loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, April 26, 2013

काही रेअर मोमेंट्स -



काही रेअर मोमेंट्स . सध्या भारतातला मे २०१३ . आजची उन्हाळी सुट्टी आणि १५ वर्षांपूर्वीची अशा काही सहजच निघालेल्या गप्पा. आमच्या नारायणपेठेतल्या वगरे आठवणी . अर्थातच त्या एव्हर ग्रीन आठवणी कधीही आठवता याव्यात म्हणून काही बारकावे नमूद करीत आहे . " क्विकली गो थ्रू " टाईपमात्र माझ्या तोंडाचे अखंड चर्हाट ऐकण्यात जी मजा आहे ती येथे नाही. इच्छुकांनी माझ्याबरोबर बिनधास्त गप्पांचा अड्डा मांडवा ..….  :))

प्रकरण - नारायण पेठ

Monday, April 1, 2013

कसबा गणपती- Kasba Ganpati, Pune March 2013

कसबा गणपती. केवळ नाव घेतले तरी चटकन ध्यानी येते ते पुण्याचे ग्रामदैवत , मनाचे १ले गणपती. पुण्यातील सर्वात जुने , अत्यंत ज्वलंत ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे हे श्रींचे अधिष्ठान. अगदी पुण्याची पुनवडी होती तेव्हापासूनचे सार्यांचे लाडके दैवत. आजवर सापडलेल्या अनेक शिवकालीन खत-खलिद्यात तब्बल ७०० वर्षांपूर्वीचे देखील कसबा गणपतीचे "श्री मोरया" या नावाने उल्लेख सापडले आहेत. म्हणजे यादव काळापासून पुणे हे महाराष्ट्रातील कदाचित पहिले गाव असेल , जेथे श्रीं गणेशाचे वास्तव्य आढळून येते.
       मुळा -मुठेच्या संगमावर वसलेले हे देऊळ , पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या समोर अगदी हातभर अंतरावर. पूर्वीपासून पुण्यातील सर्वात जुनी रहिवासी वस्ती म्हणजे पेठ असणार्या कसबा पेठेत.शिवाजी महाराजांच्या घराकडून; म्हणजे आजही मोठ्या दिमाखाने उभ्या असलेल्या लाल महालाच्या फक्त डाव्या हाताला ही वाडा-सदृश्य , ऐस-पैस वास्तू तितक्याच डौलाने उभी असलेली दिसते.या मंदिरावर यादवकालीन आणि हेमाडपंती अशा दोन्ही शैलींचा छाप दिसून येतो. महाराष्ट्रात अकरा ते चौदाव्या शतकापर्यंत  "हेमाडपंती" ही विशिष्ठ मंदिर वास्तुरचनाशैली निर्माण झाली. यादव काळातील एका हेमाडपंत नामक मंत्र्याच्या  नावाशी ही शैली जोडली गेलेली दिसते. आणि साधारण तेरा ते सतराव्या शतकात महाराष्ट्रात यादव - मंदिर शिल्पशैली तग धरून होती . त्यानंतर अठराव्या शतकात पुन्हा नवीन मंदिरे निर्माण होण्यास सुरुवात झाली.  या मंदिराची स्थापना १६२६-१६३९ च्या दरम्यान राजमाता जिजाऊच्या आज्ञेनुसार झाली असे सांगण्यात येते. या मंदिराचे पारंपारिक पद्धतीचे सभामंडप , गर्भगृह आणि गोपूर पद्धतीचे शिखर, मंदिरासमोरची दीपमाळ ही वैशिष्ट्ये मराठा राजवटीचा विशेष ठसा प्रकर्षाने जाणवून देतात.
Kasba Ganpati- Under Makeover-Feb2013-Photography by Ketki Itraj

Kasba Ganpati- Under Makeover-Feb2013-Photography by Ketki Itraj

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...