loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Tuesday, August 5, 2014

Best Of Marathi Movies ... Ashok Saraf Rocks.... !


४ जून १९४७ म्हणजे अशोक मामांचा वाढदिवस ! या दिवशी मराठीतले अष्टपैलू अभिनेते , तुफ्फान वेड - कॉमेडी अभिनेते आणि समस्त मराठी सिने सृष्टीचे " मामा " या जगाच्या रंगमंचावर अवतरले ! आजपर्यंत अफलातून चौकार - षटकारांची उधळण करीत त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे असेच अधिराज्य गाजविले ! सध्याच्या केबल युगामुळे मामांचे अनेक चित्रपट आमच्या तरुण पिढीला बघायला मिळाले. त्यांच्या विविध भूमिका , गेटअप , त्यांने सादरलेले प्रत्येक पात्र जणू " बास ... ह्या भूमिकेसाठी अशोक मामा च ! " असे दिलखुलास उद्गार प्रत्येकाच्या तोंडून काढावयास लावतात ! त्यांची जादू काळाच्या बंधनाला झुगारून चालूच राहील , नि:सौंशय ! दिवाळी चा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि मामांच्या अभिनयाला सॉल्लिड झकास आतिषबाजीयुक्त मानवंदना करण्यासाठी त्यांच्या अभिनयाची फोडणी असणारे माझे आणि साऱ्यांचेच प्रचंड आवडते चित्रपट - खास रसिक वाचकांसाठी !

वाचताना , ते क्षण - सिन जगताना साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलावे आणि आठवणी आणि धमाल चित्रपटांच्या सोबतीने आपले काही विरंगुळ्याचे क्षण हास्यमय व्हावेत म्हणून मामांच्या चित्रपटांची लिस्ट. कधी वाटते , काही बघावे आणि नेमके तेव्हा काही नसते टीव्ही वर ! किंवा आमच्या बंधुराजांसारखे मराठी मनाचे काही बंधुलोक फिरत असतात परदेशात आणि आठवण येते आपल्या घराची , त्या वातावरणाची --- तेव्हा मग काढा ही यादी , युट्युब वर होऊन जाऊद्या !




काही मस्त मराठी सिनेमे - आवर्जून बघावेत असे . जेव्हा निवांतपणा , घरगुती टच , आपुलकी , निखळ करमणूक , स्वा - नंद हवा असेल तेव्हा  !

* प्लीज नोट  - अशोक मामा ( अशोक सराफ ) Rocks  ……………………………  !!


१. गुपचूप गुपचूप - प्लीज बाप पिच्चर . बोलायचेच नाही. अशोक सराफ as गोव्याचे प्रोफ़. धोंड , " च्या SSSSS किरेय ! म्हणत ट्राउझहर वर उचलण्याची स्ताइल , रंजनाचा रंगवलेला डबल रोल , रंजनाची बहिण म्हणून काम केले आहे त्याही काकू सुरेख - ज्या महेश कोठरेंशी लग्न करतात गपचूप , श्रीराम लागू उत्तम काम , शरद तळवलकर पुन्हा एकदा फारच बेस्ट काम , ते रंजनाच्या सांगण्यावरून झाडाला प्रदक्षिणा घालतात तो तर फारच बेस्ट जमलाय सीन , पद्मा चव्हाण नाईट गाऊन मध्ये फारच मॉड दिसल्या आहेत ! फॉरेन रिटन चे काम केलेला कलाकार पण बेस्ट , गोव्याच्या " ओशे … ! " म्हणणार्या आशालता, गुड्डी मारुती यांची कॉमेडी … सगळच उत्तम जमलेलं ग्रेट रसायन आहे हा पिच्चर !

२. बाळाचे बाप ब्रह्मचारी - अशोक सराफ , लक्ष्या , रे काका , सुधीर जोशी, निवेदिता  आहेतच. मर्फी rocks ….  ! किशोरी शहाणेच्या बाबांचे काम करणारे , TV दुरुस्त करायला घरी अशोक सराफ येतो तेव्हाचा सीन झकास ! आणि …. सरकारी नोकर बारीकसे ते काका - तोड नाही राव ! मस्त ! लक्ष्याच्या लायब्ररीचे ते क्लाएंट असतात आणि त्यांची मुलगी जाडी लक्ष्यावर लाईन मारत असते . अशोक सराफ लक्ष्याचा मामा बनून त्यांच्या घरी जातो तेव्हाचे सौवाद म्हणजे हसा आणि हसा फक्त  ! छान आहे मूव्ही . यात कांचन अधिकारी ने घारपुरे असताना ( लग्ना  आधी ) अभिनय केला आहे.

३. अशी ही बनवा बनवी - ए  ! लिहित का कोणी या मूव्ही वर ! सगळे प्रसंग म्हणजे हिट सीन , सुधीर जोशी rocks …  दारू पिउन घरी येतात तो सीन झकास ! ( Scene Video Added ) सगळंच आणि सगळेच बेस्ट

 !





४. शेजारी - शेजारी - " प्रश्न उत्तर असते नेहमी शेजारी शेजारी " गाणे  मला फार आवडते म्हणायला . भारी आहे. पूर्वीचे लाईफ स्टाईल मस्त दिसते यातून. मोठाले बंगले , निवांतपणा , बायकांची खरी मैत्री  :D , शेजार्यांची एकमेकांना मदत करायची प्रवृत्ती , झकास निवांत , आणि फारसा न बघितलेला छान पिक्चर आहे.

