loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label #marathi. Show all posts
Showing posts with label #marathi. Show all posts

Wednesday, July 24, 2019

लेखनासाठी लेख देणे , घरून काम , सेल्स , मार्केटिंग , मराठी टायपिंग , जाहिरातदारांसाठी नोंदणी फार्म

Advertisement Booking, Work From Home, Writer's Helpful post




नमस्कार !
आपल्या शुभेच्छांमुळे "गप्पागोष्टी" मराठी मासिकाच्या दिवाळी अंकाचे २०१७ दिवाळी मध्ये धुमधडाक्यात प्रकाशन झाले.
आमच्याबरोबर निशुल्क, स्वानंदाने काम करणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांचे स्वागत आहे.


जाहिरात देण्यासाठी (दिवाळी अंक २०१९ , ईबुक मध्ये)
www.greenaapples.com वरील फॉर्म भरून खाली दिलेल्या व्हाट्सऍप वर मेसेज करा.
आमचे प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील.

 साहित्य

दरवर्षीसाठी आपण लेख विविध विषयावर पाठवू शकता. मासिकात सर्व वयोगटासाठी विविध लेखमाला , विषय असल्याने आपल्या लेखांचे स्वागत आहे ! 

१. २०१९ - वास्तुशास्त्रावर लेख पाठवणे. इतर ज्योतिषी लेख चालतील.
२. वार्षिक भविष्य लिहिण्यासाठी आपला अल्प परिचय त्वरित पाठवा. एकाच सर्वोत्तम ज्योतिषाची मनाच्या ह्या स्थानासाठी निवड होईल.
३. आगामी अंकासाठी पाककृती, लेख , प्रवासवर्णने , कला , मुलाखती, विनोदी साहित्य, बालविभागासाठी गोष्टी , कोडी  इत्यादी अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य मागवीत आहोत.
४. लेख कृतीदेव १० किंवा युनिकोड फॉंट मधेच स्वीकृत.
५. कागदावर लिहिलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही.
६.  साहित्य संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
७. साहित्य मेल करण्यासाठी contact(at)greenaapples.com

जाहिरात , पैसे मिळवण्याच्या आकर्षक संधीबद्दल 

1. गप्पागोष्टी मासिक - ग्रीन ऍपलस बरोबर काम करण्याविषयी आणि लेखन देण्याविषयी ह्याच माहितीचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


2. जगभरातील लेखकांनी / मार्केटिंग व्हॉलेंटियर्सनी / खाजगी लायब्ररी / डिस्ट्रिब्युटर्स ह्यांनी  अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :
+९१ ९७६ ४३६ ४९४६ (Whatsapp मेसेज फक्त )
किंवा संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
3. जाहिरात बुकिंगसाठी ऑनलाईन फॉर्म खालील लिंक वर उपलब्ध
https://docs.google.com/forms/d/1K5H25uJBGWejYRXnsPk4AqZEwQFLfzT7dmzM_TFgMjk/edit?c=0&w=1


Thursday, July 26, 2018

इंटरनेट -मोबाईल नसतानाचे आयुष्य - निवांत - दिलसे !

अक्षरशः अनेक वर्षांनी मी इथे लेख लिहीत असेन. मराठी ललित / वैचारिक मधला मोडणारा. अनेक मुद्दे आहेत , कुठेतरी खुपणारे. मी काही कोणी प्राज्ञ, वैचारिक म्हणून लिहीत नाहीए. पण दिलखुलास , बडबड्या , मस्तीखोर केतकीचे हे म्हणणे आहे.

