loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Wednesday, September 10, 2014

" Being Wise & Smart : इथे सपशेल मना आहे ! "

                                     

इतकं शहाणं आणि जबाबदार कोणी होऊ नये.  समजूतदार  माणसाचा सदरा घालून कोणी फिरू नये.  परमेश्वर एकदाच का देत असेल लहानपण ? आपण ते जपायलाच शिकलो नाही तर ? आई वडिलांचे छत्र  आणि पाठीत बसलेले धपाटे कशाला निर्माण केले असते ? निरागस हसू आणि द्वांड दंगामस्ती विरून का गेले नसते कधी ! इतके खट्याळ , मिश्किल लिहिणारे नामवंत लेखक जबाबदार नव्हते का कधी ? Tom  & Jerry  बघत हसणारे तुमचे आई -वडील दिसले नाहीत का कधी ?जबाबदारीच्या नावाखाली काय गमाव्ताय ? लाख - दोन लाख पगारात अकाली वार्धक्य विकत घेताय ?

हासत जगणं हे मोठ आव्हान आहे. खूप मोठ होऊन लहान रहाणे यात सार सूख आहे. दुसर्यांना हसवणे हे आयुष्य जिंकल्याच लक्षण आहे. भूमिका बदलत रहातील. आपला अनुभव , शिक्षण ,  मन , सौस्कार , समाजातील निरनिराळे घटक आपल्याला अनेक गोष्टी शिकवत रहातील. भूमिका कशा हाताळाव्यात , हे तुमचं batting skill आहे . स्वतःला विसरून जीवन जगणे सर्वात गैर आहे. प्रश्न पैशांचा नाही , कावर्या -बावर्या होणार्या मनाचा आहे. मोठे -मोठे म्हणत ओंठ काढून रडणाऱ्या आपल्यातल्या निरागस पोराचा आहे.

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...