loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label affirmations. Show all posts
Showing posts with label affirmations. Show all posts

Saturday, February 4, 2017

हैप्पी लिव्हिंग , कीप स्मायलींग

happy living keep smiling
एकदा येन - तेन  निमित्त्यानं महिला मंडळाच्या गप्पा कानावर पडल्या. मजेशीर आणि माझ्यातल अभ्यासू कुतूहल जाग्या करणाऱ्या ! गूण आला नाही म्हणून डॉकटर बदलणाऱ्या ; पण गुरुजी आणि ज्योतिषांच्या नियमित वाऱ्या करणाऱ्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ! भारी ए नाही !
विषय गंभीर आहे. प्रत्येक कॉमन मॅन ला वाटते, आपला कस सुरळीत व्हावं. शिक्षण , नोकरी , पैसे , घर , लग्न , पोरं इति. मग मनासारखे काहीही घडत नाही , अडथळे येतात किंवा विलंब होतो तेव्हा समस्या निर्मिती होते. थोडक्यात काय , मनासारखे न घडणे म्हणजे समस्या ! इथे सारेच काही कागदावरच्या रेषेसारखे सरळ नसते , आपलं आणि इतरांचे आयुष्य वेगळे असू शकते हे मान्य करण्याचीच मनाची तयारी नसते ! मग होते ते “दुःख” ! एखाद्या समस्येवर मार्ग काढणे हे मग सुचतच नाही ! कारण , डायरेकट किंवा इन्डायरेकट तुम्ही सफर होत असता. साधे उदाहरण , शारीरिक क्षमता कमी झाल्याने साध्या सर्दी -खोकला -तापातही नेहमी इतके १००% जोमाने तुम्ही काम करू शकत नाही. काही माणसे काम करणारच नाहीत , काही उशिराने सुरु करतील , काही रेटून नेतील " कुछ नही होता " म्हणून ! तरी , एखाद्या समस्येला / प्रसंगाला तुम्ही कशा पद्धतीने बघता , कशा पद्धतीने हाताळता या गोष्टी अनेक मुद्दांवर अवलंबून असतात. कोणत्याही समस्येत तुम्ही असाल तरी ह्याचे “मॉडेल” असेच असते. शारीरिक , बौद्धिक ,  मानसिक , भावनिक , सामाजिक , आर्थिक मुद्दे इथे महत्वाचे ठरतात.  तुमचे मूळचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव तर यात अत्यंत महत्वाचा ! मग विशिष्ट परिस्थिती मध्ये तुम्ही कसे वागता , हे तुमच्यासाठी योग्य असते. परंतु साऱ्यांनाच हे योग्य वाटत नाही. कारण , त्यांची विचारसरणी आधी नमूद केलेल्या मुद्द्यांना धरून त्यांच्यासाठी योग्य अशी  असते .
सेविंग्ज मध्ये १२ लाख असणारा माणूस घेईल ती आर्थिक रिस्क २ लाख सेविंग्ज वाला घेऊ शकणार नाही. डिहायड्रेशन जास्त होतंय हे वेळीच लक्षात येऊन डॉकटर दाम्पत्य घरीच एक बाटली सलाईन आणि औषधे घेऊन,  २ तासात टुणटुणीत होऊन संध्याकाळी ओपीडी ला बसेल (माझ्या डॉकटर आत्या - काकांकडे हे बघून मला हे "used to" झालंय !!! ) पण म्हणून मेडिकल बॅकग्राउंड नसलेल्या माणसाने वरून पाणी पिऊन अंगावर काढले तर हे जीवावरच बेतणार ! तर , समस्या कोणत्याही असोत - " मॉडेल " हे आणि असच असत.

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...