loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Tuesday, August 5, 2014

Best Of Marathi Movies ... Ashok Saraf Rocks.... !काही मस्त मराठी सिनेमे - आवर्जून बघावेत असे . जेव्हा निवांतपणा , घरगुती टच , आपुलकी , निखळ करमणूक , स्वा - नंद हवा असेल तेव्हा  !

* प्लीज नोट  - अशोक मामा ( अशोक सराफ ) Rocks  ……………………………  !!


१. गुपचूप गुपचूप - प्लीज बाप पिच्चर . बोलायचेच नाही. अशोक सराफ as गोव्याचे प्रोफ़. धोंड , " च्या SSSSS किरेय ! म्हणत ट्राउझहर वर उचलण्याची स्ताइल , रंजनाचा रंगवलेला डबल रोल , रंजनाची बहिण म्हणून काम केले आहे त्याही काकू सुरेख - ज्या महेश कोठरेंशी लग्न करतात गपचूप , श्रीराम लागू उत्तम काम , शरद तळवलकर पुन्हा एकदा फारच बेस्ट काम , ते रंजनाच्या सांगण्यावरून झाडाला प्रदक्षिणा घालतात तो तर फारच बेस्ट जमलाय सीन , पद्मा चव्हाण नाईट गाऊन मध्ये फारच मॉड दिसल्या आहेत ! फॉरेन रिटन चे काम केलेला कलाकार पण बेस्ट , गोव्याच्या " ओशे … ! " म्हणणार्या आशालता, गुड्डी मारुती यांची कॉमेडी … सगळच उत्तम जमलेलं ग्रेट रसायन आहे हा पिच्चर !

२. बाळाचे बाप ब्रह्मचारी - अशोक सराफ , लक्ष्या , रे काका , सुधीर जोशी, निवेदिता  आहेतच. मर्फी rocks ….  ! किशोरी शहाणेच्या बाबांचे काम करणारे , TV दुरुस्त करायला घरी अशोक सराफ येतो तेव्हाचा सीन झकास ! आणि …. सरकारी नोकर बारीकसे ते काका - तोड नाही राव ! मस्त ! लक्ष्याच्या लायब्ररीचे ते क्लाएंट असतात आणि त्यांची मुलगी जाडी लक्ष्यावर लाईन मारत असते . अशोक सराफ लक्ष्याचा मामा बनून त्यांच्या घरी जातो तेव्हाचे सौवाद म्हणजे हसा आणि हसा फक्त  ! छान आहे मूव्ही . यात कांचन अधिकारी ने घारपुरे असताना ( लग्ना  आधी ) अभिनय केला आहे.

३. अशी ही बनवा बनवी - ए  ! लिहित का कोणी या मूव्ही वर ! सगळे प्रसंग म्हणजे हिट सीन , सुधीर जोशी rocks …  दारू पिउन घरी येतात तो सीन झकास ! ( Scene Video Added ) सगळंच आणि सगळेच बेस्ट

 !

video
४. शेजारी - शेजारी - " प्रश्न उत्तर असते नेहमी शेजारी शेजारी " गाणे  मला फार आवडते म्हणायला . भारी आहे. पूर्वीचे लाईफ स्टाईल मस्त दिसते यातून. मोठाले बंगले , निवांतपणा , बायकांची खरी मैत्री  :D , शेजार्यांची एकमेकांना मदत करायची प्रवृत्ती , झकास निवांत , आणि फारसा न बघितलेला छान पिक्चर आहे.

५. धुमधडाका - हा माझा all time fav. माझ्या भावाचा पण ! अरे  तोड  ए  का ! निवांत बंगला , मर्सिडीज …… आजही सातार्याला परमेश्वर कृपेने वातावरण , लोकं अशीच छान आहेत . अशोक सराफ ने बेस्ट actor चे सगळे निकष तोडत विक्रम केलेले आहेत . आवाजाची चढ - उतार , " व्याख्या -वूक्खू -विक्खी " खोकत बोलणं … बाआआअप ! माझा नमस्कार अशोक मामांना ! मला आयुष्यात एकदा जरी काम करायला मिळालं नं त्यांच्याबरोबर , आयुष्य सफल होण्यातला महत्वाचा बिंदू ठरेल ! आणि लक्ष्याचा हॉरर स्टोरी सांगतानाचा सीन . यातले तोंडाने काढलेले इफेक्ट्स चे आवाज नीट ऐका , यात पण अशोक मामांचे contribution आहे ! मी इथे attach करतेय video . All  time मूड - बूस्टर ! मला या सिनेमातले लोकेशन्स प्रचंड आवडलेत आणि . मला पण गुलाबाच्या बागा आणि द्राक्षाचे मळे घ्यावेसे वाटतात ! :) मला यातले भाहुतौश सौवाद पाठ आहेत. बाबा ओरडतात तरी आम्ही हा पिच्चर बघतोच ! हजारदा  :)) आणि ए प्लीजच ………  लक्ष्याचा dance आहे ना " त्रिकुट introduce करतोय वगरे …… च्या मारी झकास यार ! आणि काय म्हणजे पण किती -कित्ती भारी सौवाद लिहावेत अरे , काही तोड ! अशक्य भारी ! " तुम्ही इतक्यात जाणार नाही पपा ! ; सिनेमाची स्थळ शोधतोय करटा ! ; डोळस नाव त्या भूमिकेच - लक्ष्याचे लो  बजेट , चकणे , जाड भिंगाचा चष्मा वाले सिनेमा टीम मेम्बर !! " आणि डायनिंग टेबल वरची लक्ष्याची " लोणीदार गोष्ट ! " ……।
video


६.  दे दणादण - कोठारे स्टाईल कूल चित्रपट . प्लीज स्टार कास्ट विचारायचा नाही हा बावळट सारखा ! कोठारे म्हणलं की कळतं नं  ! :)

७. बिन कामाचा नवरा - पद्मा चव्हाण , अशोक मामा , रंजना , निळू फुले . ओल्ड स्टाईल . उनाडक्या करणारा नवरा असतो अशोक सराफ.

८.  गोष्ट धमाल नाम्याची  - यात परदा - फाश करतात ढोंगी बाबाचा . ( कुलजित पवार as ढोंगी बाबा )

९.  भूताचा भाऊ - प्रभावळकर + अशोक  मामा ! धमाल !

१०.आयत्या घरात घरोबा-  दिल , दोस्ती और XXX ( आठवत नाही आत्ता ) या हिंदी चित्रपटाची स्टोरी ८०% ढापून केलेला पण सुरेख पिळगावकर- सिनेमा . अशोक सराफ ची भूमिका सुरेख . शेवटची लाईन मूळ हिंदी चित्रपटात नाही " जगातला सर्वात श्रीमंत माणूस जात आहे.  " बाकी सारे उत्तमच !