After a long time had a loooooooooooooooong interactive telephonic conversation with my school best friend. Yes! A realization.! I guess i got exact thread in my hand from where we might lost ourselves..! we are so much involved RIGHT NOW in the world world us; may be few joyful moments, may be few tensions, may be ....what soever..!!
I have no clue about others but what me and my best friend used to do in school was a very fantastic discussion about every thing that we thought is new, that we thought something to learn from, that we thought as a mistake may be... ! Right from school homework to playground stuff, tiffin group problems ..
Actually No subject as such .... but our discussions were fair enough to touch each and every subject..That was an age where maturity per say really develops. we were school going kids, our problems, or our level of categorizing something as "Serious/learning experience" was different. Today we are....Ohhh...! Pretty well grown up adults about to get marry... young, generous, smart, new generation in our families..
Yes! we are changed. our working scenarios , various circumstances we had gone across, our fields are changed, style of living has changed. we used to meet each other. but we were not' WE"
we were two girls knowing each other well, two childhood friends... That's it!But today Ketki in me was talking to "SHE" in my friend.
See, writing this post after a long time! this means i was just living my life for the sake of living. what we usually do are the duties towards family, towards profession. we relax because we need a break from daily schedule. if u are thinking in real manner, u analyze, u discover, u learn. Actually, as we grow , life starts offering more responsibilities. where we need to think about seriously-not only seriously but generously. May be what i can point out in my life is reduced frequency of such an interactive sessions. But as a grown up, i must find out exact solution on it.
Knowing yourself is what is important.
In simple words, creation can never be there unless you are "YOU". we do say each other like "Yes! you are changed! " But this change should not be of loosing one or two excellent cuts of your personality . Achieving something new is all together diff. aspect which can be a welcome change. But We should never loose "WE" ....... Catch these kind of unique moment and keeping the process is what is a challenge in front of you. "WE" are very precious to someone..
All right. Lot many things i realized and i guess it's a peace. When you are unsatisfied or having half of the knowledge ; mind continuously revolves around the thought and a moment comes where in you can feel "Brain-beats " .. So, I think i will definitely stop writing this post.
Showing posts with label stress management. Show all posts
Showing posts with label stress management. Show all posts
Wednesday, May 12, 2010
Sunday, October 4, 2009
"Antibiotic "

कधी वाटले तर इतके लिहावेसे वाटते कि काय लिहू आणि काय नको ! लिहिताना खूप काळजी देखील घ्यावी लागते. स्वतःची तत्वे जपून लिहिणे हे एक आव्हान आहे माझ्यासाठी.कारण माझी तत्वे.. !! तर.. आज चा विषय..
काहीतरी अधुरे असे वाटते . कुठेतरी परफेक्शन नाहीये. काहीतरी मिसिंग आहे .रात्री ..भर रात्री गाडीवरून मस्त भुर्भूरायला मज्जा येते... झकास.. !!काय मस्त वारे असते ! रस्त्यांवरची ती शांतता, ते वारे.. काही मुले गप्पा मारताना, काही लोक हॉटेल च्या बाहेर.. कोपर्यावरच्या जूसवाल्या हातगाडीवर गर्दी.. उत्तम.. !! पहाटेचे ते वारे आणि ते वातावरणच वेगळे असते. फिरून असे येताना मस्त पैकी रेंगाळत गरमागरम कॉफी घ्यावी ……. रात्री ११ च्या सुमारास.. सकाळी उठण्याचे टेन्सन नसावे.. :)
असे काही क्षण देखील आयुष्य जगण्यासाठी "Antibiotic " देऊन जातात.. हाहा !!
अश्या निवांत क्षणी विचार करायचे कि नाही, विचार कसे आणि कशाचे करायचे याचा विचार करता येतो..
" काहीतरी नाही असे खूप काही आहे बुवा .. !! "
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म........... "Antibiotic ".. कॉफी..वारे....पाऊस...
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.............. :D
Thursday, September 10, 2009
"ऑफ़ीस"........

"ऑफ़ीस"........
काय येतं आज डोळ्यांसमोर ""ऑफ़ीस" म्हणल्यावर ...!! बहुतेकांच्या चेहेर्यावर आठ्या.. त्रस्त भाव. कधी एकदा तो रविवार येतो याकडे लागलेले डोळे..
