्लाय करतो !
प्रेम नाही बदलले कधी - काळ बदलला तरी. माझे तर प्रेमावरच प्रेम आहे.
(आणि हो, आमच्या पुण्यातले मराठी बोलणारे पण खूप कमी झाले आहेत. फोन वर इंग्रंजी किंवा हिंदी नेच सुरुवात होते. टेलीकॉलर वाले इंग्रजी. )
तर पुन्हा , बॅक टू फ्लॅश बॅक- माझ्या आयुष्याचा ..
आम्ही फार क्वचित पत्ते खेळायचो, रात्री बॅडमिंटन खेळायचो.
सध्याचे सोशल नेटवर्क म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा आहे.
माझे आजी आजोबा ८० वर्षे अधिक आहेत. दोघांचीही आयुष्यात कधीही इमेल अकाउंट उघडलीच गेली नाहीत. त्याच्या आयुष्यात ह्यांनी मेसेज केला - त्यांनी बघितला नाही वगरे स्ट्रेस कधीच नव्हता , नाही ! त्यांच्याकडे बीएसएनएल चा मोठा लँडलाईन आहे , नंबरही मी ३रीत असताना होता , तोच आहे ! :) म्हणून मी कशी आहे तर मी नव्या - जुन्याचे मिश्रण आहे. मला नवे जुने दोन्ही खादडायला आवडते. मला आजीला येणाऱ्या मनीऑर्डरी आणि त्याबरोबरची तिच्या भावाने तिच्यासाठी लिहिलेली १ ओळ वाचायला खूप आवडे !
" सौ. बेबीस ,
अमुक तमुक. - भाऊ अबक."
आमची आज्जी जाम खूष होत मी असे वाचून दाखविले की ! :)) ती पण माझ्या नव्याला समजून घेते. माझ्या लोगिन - टी शर्ट मध्ये मी छोटी असल्याने गोड दिसते. ती मला औषधे विचारते , चेहऱ्यासाठी क्रीम विचारते :)) मी शाळेत असताना मी तिला इंग्रजी पण शिकवले होते.
-------
आयुष्य म्हणजे कित्तीतरी आहे! ते इंटरनेट / मोबाईल साऱ्यांना गिळंगृत करते आहे ! वाचन फारच कमी झाले आहे. मला मराठी पुस्तके इंटरनेट वर वाचायला मिळत नाही आणि आवडतही नाही ! वाचन सौस्कृती म्हणजे पुस्तक - पाऊस - चहा - ब्लॅंकेटमध्ये लोळणे ! :)
मी गोड आहे. देवाला थँक यू , सगळ्या गोड आयुष्यासाठी, इतकी गोड केतकी बनवल्यासाठी !
सारीकडे काही तरी कमी जास्त असतेच !

असो , बदल हे एकमेव सत्य आहे. अशा सुंदरशा बदलासाठी मी एकदम तयार आहे! :)
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!