loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label marathi writers in pune. Show all posts
Showing posts with label marathi writers in pune. Show all posts

Sunday, June 22, 2014

माणसांच्या गर्दीत ...


माणसांच्या गर्दीत हरवले की सारे विचलित होते , आणि मग माझ्या लिखाणाचे खंड व्हायच्या ऐवजी लिखाणात भला मोठा खंड पडतो . अरे जमाना टेक्नोलॉजी चा आहे , नवे नवे मॉडेल्स रोज बाजारात येत असतात . माणसांची देखील फारच नवी नवी व्हरायटी बघायला मिळतेय. माणूस उत्क्रांती च्या उलट्या फेर्यात आहे हे मी माझ्या कार्यक्षेत्रातील भाषणांमधून , सेमिनार मधून अनेकदा सांगतेच . च्या मारी ! खरेच माणसाची मनेदेखील अधोगतीकडे चालली आहेत. " Evolution & Theories  ऑफ Evolution " आम्ही शिकलो होतो. त्याच्या नोटस देखील माझ्याकडे आहेत . एक थिअरि सांगते , complexity to simplicity हा उत्क्रांतीचा मार्ग आहे. उदा. complex रचना असणारी फुले आणि अत्यंत सोपी , स्पष्ट रचना असणारी फूले  हे अनुक्रमे उत्क्रांतिचे सुरुवातीचे आणि अखेरचे बिंदू . मग complex मने ही अधोगती ची कास धरलेले मानवी मनाचे लक्षण का समजू नये ?

Wednesday, February 12, 2014

खड्डा

 खड्डा

प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा हा अतीव महत्वाचा  असतो.
खड्डा ह्या गोष्टीचा नेमका अर्थ जे पुणेरी लोक याचा चपखल वापर करतात त्यांनाच माहित असून बाकीच्यांना याचा सुगावा देखील लागत नाही ; या गोष्टीचा भयंकरच फायदा होतो. तणाव - नियमन , Anger - Control & Stress Management वगरेंच्या कार्यशाळेत जाण्याची गरज पडत नाही. राग आल्यास मोठ्याने हसणे वगरे तत्सम गोष्टींची चित्रपटात बघून सवय करून घ्यावी लागत नाही. आयुष्यात अनेक अमुलाग्र बदल घडविण्यासाठी " खड्डा " अतिशय महत्वाचा ठरतो. आजच्या जगात वय वाढण्याच्या लक्षणांमध्ये केस पांढरे होणे , सुरकुत्या पडणे इत्यदि बरोबरच मनापासून निखळ हसण्याचे प्रमाण कमी होणे हा देखील निकष महत्वाचा ठरत आहे. तरी या अनुशंघाने विचार केल्यास मनापासून खळखळून आणि उफाळून -उफाळून हसवण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा शब्द " खड्डा" - हा चिरतारुण्याचे रहस्य

Wednesday, February 6, 2013

" माम अनुस्मरम युधश्च्य "

       आयुष्यातली आपली priority कशाला आहे ? फार विचार करावा असे नाही.  थोडक्यात म्हणजे आपले सूख कशात आहे ?प्रत्येकाचे सूख समाधानात आहे. सूख मिळेल का हो बाजारी ?? !! कधीच नाही !
कारण सूख आणि समाधान म्हणजे गोगल गाईच्या पाठीवरचे घर !
        मी लहानपणी कित्येक वक्तृत्व स्पर्धांत , निबंधात अनेकदा वापरले असूनही मी हे का विसरते !
                          "तूझे आहे तुजपाशी ; तरी तू जागा चूकलासी" .......  :)
समाधान पैशात का कधी मापता येईल ? पारड्यात का कधी तोलता येईल ? मार्कांच्या बेरजेत का कधी गवसून जाईल ? परा आणि अपरा ..... ! अशाश्वत , क्षणभंगुर गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे मोह. मोह आला की सूडचक्राचे अविरत चालणारे चक्र सुरु ! जो अडकला , गुंतला .....तो  गुंतलाच ! 
स्वतः च्या कर्मावर विश्वास ठेऊन अथक परिश्रम करीत राहणे ; एवढेच काय ते आपण करावे . बाकी सारे "त्याच्यावर!"
                               " माम अनुस्मरम युधश्च्य " ..............


