loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Wednesday, May 10, 2017

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

Hi Tea, British, Culture, English, Indian, British Indian, Marathi writers, Ketki Itraj,
BRITISH - Hi Tea
हाय टी
" हाय टी " म्हणजे नक्की आहे तरी काय ? चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे ? की नवी स्वस्तातली चहा पावडर ? असे वेडगळ  आणि चक्क  बावळट  विचार  कोणासमोर बोलू नका ! " हाय टी " म्हणजे " ब्रिटिश ओरिजिन असणारे चहापान ! " हाय टी म्हणजे नुसते चहा च्या वेळी बकाबका खाणे नाही.  हाय  टी  हे एक कल्चर आहे , एक अत्यंत उच्चभ्रू, हाय सोसायटी परंतु तितकेच कमालीचे डिसेंट कल्चर. कुठेही कोणालाही चहा ला बोलवून उगाच हाय - टी शब्द टाकू नका ! जसे आपल्याकडे कटिंग - कल्चर आहे , तसे हे हाय - टी कल्चर ! आणि थोडक्यात सांगायचे तर हे दोन्ही एकमेकांचे विरुद्धार्थ !

चहापान आणि कल्चर :
आपण आणि ब्रिटिश खरेतर अजूनही फारसे वेगळे नाहीच ! त्यांच्याकडेही आपल्याला इंडियन ओरिजिन ब्रिटिश म्हणून ओळखतात. जग जवळ आल्याने आपण सारे अधिक जवळ आलो ! युरोपियन लोक कॉफी वाले. फ्रांस वगरे कॉफी , उंची इतर मद्य असे त्यांचे कल्चर. युरोपातल्या लोकांना मसाल्यांची जणू ऍलर्जीच ! त्यांचे सारे आरोग्यदायी , मजबूत आणि नॉन - स्पायसी ! अमेरिकनांनी " अखिल विश्व् माझे बंधू " म्हणत कमालीचे संमिश्र कल्चर तयार केले. भारतात सारे चवीने खाणारे. आपण आशियायी लोकांच्या नूडल्स मध्ये ही आपले मसाले घालूनइंडियन - चायनीजचा पायंडा फेमस करून टाकला !
आशियायी लोक चहा वाले पक्के ! ब्रिटिशांच्या रेसिपीज आणि आपल्या रेसिपीज यांचा मिलाफ होऊन आपले जे भारी फ्युजन झाले , ते त्यांच्याकडे आणि आपल्याकडेही लोकप्रिय. त्याकाळचे राजवाडे आणि ब्रिटिश फौजी यांच्या प्रेमाची ही स्पायसी भेट ! आशियायी लोक विविध झाडपाल्याच्या औषधींनी युक्त ग्रीन -टी घेत. आपण आता त्यालाही आपलेसे करून टाकले आहे ! परंतु , " हाय - टी " आजही आपला राजबिंडा रुबाब टिकवून आहे.


हाय - टी कल्चर :
अत्यंत उच्चभ्रू लोकांना परवडेल अशी चहा ही पूर्वीची गोष्ट होती. १८००-१९०० सालात ह्या हाय टी चा डौल खरा फारच रुबाबदार होता!  खऱ्या अर्थाने हा उच्चभ्रू लोकांचा सोशल इव्हेन्ट असे !   

मात्र संध्याकाळी नंतरही येणाऱ्या वर्किंग क्लास च्या माणसाला दिवसभर उपासमार होऊ नये म्हणून आपल्या बजेट नुसार ब्रिटन मध्ये  यांनी हाय - टी  ही  सुरु केला. ब्रिटिश म्हणजे प्रचंड वेळेवर काम करणे ! राजेशाही थाटात ! मग हाय टी म्हणजेही अगदी असेच सोंग ! दुपारी वाजताच्या ब्रिटिश - श्रीमंतांच्या चहाला हाय - टी म्हणतात. आजही ब्रिटन मध्ये हाय - टी ला कोणी बोलावले तर अवश्य जावे.
कारण समाजात तुमची प्रत , तुमचे लोकांशी वागणे - बोलणे , मॅनर्स अशा अनेक गोष्टी यावरून ओळखल्या जातात. मोठाल्या हॉटेल मध्ये हाय - टी मेनू वेगळे असतात. बायकांच्या डिसेंट गप्पा मारण्याचे , भेटण्याचे आणि शायनिंग मारण्याचे हे निम्मित ! इथे अनेक मेनूनपैकी - घ्यावेत , ते हळू हळूच खावेत , आवाज करता खावेत , सांडवता खावेत आणि आपली प्रौढी मिरवत , साऱ्यांना हाय - हॅलो करत खावेत हे लिहिलेले मोठ्ठे सत्य असते !!! असे जमणारे या सोसायटीत बसू शकत नाहीत ! आणि  हो , हा चहा चांदीच्या किटलीतून दिला जातो ! ही किटली लखलखीत पॉलिश असलेली , चकाकणारी , छोटुशी असते. चांदीच्या चमच्याने ढवळत हा चहा पिणे म्हणजे अप्रतिम राजेशाही थाट अनुभवणे. इथे माज नसतो , पण प्रचंड सेल्फ - रिस्पेकट असतो ! स्वतःला समाजात अत्यंत सुंदरपणे प्रेसेन्ट करणे यातून शिकवले जाते. { आपल्याकडे मात्र अति - सौस्करी लोक शिष्ठ म्हणतील किंवा मॅनर लेस लोक बावळटसारखे केव्हाही कुठेही कधीही बडबडत बसतील ! } इथे दिसते ती अदब , सौंदर्य , डौल , स्वाभिमान , नजाकत !!! वाह !

