loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, February 11, 2013

दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013

आता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत. सरकार , मध्यस्त यांमध्ये जनावरे , पीके आणि मनुष्य भरडले जात आहेत.

दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू  -

१. दुष्काळ आहे किवा नाही यावर वाद , शंका , मतभेद
२. किती टक्के , किती तालुक्यात यावर वाद , चर्चांना
३. पाणी पुरविणाऱ्या , जनावरांना चारा पुरविणाऱ्या व्यवस्थेवरून आणि व्यवस्थापनावरून वादंग चालू
४. लोकांना कित्त्येक ठिकाणी ८-१० दिवसातून एकदा पाणी मिळत. तुकाराम - या जितु जोशी च्या नव्या मराठी चित्रपटा सारखा दुष्काळ महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी आहे.
५. अनेक गावातून माणसे स्थलांतर करीत आहेत , गावे ओस पडीत आहेत
६. पिण्यास पाणी नाही , लांबवर विहिरी कोरड्या , जनावरांना चारा नाही , जनावरे खंगून मरत आहेत


या वर्षीच्या पावसाची , त्याहून महत्वाचे - वेळेवर येणाऱ्या पावसाची सारेच वाट बघत आहेत.

अपेक्षित तातडीचे उपाय :

१. पिण्याच्या पाण्याची सोय अगदी तातडीने करणे. अत्यंत चोखपणे.
२. जनावरांची काळजी घेण्यासाठी पशूवैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात
३. शेतकऱ्यांचे हफ्ते वसूली काही काळ स्थगित करावे / पुढे ढकलावे / सवलतींचा विचार करावा
४. मुलांना शाळेसंबंधी  सवलतींचा विचार करावा
५. अर्ध्यावर पडलेले , रखडलेले सिंचन प्रकल्प त्वरेने पूर्ण करता यावेत याकडे लक्ष द्यावे

2 comments:

 1. Dated Feb.16th, 2013 .. Kolhapur, Sangli , Mahabaleshwar had heavy rains. Strawberry crops hampered. Nashik had a very severe rains a day before ; grapes hampered.

  ReplyDelete
 2. लिहिण्यास अत्यंत वाईट च वाटते आहे. दुष्काळ इंग्रजी चित्रपटानसारखे पार्ट १-२-३-४ काढतच आहे !
  मागील वर्षी जुलै एंड ला पाऊस आला. यावर्षी भारतात अनेक ठिकाणी अति पावसानं ओला दुष्काळ दाखवला . दक्षिण, उत्तर , पूर्व भारत , मध्य भारत सारीकडे अतिवृष्टी . स्वरूप - एकदाच रपारप येतो . १-२ दिवसात ढगफुटी सारखा आल्याने , सारीकडे ओला दुष्काळ , जीवित आणि वित्त हानी !

  महाराष्ट्र मात्र उन्हाने होरपळला ! थेट सप्टेंबर १०, २०१५ पर्यंत . भूजल साठा बाकी वर्षापेक्षा निम्म्यावर आला . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने का होईना पण ३-४ दिवस पाऊस दिस्तोय. आज तारीख -१२ सप्टेंबर! पावसाळा शिफ्ट झाला आहे का?

  गरज आहे:

  १. पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजनाची !
  २. दुष्काळ - शक्यता गृहीत धरून , त्याचे पूर्व व्यवस्थापन - सक्तीने तद्न्य व्यावसायिक हवामान / पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्याने करण्याची !
  ३. टेकड्या तोडून घरे बांधण्यावर योग्य पर्याय निवडण्याची . शहराचे नियोजन पुन्हा नव्याने नीट करणार्याची !
  ४. वनस्पती तज्ञांच्या सल्ल्याने उंच , भक्कम वाढतील , टिकाऊ असतील , जमिनीची धूप थांबवून वाहत्या ढगांना अडवून पाऊस देतील अशा झाडांच्या रोपणा विषयी सोसायटी , गणेश मंडळे , सरकारी कार्यालये , कोर्पोरेट कार्यालये इत्यादींना काम आणि सूचना / मदत देणे आवश्यक.
  ५. आखाती देशांकडून याविषयी काही शिकता येईल
  ६. शेतकर्यांना कोणती पिके लावावीत , अवेळी पाऊस / दुष्काळ यात पिके कशी तग धरून ठेवावीत इत्यादी मार्गदर्शन मिळावे. ABP माझा वरील " सातबाराच्या बातम्या " अत्यंत उत्तम ! अगदी प्रक्टिकल टिप्स देतात !

  ReplyDelete

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८ १. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत. https://www.google...

Listed on: link directory