Friday, January 25, 2013

महाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ


     रामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप !
सत्युगात एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरी ने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !
               



           युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.

Monday, October 22, 2012

गाडी लागते ? प्रवासाची भीती ? माझ्या काही टिप्स - थेट माझ्या अनुभवातून !

पूर्व तयारी करताना :
१. गाडीत प्रवासासाठी बसण्याआधी १ - दीड तास आधी कोरडे , कमी मसाल्याचे खाऊन घेणे.( कोरडा नाश्ता )
२. चहा / कोफी / लिंबू सरबत मुळीच घेणे नाही.
३. उपाशीपोटी मुळीच प्रवास करू नये.

प्रवासात :
१. जास्त पाणी / पात्तळ पदार्थ नको. कोल्ड ड्रिंक्स , मिल्क शेक , जूस , मिल्क , ताक, लस्सी नको

Tuesday, October 9, 2012

बनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी

सौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात . एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्पनातीत वाटेल असे सारे जिवंत वर्णन. आजकालच्या मॉल सौस्कृतीतल्या मुलांनी आव्व्र्जुन वाचावे असे पुस्तक.
आयुष्य म्हणजे काय , आयुष्य जगताना अडचणी येतात म्हणजे काय , कागदावर रंगाच्या जितक्या छटा असतील ; तितक्याच किंबहुना जास्तच छटा आयुष्याच्या हि असू शकतात. खरोखरीच असा अनुभव घेणा शक्य नाही , घेणे आपल्याला मावणार- सोसाविनारही नाही ;)
गाव , गावातील धनगर आणि इतर उद्योग करणारा समाज याची पूर्व- परंपरागत असणार गाव- रचना . गावातील समूहाचे वागणे , राहणे , हसणे , खेळणे. हसू आणि आसू एकत्र झेलणे. खूप काही वेगळे वाचनात येते. आणि माडगुळकर यांची ग्रामीण भाषा शैलीवरील प्रचंड पकड हर एक पत्र आपल्या समोर जीवन , चालते-बोलते करून ठाकते.

Friday, May 27, 2011

लहानपण देगा देवा ...........

हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच  गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते. 
     गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. ! 
     तस म्हणलं तर प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. कोणीतरी कोणालातरी त्रास देत असत. कोणीतरी कोणाचा तरी खांदा शोधत असतं. मग त्रास देणारेच खांदा देणारे का नाही होऊ शकत ? त्रास देणार्यांना असा वागण्यास कोण प्रवृत्त करते? यशाची अतिरिक्त हाव , सौज्ञा हरविलेले यश शोधण्याची व्यर्थ धडपड , चुरस , इगो,  पायखेची मनोवृत्ती, दडपण , एकाकी पण , व्यसनाधीनता , सारासार विचार करण्याची क्षमता हरविणे, गैर मार्गाने विचार करणे.... आणि बस ! चक्र सुरु ! 
      केवळ मनातून स्वच्ह राहिल्याने जगातील कित्येक हृद्य विकार टाळतील, माणूस  मन्सासची माणसासारखा वागल्याने तणाव, दडपण आणि कित्येक मनोविकार टाळतील. काम करणे आनंदमय होईल , एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुण करता येईल. 
     तम वृत्तीच्या , वाम मार्गाला लागून आपण स्वतः आपल्या आयुष्याचे नुकसान करीत आहोत. कोणी वाचलच हे लिखान , पटलच यातलं काही, तर सुरुवात करावी स्वतः पासून.
    मनाशी म्हणून नका, असा वागला तर आमचा टिकाव कसा लागणार ! Define your definition of Success . कोणी वाईट वागल्यास आपण टिकाव धरू शकणार नाही असे वाटले , तर तोलावे स्वतःला आणि अपेक्षांना. बघावे समाधान . योग्य मार्गांनी मिळविलेले अमुक एक माझ्यासाठी समाधान कारक आहे ; हे जर कोणाला वाटलं तर मला नक्की कळवा. 
     असा एक प्रामाणिक रिप्लाय ; हे खरे यश असेल.
     


