loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Wednesday, March 20, 2013

Dress Colours

Red - Strength , productivity, power, energy, passion, high sexual energy.
Blue- Trustworthy, Loyal, Happy, Calm, serene
Black- Mystery, Seduction, Prestige
Green- Compassion, Abundance, Harmony
Yellow- Spontaniety, Enthusiasm, Cheer fullness
White- Innocence, Luxury, Simplicity, Positivity

Monday, March 18, 2013

एक उनाड संध्याकाळ


शनिवार. १६ मार्च २०१३. पूर्व नियोजनाशिवाय आईन्वेळी ठरवून एफ. सी. रोड गाठायचे ठरले. आभाळ ढगाळलेले ;( thanks for god ) उन्हाचा लवलेश नव्हता . पूर्वी गरवारेला असताना दर शनिवारी black घालायचो ; ठरवून :) या शनिवारी न ठरवता black घातले आणि ते सेम पिंच झाले. पूर्वीसारखा टाइट top, black वर ऑफ व्हाईट जीन्स न घालता blue घातलेली . बंटी और बबली - मिरर वाली orange शबनम गळ्यात तिरकी आडकवलेली. काळ्या - निळ्या - पांढर्या  पायापेक्षा जराश्या मोठ्या पट्टेरी चपला घातलेल्या .

१. पुन्हा एकदा .....निघताना मिस कॉल
२. पुन्हा एकदा ....... मी गाडी नेताना बाबा ओरडत होते. गाडीची किल्ली उशीखाली ठेऊन प्रडले होते.
३. " तू परत धड्काव्णार कुठेतरी " म्हणत असताना मी गाडी काढली.
४. पुन्हा एकदा पाय पूरत नसताना भन्नाट गाडी मारली ! ;)
५. पुन्हा एकदा --- मी लेट च होते. ;) :-p
६. ग्रीन आणि ग्रे नेल पेंट्स च्या शेड च्या शेड उचलल्या.
७. दोघीत एक पाणी पुरी --- ( पैसे बचाव .... त्याबाबतीत मी बदलणार नाही :-p )
८. आवडले म्हणून एकाच टाइप चे २ tops घेतले. :)
९. बारगेन न केल्यामुळे काहीसे रुख रुख लागून राहिले.
१०. सगळ्या शेड्स आधी आईच्या नखांवर ट्राय केल्या :-p

स्पष्टीकरण :

१. माझ्या कोलेज मधील जुन्या मैत्रिणीलाच भेटले होते :-p
२. १० वर्षांपूर्वी मी फ्रेशर ड्रायव्हर असल्याने बाबा ओरडत. तेव्हा लायसन शिवाय मी पळवलेली गाडी आणि पुढचे दिव्य माझ्या त्या वेळच्या मैत्रिणीला अजूनही आठवेल ;-p  कारण कॉलेज ची लेक्चर्स आम्ही गरेज मध्ये अटेंड केली :-p

Sunday, March 17, 2013

माम अनुस्मरम युधश्च्य- Complete Article

रामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप ! एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरीने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !
      युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.
तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे लोक , त्यांच्या मनाची एक नाडी तो अचूक हेरून होता. सद्वर्तनी सहवासात राहणे सोपे ; मात्र प्रचंड विद्या , शक्ती , बल , सामर्थ्य , संपत्ती असणार्या एक नव्हे अनेक पातळयांत्रि, खल प्रव्रीत्तीच्या कुळांशी , अथि-रथी-महरथिन्शि , जेष्ठ, प्रिय-अप्रीयांशी , योध्यांशी , राजाकुलांशी कोणाचेही मन दुखावता त्याला सुधार्माने वागायचे होते. कृष्ण म्हणतो , " प्रत्येकाने पुण्य कमविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात तपस्या करावी असे मुळीच नाही . प्रत्येकाने आपल्या धर्माचे (अर्थात कर्तव्यांचे) पालन करणे हेच त्याचे पूण्य. नियती नामक काही नसतेच. प्रत्येक जीवाचे पूर्व - जन्मींचे आणि या जन्मीचे कृत्य त्याचे आयुष्य असते. म्हणूनच आपले आयुष्य घडविणे  आपल्याच हातात असते. " महाभारतातील बहुतौश  पात्रे थोर , महान , बुद्धिवान , कर्तव्यदक्ष होती. त्यांना , त्यांच्या मानवी-स्व्भाव्जान्य भावनांना योग्य ती दिशा देण्याचे काम फक्त कृष्णाचे. साऱ्यांत राहूनही सार्यातून वेगळा राहण्याचे कौशल्य त्या ईश्वरी अवताराचे.

Our Partners Indiblogger

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८ १. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत. https://www.google...

Listed on: link directory