loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Tuesday, October 9, 2012

बनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी

सौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात . एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्पनातीत वाटेल असे सारे जिवंत वर्णन. आजकालच्या मॉल सौस्कृतीतल्या मुलांनी आव्व्र्जुन वाचावे असे पुस्तक.
आयुष्य म्हणजे काय , आयुष्य जगताना अडचणी येतात म्हणजे काय , कागदावर रंगाच्या जितक्या छटा असतील ; तितक्याच किंबहुना जास्तच छटा आयुष्याच्या हि असू शकतात. खरोखरीच असा अनुभव घेणा शक्य नाही , घेणे आपल्याला मावणार- सोसाविनारही नाही ;)
गाव , गावातील धनगर आणि इतर उद्योग करणारा समाज याची पूर्व- परंपरागत असणार गाव- रचना . गावातील समूहाचे वागणे , राहणे , हसणे , खेळणे. हसू आणि आसू एकत्र झेलणे. खूप काही वेगळे वाचनात येते. आणि माडगुळकर यांची ग्रामीण भाषा शैलीवरील प्रचंड पकड हर एक पत्र आपल्या समोर जीवन , चालते-बोलते करून ठाकते.

गाव म्हणजे काय, गावातली शाळा म्हणजे उपेक्षित असून नसून कधी कधी आणि कशा कशासाठी गावाला उपयुक्त ठरते , याचे वास्तविक आणि काहीसे मजेशीर वर्णन. गोर्या साहेबांच्या काळातील महाराजांच्या काळातील गोष्ट. पंत सरकार गावी येणे हा सोहोळा उत्तम.
वास्तविकता आणि मानवी मनाचे विविध पैलू अनेक सुंदर अशा व्यक्ती रेखा सरळ-सुलभतेने साकारतात. असे वाटते ; कि आपण त्या युगाची सफर करून आलो. आपल्या पासून शेकतो योजने दूर वर असणार्या ; आर्थिक , भौतिक , साम्माजिक दृष्टीने आंतर नव्हे ; तरी दरी असणार्या ह्या समाजातील कित्येक गोष्टी आपल्याला कळतात. ज्यांच्या सहवासात काही वेळाही घालविता येईल कि नाही अशी शंका वाटेल ; त्यांच्या गावात आपल्याला सार्या घटना जवळून अनुभवायास मिळतात. असा काहीतरी भारीच अनुभव हे पुस्तक देऊन जाते.
एकदातरी आवर्जून वाचावे ; इतके तर २०० %

3 comments:

 1. मी खूप पूर्वी ही कादंबरी वाचली होती. नंतर यावर चित्रपट आला होता असं वाटतं पण मी पाहिला नाही आहे.
  पुन्हा वाचायला हवी.

  माडगूळकर माझे अत्यंत आवडत्या लेखकांपैकी आहेत. त्यांची जंगलांची वर्णनं पण कसली जिवंत असतात.

  ReplyDelete
 2. हो. मराठी चित्रपट आहे. मी अर्धवट पहिला आहे. तो हि चांगला आहे.

  ReplyDelete
 3. फक्त नावं ऐकल होतं आतापर्यंत, खरं वाचायला हवी असं वाटतंय ही पोस्ट वाचून..

  ReplyDelete

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८ १. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत. https://www.google...

Listed on: link directory