Saturday, March 19, 2011

Terrified Japan @ 2011 .................. !!

       10 सेकंदात आपल्याला जीवन देणारे पाणी होते-नव्हते ते सारे गीलान्गृत  करू  शकते  ; याची अनाकलनीय  प्रात्याक्षिके म्हणजे जपान मधील निसर्गाचे हे रौद्ररूप ... !! 
     हिरोशिमा च्या बॉम्ब नंतर झालेली परिस्थिती आणि आत्ताची भीषणता म्हणजे ज्पानिच्न्ह्या अचाट धैर्याच आणि खंबीर पणाचं उदाहरण !  केवळ काही क्षणात नदीत शेवाळ हेलकावे खात असावे, असा दृश्य ; ज्यामध्ये पात्यान्म्ध्ली घर भासवीत अशी घर आणि त्यात असणारी माणसे हेलकावत होती !
     केवळ दहा सेकंदात इतक्या भल्या मोठ्या राष्ट्रातील ती विपुलता  ९ रिश्टर च्या धक्याने मुळापासून हलवून ठेवली ! राष्ट्राच्या प्रगतीचे आणि विज्ञानाचे द्योतक ठरणारे atomic reactors आजच्या पिठीचे आणि कदाचित पुढच्याही काही पिढींचे भवितव्य प्र्श्नाचीन्हांकित करणारे ठरले ! जागतिक मैत्रीचे हात पुढे सरसावून माणुसकीची पुन्हा एकदा पहाट झाली.
     विनाश्कली प्रल्यान्शिवाय आपण कधीच या गोष्टी शिकणारच नाही का ? असे राहिले तर कित्येकांनी वर्तवलेले डिसेम्बर २०१२ प्रत्यक्षात उतरूही शकेल? याची एक झलक होती का ही ?
     सुन्न करणारे वास्तव आणि जपानीच्या खाम्बिर्तेचे कौतुक ; याशिवाय पुढे शब्दच नाहीत ....... !!

 

Saturday, March 5, 2011

सुख आणि दुखः ...


आयुष्यातला हा एक कोपरा. सुख आणि दुखः !