तरुण सुकन्या घड्याळाकडे बघत राहिलेल्या दोन तासांपासून २ मिनिटांपर्यंत चा वेळ मोजतात.. मोबिईल वरच्या कॅलेंडरकडे बघत कधी सिहागड तर कधी तुळशीबागेचा प्रोग्राम ठरवतात. सगळ्या आई घरी जाऊन कोणती भाजी करायची आणि सकाळसाठी कोणती निवडायची याचा विचार करतात. मुंम्बापुरीच्या ट्रेन मध्ये भाजी निवडण्यापासून घरकामाला सुरुवात होते.. अहो - रात्री ८ ३० नंतर घरी पोहोचून काय-काय करणार..! पुरुष लोक वेळेवर घरी पोहोचता पोहोचता सामानाची यादी चाचपडत कधी सोसायटीच्या मीटींगला कसे पोहोचणार या लगबगीत असतात; तर कधी सकाळ च्या पेपरातल्या ठळक बातम्या का होईना पण रात्री वाचाव्यात असे मनसुबे करत घरी येतात.
उच्चशिक्षित अथवा श्रीमंतांचेही या घड्याळाच्या काट्यावर नाचणे चुकत नाही ... कधी पार्लर , कधी कींटी पार्टी , कधी हि न ती मीटींग- नांहींतर साल्साचे क्लास.. मग यात "ऑफ़ीस" म्हणजे रेमंड चे ब्लेझर , फोर्माल कपडे, रात्री च्या पार्ट्या , टार्गेट अचीव करण्यासाठी तारेवरची कसरत. कोण कधी "बेंच वर" येईल सांगता येत नाही !
"ऑफ़ीस" म्हणजे रात्रंदिवस समोरचे ते ड्बडे ( संगणक) , महीना-अखेर, राजकारण , ९-१२ तासांचे काम, जेवणाच्या वाट्टेल तश्या वेळा, कॅन्टीन मधले पीझ्झा-बर्गर आणि कोकच्या बाटल्या. गलेलठ्ठ पगाराच्या गलेलठ्ठ नोकर्या !
.......... तरीही.......का हरवल ए "ऑफ़ीस" ????? ....................................
चाळीतल्या सुमी ला नोकरी लागली म्हणून तिला बस खाम्ब्यावर सोडायला जाणारी कुमी आणि "जपून जा गो पोरी ....." सांगणारे आण्णा आणि आप्पा आज हरवलेत ! कारकुनाची नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारा जयवंत आज हरवला ए.. "ऑफ़ीस" मधला चहा देणारा गणू आज हरवला ए..
बॉसची नजर चुकवत कोपर्यावरचा कटींग चहा घ्यायला पाळणारे राघव आणि त्याची चांडाळ-चौकडी आज हरवली ए. "गुड मोर्निंग-गुड आफ्टरनून "च्या नादात " देशपांड्या,पाध्या,टकल्या आणि कुसुम ताई " आज हरवल्याएत .. मंगळागौरीच आमंत्रण देणारी लांब वेणीतली वसुधा आणि खांद्या एवढे केस भूर-भुरात चालणारी गोखल्यांच्या वाड्यातली लतिका कुठेतरी हरवली ए.. कधीही हाक मारायला सैदैव मदतीला येणारा गल्लीतला उडाणटप्पू सद्दाम कुठेतरी हरवला ए.. गणपती चे कार्यक्रम बसवायला "ऑफ़ीस" नंतर जमणारा शीर्या, मंग्या आणि त्यांचा कंपू कुठेतरी हरवला ए..
साडे दहा ते साडेपाच काम करून दमून घरी येणारा मध्यमवर्गीय माणूस कुठतरी हरवला ए .. ४ रुपयांच्या तिकीट काढून बालगंधर्वला नाटक बघणारा एक कुटुंब-वत्सल माणूस कुठेतरी हरवला ए....
१२ तास काम करून मिळणाऱ्या ५०-७५ हजारांच्या बदल्यात कचेरीतले २०० रुपये आज हरवलेत.. केवढी मोठी किंमत .. !! आख्ख "ऑफ़ीस" च हरवला ए.. !!
Labels:
Discussion,
Enjoy,
ketki itraj,
life,
marathi lekh,
Office,
stress management,
Think,
thoughts
Sunday, September 6, 2009
"शांतता " ..