हाय - टी मेनू :

साधारण लोकांसाठी हाय टी म्हणजे  चहाचा मग , ब्रेड ,  चीज ,  काही भाज्या , कवचित मांस असा मेनू साधारणपणे असे. थोडक्यात म्हणजे मधल्यावेळच्या न्याहारीचे स्वरूप या चहाने घेतले. संध्याकाळी थकून घरी येणारा श्रमिक वर्ग दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये म्हणून ह्या छोट्या - जेवणाकडे बघत.
उच्चभ्रूचे हाय - टी नजाकतदारपणे टेबल पाशी बसून घेतले जात . कुठेही सोफा - खुर्चीवर लोळत नव्हे ! ह्याला आफ्टरनून - टी म्हणून नंतर म्हणले गेले. ह्याबरोबर उच्चभ्रू लोकांचे मेनू म्हणजे महागाची ड्राय - फ्रुटस, इंग्लिश मफिन्स ( केकचा प्रकार ), वेगवेगळे पाय ( खीर आणि केकचा मिलाफ असल्याप्रमाणे एक पदार्थ ) , महागडे मासे , आम्लेट इत्यादी पदार्थ. 
कोणाशी बोलावे , कशावर बोलावे, किती बोलावे , हावभाव कसे ठेवावेत , कुठल्या आवाजाच्या टोन मध्ये बोलावे , थोडेसे शिष्ट असलेच पाहिजे असे हे सुंदर कल्चर !!!  याबरोबर दिले जाणाऱ्या मेनूपैकी माझा आवडता म्हणजे वॉटर - क्रेस सँडविचेस किंवा लेट्युस / क्युक्युम्बर सँडविचेस. यात ब्रेड च्या कडा काढलेल्या असतात. खण्डीभर पदार्थ कोंबून , बाहेर येणारे काकडी , चीज खायचे तर ते अमेरिकन कल्चर ! पण अत्यंत एकसारखे कापलेले पातळ काकडीचे / इतर काप , तितक्याच जाडीचे सर्व तुकडे , नजाकतदार कट केलेले सँडविच , कडा कापलेल्या आणि शक्यतो टोस्ट केलेले ; ताजे -ताजे , मऊ मऊ ! हे म्हणजे पक्के ब्रिटिश ! हा आहे हाय - टी मेनू !
काहीही झाले तरी आमचंच खरं ! ब्रेड वाया जाण्यासाठी कडा काढणे , पोर खात नाहीत अशा भाज्या कोंबून केलेले मायेचे पौष्टिक सँडविच म्हणजे आपले " इंडियन ! "
उगाच कोणालातरी शेजार्याला चहाला बोलावले तर चुकूनही हाय - टी म्हणू नका . आणि कटिंग प्यायला कोण - कोणाला कम्पनी देतो ते आपल्याला माहित असतेच! आजीबरोबर कटिंग - क्रीमरोल जसे आपण खाणार नाही तसेच हे ! हाय - टी मेनू बरेच मिळतील. आपणही अनेक पदार्थ घरी कराल ! आई लोकांना आणि इतर गृहिणींना स्फुरणच येते ! परंतु , हाय - टी हे एक कल्चर आहे !


चहा प्रेमीकटिंग प्रेमी, हेल्थ - कौशियस ग्रीन - टी प्रेमी या साऱ्यांनीच मानाचा मुजरा करावा , असे हे आपल्याच चहा चे " हाय - टी कल्चर ! "

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

BRITISH - Hi Tea हाय टी " हाय टी " म्हणजे नक्की आहे तरी काय ? चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे ? की ...

Listed on: link directory