loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Wednesday, May 10, 2017

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

Hi Tea, British, Culture, English, Indian, British Indian, Marathi writers, Ketki Itraj,
BRITISH - Hi Tea
हाय टी
" हाय टी " म्हणजे नक्की आहे तरी काय ? चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे ? की नवी स्वस्तातली चहा पावडर ? असे वेडगळ  आणि चक्क  बावळट  विचार  कोणासमोर बोलू नका ! " हाय टी " म्हणजे " ब्रिटिश ओरिजिन असणारे चहापान ! " हाय टी म्हणजे नुसते चहा च्या वेळी बकाबका खाणे नाही.  हाय  टी  हे एक कल्चर आहे , एक अत्यंत उच्चभ्रू, हाय सोसायटी परंतु तितकेच कमालीचे डिसेंट कल्चर. कुठेही कोणालाही चहा ला बोलवून उगाच हाय - टी शब्द टाकू नका ! जसे आपल्याकडे कटिंग - कल्चर आहे , तसे हे हाय - टी कल्चर ! आणि थोडक्यात सांगायचे तर हे दोन्ही एकमेकांचे विरुद्धार्थ !

चहापान आणि कल्चर :
आपण आणि ब्रिटिश खरेतर अजूनही फारसे वेगळे नाहीच ! त्यांच्याकडेही आपल्याला इंडियन ओरिजिन ब्रिटिश म्हणून ओळखतात. जग जवळ आल्याने आपण सारे अधिक जवळ आलो ! युरोपियन लोक कॉफी वाले. फ्रांस वगरे कॉफी , उंची इतर मद्य असे त्यांचे कल्चर. युरोपातल्या लोकांना मसाल्यांची जणू ऍलर्जीच ! त्यांचे सारे आरोग्यदायी , मजबूत आणि नॉन - स्पायसी ! अमेरिकनांनी " अखिल विश्व् माझे बंधू " म्हणत कमालीचे संमिश्र कल्चर तयार केले. भारतात सारे चवीने खाणारे. आपण आशियायी लोकांच्या नूडल्स मध्ये ही आपले मसाले घालूनइंडियन - चायनीजचा पायंडा फेमस करून टाकला !
आशियायी लोक चहा वाले पक्के ! ब्रिटिशांच्या रेसिपीज आणि आपल्या रेसिपीज यांचा मिलाफ होऊन आपले जे भारी फ्युजन झाले , ते त्यांच्याकडे आणि आपल्याकडेही लोकप्रिय. त्याकाळचे राजवाडे आणि ब्रिटिश फौजी यांच्या प्रेमाची ही स्पायसी भेट ! आशियायी लोक विविध झाडपाल्याच्या औषधींनी युक्त ग्रीन -टी घेत. आपण आता त्यालाही आपलेसे करून टाकले आहे ! परंतु , " हाय - टी " आजही आपला राजबिंडा रुबाब टिकवून आहे.


हाय - टी कल्चर :
अत्यंत उच्चभ्रू लोकांना परवडेल अशी चहा ही पूर्वीची गोष्ट होती. १८००-१९०० सालात ह्या हाय टी चा डौल खरा फारच रुबाबदार होता!  खऱ्या अर्थाने हा उच्चभ्रू लोकांचा सोशल इव्हेन्ट असे !   

मात्र संध्याकाळी नंतरही येणाऱ्या वर्किंग क्लास च्या माणसाला दिवसभर उपासमार होऊ नये म्हणून आपल्या बजेट नुसार ब्रिटन मध्ये  यांनी हाय - टी  ही  सुरु केला. ब्रिटिश म्हणजे प्रचंड वेळेवर काम करणे ! राजेशाही थाटात ! मग हाय टी म्हणजेही अगदी असेच सोंग ! दुपारी वाजताच्या ब्रिटिश - श्रीमंतांच्या चहाला हाय - टी म्हणतात. आजही ब्रिटन मध्ये हाय - टी ला कोणी बोलावले तर अवश्य जावे.

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...