दूसरी पोस्ट या ब्लॉग वरची..लोक म्हणतील नवा ब्लॉग.. नीदान न्वाचे नौउं दीवस तरी अपडेट ठेवावा! पण नाही हो ; 'आयुष्यावर' लीहायच म्हणून लीहीता येत नाही.कधी वाटते एक नीरव शांतता हवी.. गर्भ-रेशमी रात्रीसारखी.. शांत; पण हळुवार, मखमली ..!! कधी भर दुपारी देखील केवळ डोळे मीटून पु. लं. ची "Nilaee" अनुभवता यावी.. शांत.. खोल.. प्र्सन्न .. आल्हाददायक.. निलीशाआआआर ..! कधी मात्र ती असावी शांत, थंडगार, पवित्र.. अन्थाकारानाच्या आर-पार जाणारी.. घंटानादाने मंगलमय होणारी ..!! कधी स्नीगह्द.. बर्फाल्ललेली..
खोलीतल्या फुलदाणीतील फुले देखील कागदी भासवीत अशी.. जणू काही आयुष्याच्या कॅनवास वर फ़ीकट दगडी रंगाचा वश दिल्यासारखी.. !
शांतता.. निव्वळ शांतता म्हणावे आणी ही -न -ती कित्येक नाना-विविध रूपे दत्त म्हणून समोर उभी .. ! काही रूपे भीषण आणी अभद्र देखील.. !! एकांत हा शांततेचाच एक भाग. छोटे पिल्लू म्हणतात यावे असा! एकांतात असो-नसो ; पण आजकाल बहुदा सारे शांततेच्या शोधात असतात इतके मात्र नक्की.
शांतता " शोधा म्हणजे सापडेल " यानुसार आचरण करते असे माझे व्यक्तीशा म्हणणे आहे. काहींना शोधावी लागत च नाही .ती असतेच मुली त्यांच्याकडे. काहींना ती मिळवता येते. काहींना काळातच नाही आपण काय शोधात आहोत.. ! काहींना या शांततेचा गांध्मात्र ही नसतो .. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हनतात .. त्यामुळे बराच जणांना या शांततेच शोधच लागत नाही. काही लोक व्यर्थ घुटमळत राहतात; बाजारभावात शांतता शोधताना .. !! बिग बझार च्या सवलतीत बुधवारी एका वर एक फ्री मीळणारी ही गोष्ट नव्हे हे वीसरून .. ;)
................... असो .. मला नीदान कळले तरी .. शांतता शोधतय हो मी.. !
Thursday, September 3, 2009
आयुष्य .... !!
आयुष्य .... !!
आयुष्यावर आजवर खूप लोकांनी खूप काही लीहीले आहे. आयुष्य हे कोणाला समुद्रासारखे अथांग नीळेशार वाटले ; तर
कोणी आयुश्याला ऊन-पावसाचा खेळ म्हणले. कोणी तर आयुष्याला आपला गुरू मानले. कोणी मात्र आयुष्याला अगदी
दुतासारख्या जुगाराची उउप्मा दिली . पण कोणी त्यातूनही मखमली धाग्याने रेशमी-शेले वीणले.... आठवणींचे...!!
हे आहे माझे 'आयुष्य" .... आयुष्य माझ्या नजरेतून .. माझ्या शब्दांतून ..
जमल्यास आयुष्य काहीसे नव्याने जगण्यासाठी ... जमल्यास काही कोडी उलगडण्यासाठी .. खूप काही शीकण्यासाठी ...
आनंदातला आनंद खार्याने उपभोगण्यासाठी .. दुखाच्या फोडनीने काही क्षण चवीने चाखण्यासाठी ..
........... खर्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी .. !!
आयुष्यावर आजवर खूप लोकांनी खूप काही लीहीले आहे. आयुष्य हे कोणाला समुद्रासारखे अथांग नीळेशार वाटले ; तर
कोणी आयुश्याला ऊन-पावसाचा खेळ म्हणले. कोणी तर आयुष्याला आपला गुरू मानले. कोणी मात्र आयुष्याला अगदी
दुतासारख्या जुगाराची उउप्मा दिली . पण कोणी त्यातूनही मखमली धाग्याने रेशमी-शेले वीणले.... आठवणींचे...!!
हे आहे माझे 'आयुष्य" .... आयुष्य माझ्या नजरेतून .. माझ्या शब्दांतून ..
जमल्यास आयुष्य काहीसे नव्याने जगण्यासाठी ... जमल्यास काही कोडी उलगडण्यासाठी .. खूप काही शीकण्यासाठी ...
आनंदातला आनंद खार्याने उपभोगण्यासाठी .. दुखाच्या फोडनीने काही क्षण चवीने चाखण्यासाठी ..
........... खर्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी .. !!
Labels:
ketki itraj,
life,
marathi lekh,
Relaxation,
stress management,
Think,
thoughts
Subscribe to:
Posts (Atom)
Our Partners Indiblogger
कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट
मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...