मला पुन्हा एकदा खूप छान वाटते , की मी खूप छान काळात जन्म घेतला. आम्हाला खूप छान शाळा , मराठी सौस्कृती , खूपच अप्रतिम मैत्री , टिपिकल पुणेरी चौकोनी कुटूंब , पुणेरी पेठेतील बालपण , पुण्याचा गणपती उत्सव अनुभवायला मिळाले ; आणि करिअरच्या टप्यावर इंटरनेट , आयटीचा जमाना पण आम्हाला मिळाला.  मला इंटरनेटशिवाय जगणे आज अशक्य आहे. मी कामासाठी सोशल नेटवर्क वापरते, वैयक्तिक आजिबात नाही. पण तरीही ऑनलाईन शॉपिंग , वाचन , यु ट्यूब , भाऊ परदेशी असल्याने व्हिडीओ कॉल , मग तो येताना मला हवे त्याची मी इथून परदेशी वेबसाईटवर त्याच्या  परदेशी पत्त्यावर होम - डिलिव्हरी पाठवा म्हणून ऑर्डर देते त्याची मजा , अनेक नव्या लोकांना भेटणं - गप्पा मारणं इंटरनेट मुळे शक्य आहे. अनेक देशातले , विविध वयोगटातले लोक विविध निमित्ताने संपर्कात आहेत. पण मला असे वाटते , ह्या साऱ्या शिवायचे आयुष्य आजच्या पिढीला माहीतच नाही. मी काही म्हातारी नव्हे. जेमतेम कॉलेज मधली दिसते - त्यापेक्षा वयाने थोडी मोठी आहे. पण पिढीचे अंतर पडावे इतके आयुष्य १० वर्षांत बदलले.

Saturday, February 4, 2017

हैप्पी लिव्हिंग , कीप स्मायलींग

happy living keep smiling
एकदा येन - तेन  निमित्त्यानं महिला मंडळाच्या गप्पा कानावर पडल्या. मजेशीर आणि माझ्यातल अभ्यासू कुतूहल जाग्या करणाऱ्या ! गूण आला नाही म्हणून डॉकटर बदलणाऱ्या ; पण गुरुजी आणि ज्योतिषांच्या नियमित वाऱ्या करणाऱ्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ! भारी ए नाही !
विषय गंभीर आहे. प्रत्येक कॉमन मॅन ला वाटते, आपला कस सुरळीत व्हावं. शिक्षण , नोकरी , पैसे , घर , लग्न , पोरं इति. मग मनासारखे काहीही घडत नाही , अडथळे येतात किंवा विलंब होतो तेव्हा समस्या निर्मिती होते. थोडक्यात काय , मनासारखे न घडणे म्हणजे समस्या ! इथे सारेच काही कागदावरच्या रेषेसारखे सरळ नसते , आपलं आणि इतरांचे आयुष्य वेगळे असू शकते हे मान्य करण्याचीच मनाची तयारी नसते ! मग होते ते “दुःख” ! एखाद्या समस्येवर मार्ग काढणे हे मग सुचतच नाही ! कारण , डायरेकट किंवा इन्डायरेकट तुम्ही सफर होत असता. साधे उदाहरण , शारीरिक क्षमता कमी झाल्याने साध्या सर्दी -खोकला -तापातही नेहमी इतके १००% जोमाने तुम्ही काम करू शकत नाही. काही माणसे काम करणारच नाहीत , काही उशिराने सुरु करतील , काही रेटून नेतील " कुछ नही होता " म्हणून ! तरी , एखाद्या समस्येला / प्रसंगाला तुम्ही कशा पद्धतीने बघता , कशा पद्धतीने हाताळता या गोष्टी अनेक मुद्दांवर अवलंबून असतात. कोणत्याही समस्येत तुम्ही असाल तरी ह्याचे “मॉडेल” असेच असते. शारीरिक , बौद्धिक ,  मानसिक , भावनिक , सामाजिक , आर्थिक मुद्दे इथे महत्वाचे ठरतात.  तुमचे मूळचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव तर यात अत्यंत महत्वाचा ! मग विशिष्ट परिस्थिती मध्ये तुम्ही कसे वागता , हे तुमच्यासाठी योग्य असते. परंतु साऱ्यांनाच हे योग्य वाटत नाही. कारण , त्यांची विचारसरणी आधी नमूद केलेल्या मुद्द्यांना धरून त्यांच्यासाठी योग्य अशी  असते .
सेविंग्ज मध्ये १२ लाख असणारा माणूस घेईल ती आर्थिक रिस्क २ लाख सेविंग्ज वाला घेऊ शकणार नाही. डिहायड्रेशन जास्त होतंय हे वेळीच लक्षात येऊन डॉकटर दाम्पत्य घरीच एक बाटली सलाईन आणि औषधे घेऊन,  २ तासात टुणटुणीत होऊन संध्याकाळी ओपीडी ला बसेल (माझ्या डॉकटर आत्या - काकांकडे हे बघून मला हे "used to" झालंय !!! ) पण म्हणून मेडिकल बॅकग्राउंड नसलेल्या माणसाने वरून पाणी पिऊन अंगावर काढले तर हे जीवावरच बेतणार ! तर , समस्या कोणत्याही असोत - " मॉडेल " हे आणि असच असत.

