Skip to main content

Posts

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

हायटी " हायटी " म्हणजेनक्कीआहेतरीकाय ? चहाच्यावेळेसहायकरायलालोकांनीजमणे ? कीनवीस्वस्तातलीचहापावडर ? असेवेडगळ आणिचक्कबावळटविचार कोणासमोरबोलूनका ! " हायटी " म्हणजे " ब्रिटिशओरिजिनअसणारेचहापान ! " हायटीम्हणजेनुसतेचहाच्यावेळीबकाबकाखाणेनाही.  हाय टी हेएककल्चरआहे , एकअत्यंतउच्चभ्रू, हायसोसायटीपरंतुतितकेचकमालीचेडिसेंटकल्चर. कुठेहीकोणालाहीचहालाबोलवूनउगाचहाय - टीशब्दटाकूनका ! जसेआपल्याकडेकटिंग - कल्चरआहे , तसेहेहाय - टीकल्चर ! आणिथोडक्यातसांगायचेतरहेदोन्हीएकमेकांचेविरुद्धार्थ !
चहापानआणिकल्चर : आपणआणिब्रिटिशखरेतरअजूनहीफारसेवेगळेनाहीच ! त्यांच्याकडेहीआपल्यालाइंडियनओरिजिनब्रिटिशम्हणूनओळखतात. जगजवळआल्यानेआपण

Do You Know

loading...
Recent posts

साऱ्यांसाठी पूरक योगा: शवासन

साऱ्यांसाठी पूरक योगा: शवासन

आजच्या दैनंदिन जीवनात घड्याळाच्या तालावर नाचताना व्यायाम करा अशी पुस्तके आपण इंटरनेट वर वाचतो ! काय हे उपरोधात्मक वागणे ! व्यायाम करा म्हणून पूर्वी आजी -आजोबा सक्तीने जोर -बैठका काढावयास लावत. टेकड्यांवर धावायला -पळायला मिळे . उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी / आजोळी जाऊन दिवसभर धुडगूस चाले. कधी परसातल्या विटी दांडू - क्रिकेट च्या मॅचेस . कधी आंबा - माडाच्या झाडावर चढून गोळा केलेला अमृततुल्य माल , कधी रानातल्या करवंदे - मैना - आवळ्यांने भरलेली ओंजळ ! धमाल !  आता मात्र समर -कॅम्प  किंवा व्हेकेशन बॅच मध्ये जाऊन पोरं नाकावर चष्मे चढवून कॉम्पिटिशन च्या चक्रावर चालण्याचे बाळकडू घेत असतात. मग ऐन तिशीत , डोक्यावर चाकाकता चांदोबा , पोटाचा नगारा , खिशात बीपी -डायबेटीस च्या गोळ्यांची पाकिटे आणि खूपच यशस्वी उद्योजक आहात याचं प्रूफ म्हणजे झोपेच्या गोळ्या ! असा राजेशाही थाट दिसतो. तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट रेट च्या चक्रवाढ व्याजात बोनस म्हणूनही असे निरोगी आयुष्य आणि निवांत पणा मिळेना !
कालाय तस्मै नमः ! हे वचन ध्यानी ठेऊन माणसाने आनंदाने जगावे . अगदी बरोबर . …

Donald Trump! : ट्रम्प आजोबा नक्की करताएत तरी काय ?

Donald Trump & India
डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी २०१७ ला अमेरिकेचे सर्वोच्च नागरिक म्हणून शपथ घेतली आणि लाडक्या ओबामांना अमेरिकन जनतेने अश्रुपूर्ण निरोप दिला. "४ यर्स मोअर" अशा पाट्या ही अनेकठिकाणी झळकताना दिसल्या.  माझा याच्याशी सम्बंद्ध आला जेव्हा गडगडता शेअर बाजार मी अभ्यासला ! ट्रम्प च्या रक्तातच बिझनेस असताना सारीकडे वास्तविक पाहता अधिक चांगले वातावरण हवे ! ओबामा आणि मोदी यांची मैत्री जगभर गाजली . ओबामा भारतात अनेकदा पाहुणचार घेऊन गेले . मोदींच्या ९ दिवसांच्या नवरात्रीच्या कडक उपासात मोदींना डिनर टेबल वर लेमन वॉटर दिले गेले . यामुळे खरतर ओबामा माणूस म्हणून दिलखुलास आदमी है ! हे प्रत्येक भारतीयाच्या मनात ठसले . मग गुडबाय ओबामा म्हणताना भारतीयांचे ही मन "४ यर्स मोअर" म्हणून गेले. मग माझा याच्याशी जास्त सम्बन्ध आला !

ट्रम्प आजोबा आणि टिपिकल अमेरिकन पुरुष :
ट्रम्प आजोबांचे हेअरकट आणि टिपिकल अमेरिकन पुरुषाचा लूक माझ्या आवडत्या " स्मॉल वन्डर्स " सिरीयल मधल्या " टेड " या टिपिकल अमेरिकी रोबोट इंजिनियर ची आठवण करून गेला. १९८० च्या गाजलेल्या …

हैप्पी लिव्हिंग , कीप स्मायलींग

एकदा येन - तेन  निमित्त्यानं महिला मंडळाच्या गप्पा कानावर पडल्या. मजेशीर आणि माझ्यातल अभ्यासू कुतूहल जाग्या करणाऱ्या ! गूण आला नाही म्हणून डॉकटर बदलणाऱ्या ; पण गुरुजी आणि ज्योतिषांच्या नियमित वाऱ्या करणाऱ्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ! भारी ए नाही ! विषय गंभीर आहे. प्रत्येक कॉमन मॅन ला वाटते, आपला कस सुरळीत व्हावं. शिक्षण , नोकरी , पैसे , घर , लग्न , पोरं इति. मग मनासारखे काहीही घडत नाही , अडथळे येतात किंवा विलंब होतो तेव्हा समस्या निर्मिती होते. थोडक्यात काय , मनासारखे न घडणे म्हणजे समस्या ! इथे सारेच काही कागदावरच्या रेषेसारखे सरळ नसते , आपलं आणि इतरांचे आयुष्य वेगळे असू शकते हे मान्य करण्याचीच मनाची तयारी नसते ! मग होते ते “दुःख” ! एखाद्या समस्येवर मार्ग काढणे हे मग सुचतच नाही ! कारण , डायरेकट किंवा इन्डायरेकट तुम्ही सफर होत असता. साधे उदाहरण , शारीरिक क्षमता कमी झाल्याने साध्या सर्दी -खोकला -तापातही नेहमी इतके १००% जोमाने तुम्ही काम करू शकत नाही. काही माणसे काम करणारच नाहीत , काही उशिराने सुरु करतील , काही रेटून नेतील " कुछ नही होता " म्हणून …
loading...
Listed on: link directory