आज आम्ही बाग बघत होतो त्यांची . ओळखीची , अनोळखी एक न अनेक चिक्कार झाडे, रंगीबेरंगी फुले .. . प्रत्येकच रंगरूप वेगळा आणि त्यांचा स्वतःच असा वेगळेपण होतं. कित्यिक जुन्या आठवणी हरेक वासाच्या झुळूकेनिशी दडून आल्या. गप्प्पा , बडबड यांमध्ये वेळ कसा निघून गेला कळलेच नाही !
  घरी येऊन रूम मध्ये बसले ; नेहमीसारखा निवान्त पणा , वार्रयाची झुळूक , गल्लीत ली तुरळक लोकांची हालचाल ; एक ओळखीच , विश्वासाचं , आपलेपणा वाटणार असं ते वातावरण ! पण समोर नजर जाताच वाटलं ती रंगीबेरंगी फुले माझ्याकडे का नाहीत ! एक एक रंगचाता किती लोभस , हवीशी वाटणारी ! खूप विचार केला , कुठली खाते घालावीत पासून कुह्तली झाडे लावावीत इथपर्यंत ! ऋतू , हवा , पाणी , अजून काय काय करू काय नको .. विचारात अंधार कधी झाला कळेना . झोपताना उशासारखा हाच एक विचार . कुशीवर कूस बदलत होती , टीक-टीक करणारे घड्याळ हि दुडू - दुडू पुढे प्लावेसे पळत होते.
             किती वेळ लागली कि नाही लागली झोप कोणास ठाऊक ! फाटे जग आली अन पडदा सरकवला .. आह्हा !! कित्त्त्तत्ती टवटवीत हवा , पहाटेचा एक वेगळाच तजेला घेऊन ..! झोप झाली नसली तरी परत लोळत पडावेसे नी वाटले मुळीच . भला मोठा ग्रील उघडून नुस्ती उभी राहिले खरी. हातावर वार्याच्या झुळकेने किंचित हलणारा कडीपत्ता लहान मुलाने खुनावावे तसे खुणावत होता. केवढा मोठ्ठा झाला हा कडीपत्ता ! कोपऱ्यात बघितले ते जरबेरा सारखे दिसणारं एक राणी कलर च फुल तुकतुकीत उभा होतं ! म बघितलाच नाही काळ ! वास नाही म्हणून ! कि ते एकटाच दिमाखात उभा होतं म्हणून ! आणि एवढ्या सगळ्या हिरवळीत ते लालचुटुक फुल कसं राजबिंड तोरा मिरवत होत ! आणि त्या पर्यटक झाडाच्या पानांची देखील कशी नाना - विविध रंग छतांची कशी स्पर्धा चालू होती जणू ! आणि त्या हिरवागार मोगऱ्याला बाई ! किती त्या चिमुकल्या कळ्या ग त्या .. !  लपून बसल्या होत्या त्या पानांच्या हिरवळीत ; म्हणून म त्याही नाही बघितल्या !
                     कधीही पाणी न घालता तलवारी काढून उभारलेला कोरफड एकमेव . कितीही तीव्र उन्हाळ्यात तितकाच गारवा देतो डोक्याला लावला की ! उंची भर वाढलेला हाच कडीपत्ता पोहे कसे झकास फक्कड करतो ! इमारती खालून  लांब वर पहिला तरी तो लाल चुटूक लॉरेन्स सगळ्यांच्या नजरेत भरतो . एक चिमणी मोगर्याची काळी केवढा तरी सुगंध अंड शांत पणा देते !
                     सगळकाही असण्यापेक्षा आणि काहीच नसण्यापेक्षा ; माझ्याकडे खूप काही होतं . बघायचं राहून गेलं; की काळोखामुळे नजरेतून निसटत होतं कोणास ठाऊक !

Sunday, October 4, 2009

"Antibiotic "


कधी वाटले तर इतके लिहावेसे वाटते कि काय लिहू आणि काय नको ! लिहिताना खूप काळजी देखील घ्यावी लागते. स्वतःची तत्वे जपून लिहिणे हे एक आव्हान आहे माझ्यासाठी.कारण माझी तत्वे.. !! तर.. आज चा विषय..

काहीतरी अधुरे असे वाटते . कुठेतरी परफेक्शन नाहीये. काहीतरी मिसिंग आहे .रात्री ..भर रात्री गाडीवरून मस्त भुर्भूरायला मज्जा येते... झकास.. !!काय मस्त वारे असते ! रस्त्यांवरची ती शांतता, ते वारे.. काही मुले गप्पा मारताना, काही लोक हॉटेल च्या बाहेर.. कोपर्यावरच्या जूसवाल्या हातगाडीवर गर्दी.. उत्तम.. !! पहाटेचे ते वारे आणि ते वातावरणच वेगळे असते. फिरून असे येताना मस्त पैकी रेंगाळत गरमागरम कॉफी घ्यावी …….  रात्री ११ च्या सुमारास.. सकाळी उठण्याचे टेन्सन नसावे..  :)
असे काही क्षण देखील आयुष्य जगण्यासाठी "Antibiotic " देऊन जातात.. हाहा !!

अश्या निवांत क्षणी विचार करायचे कि नाही, विचार कसे आणि कशाचे करायचे याचा विचार करता येतो..
" काहीतरी नाही असे खूप काही आहे बुवा .. !! "

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म........... "Antibiotic ".. कॉफी..वारे....पाऊस...

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.............. :D

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...