Thursday, September 15, 2016

मी , मराठी आणि इंग्लिश

मी पुण्याची आहे. पुणे हे सौस्कृतीचे माहेरघर म्हणले जाते. अर्थातच आमच्या पुण्याचे वागणे -बोलणे सर्वश्रूत आहेच !
अनेकदा लोकं विचारतात , माझ्या भाषेविषयी ! "तू टिप्पीकल पेठी बोलतेस , बोल ना "....  असेही सांगणारे भेटतात. आणि "अक्सेंट छान मारतेस😍 " असे सांगणारे पण आहेत. लोकहो ...  ह्या साऱ्याचे श्रेय माझ्या "bringing -up" ला आहे. नारायण पेठेतील जन्म , तिथले बालपण, मराठमोळे ब्राह्मणी वातावरण अशा अनेक गोष्टी माझ्या उपजतच ठसकेबाज बोलण्याला मिळाल्या.

इंग्लिश विषयक किस्सा मस्तच आहे ! शाळेत असताना एकदा रस्त्यावर एका माणसाला सुनावले ... बारकी पोरगी म्हणून आगाऊपणा करून अंगावर सायकल घातली माझ्या ! मग , आईला धक्का बसला ! ही इतकं फाडफाड इंग्लिश कशी बोलते ! :)

मला खूप संताप आला की मी आपोआप इंग्लिश मधून सुनावते, हा अनूभव १-२ लोकांनाच असल्याने आवर्जून नमूद करत आहे ! :)) इतक्या टोकांपर्यंत मी कधी चिडत नाही :))

तरी , टिपिकल पुणेरी शोभेल अशीच माझी प्रोफाइल आहे.  अत्यंत हुशार  मेडिकल प्रॅक्टिशनर , स्पीकर , लेखिका म्हणून मी कार्यरत आहे. अस्खलित मराठी चे बाळकडू च आम्हाला मिळालेले आहे. तरी देवकृपेने मराठी लेखिका म्हणून गेली ८ वर्षे अनेक नियतकालिके , मासिकांमधून हेल्थ , ज्योतिष , आध्यत्म विषयक लिहिता आले ; त्याला वाचकांचा व संपादकांचा उत्तम प्रतिसाद आहे !
इंग्लिश जणू दुसरी मातृभाषा ! अभ्यास आणि सर्व कामकाज इंग्लिश मधेच होते. ब्रिटिश लोकांनी राज्य केले तरी अनेक सुंदर गोष्टींचा मिलाफ आमच्या दोन्ही सौस्कृतींमध्ये आहे ! काही सुंदर खाण्या पिण्याच्या गोष्टी , भाषेची सरमिसळ , भारतातल्या पुरातन पण आजही मजबूत असणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारती इत्यादी !

सारांश म्हणजे , भारतात काम करणाऱ्या हुशार लोकांना इंग्लिश म्हणजे दुसरी मातृभाषा च ! आमचे युरोपातल्या लोकांसारखे नाही . आम्ही आमच्या प्रांतवार मातृभाषा अस्खलित बोलतोच , हिंदी आमची राष्ट्रभाषा आणि आणि इंग्रजी आता आमचीच झालेली आहे ! तरी भाषांचे हे नाते जोपासणे आणि फुलवणे याचा मला मूळातच छंद आहे. 

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...