५. धुमधडाका - हा माझा all time fav. माझ्या भावाचा पण ! अरे  तोड  ए  का ! निवांत बंगला , मर्सिडीज …… आजही सातार्याला परमेश्वर कृपेने वातावरण , लोकं अशीच छान आहेत . अशोक सराफ ने बेस्ट actor चे सगळे निकष तोडत विक्रम केलेले आहेत . आवाजाची चढ - उतार , " व्याख्या -वूक्खू -विक्खी " खोकत बोलणं …
बाआआअप ! माझा नमस्कार अशोक मामांना ! मला आयुष्यात एकदा जरी काम करायला मिळालं नं त्यांच्याबरोबर , आयुष्य सफल होण्यातला महत्वाचा बिंदू ठरेल ! आणि लक्ष्याचा हॉरर स्टोरी सांगतानाचा सीन . यातले तोंडाने काढलेले इफेक्ट्स चे आवाज नीट ऐका , यात पण अशोक मामांचे contribution आहे ! मी इथे attach करतेय video . All  time मूड - बूस्टर ! मला या सिनेमातले लोकेशन्स प्रचंड आवडलेत आणि . मला पण गुलाबाच्या बागा आणि द्राक्षाचे मळे घ्यावेसे वाटतात ! :) मला यातले भाहुतौश सौवाद पाठ आहेत. बाबा ओरडतात तरी आम्ही हा पिच्चर बघतोच ! हजारदा  :)) आणि ए प्लीजच ………  लक्ष्याचा dance आहे ना " त्रिकुट introduce करतोय वगरे …… च्या मारी झकास यार ! आणि काय म्हणजे पण किती -कित्ती भारी सौवाद लिहावेत अरे , काही तोड ! अशक्य भारी ! " तुम्ही इतक्यात जाणार नाही पपा ! ; सिनेमाची स्थळ शोधतोय करटा ! ; डोळस नाव त्या भूमिकेच - लक्ष्याचे लो  बजेट , चकणे , जाड भिंगाचा चष्मा वाले सिनेमा टीम मेम्बर !! " आणि डायनिंग टेबल वरची लक्ष्याची " लोणीदार गोष्ट ! " ……।


६.  दे दणादण - कोठारे स्टाईल कूल चित्रपट . प्लीज स्टार कास्ट विचारायचा नाही हा बावळट सारखा ! कोठारे म्हणलं की कळतं नं  ! :)

७. बिन कामाचा नवरा - पद्मा चव्हाण , अशोक मामा , रंजना , निळू फुले . ओल्ड स्टाईल . उनाडक्या करणारा नवरा असतो अशोक सराफ.

८.  गोष्ट धमाल नाम्याची  - यात परदा - फाश करतात ढोंगी बाबाचा . ( कुलजित पवार as ढोंगी बाबा )

९.  भूताचा भाऊ - प्रभावळकर + अशोक  मामा ! धमाल !

१०.आयत्या घरात घरोबा-  दिल , दोस्ती और XXX ( आठवत नाही आत्ता ) या हिंदी चित्रपटाची स्टोरी ८०% ढापून केलेला पण सुरेख पिळगावकर- सिनेमा . अशोक सराफ ची भूमिका सुरेख . शेवटची लाईन मूळ हिंदी चित्रपटात नाही " जगातला सर्वात श्रीमंत माणूस जात आहे.  " बाकी सारे उत्तमच !


११. निशाणी डावा अंगठा - हा रिसेंट आहे . साक्षरता मोहीम या विषयावर इतका मस्त चित्रपट ! अशोक सराफ मुख्याध्यापक असतो शाळेचा गावातल्या . कित्ती घोळ घालावे लागतात , सगळे मिळून काय काय गडबड करतात , प्रभावळकर , मोहन आगाशे याच्या छोट्याश्या पण सुरेख सौवाद असणार्या सुरेख भूमिका , अनासपुरे आणि भटजींच्या बायकोची भूमिका केलेल्या गंगुबाई नॉन मट्रिक वाल्या काकू ( सॉरी , नाव तोंडावर येईना त्याचं ) सगळं बेस्ट.
अरे अशोक मामा त्यांच्या जावयांना किती जेन्युंली " जावई " म्हणून हाक मारतात ! वेड - वेड ! भन्नाट सिनेमा.

१२. मास्तर एके मास्तर - अशोक सराफ अर्थातच घोळ घालणाऱ्या मास्तराच्या भूमिकेत . यातले अशोक सराफ च्या मुलाचे काम केलेले सुंदर.
" प्रश्नावली " म्हणतो अशोक सराफ त्याला . भारी पात्र . अशोक सराफ वर आणि आपल्या सौसारावर जीवापाड प्रेम करणारी अशोक सराफ ची पहिली बायको सुंदर रंगवली ए भूमिका ! ती सौसारच भलं व्हावं यासाठी आपल्या नवर्यावर विश्वास ठेऊन किती प्रेमाने टेम्पररी घटस्फोट घेते ! भारतीय पतिव्रता स्त्रीचा हाईट नमुना ! दुसरी बायको म्हणून काम केले तिनेही छान केले . अत्यंत वास्तवतावादी चित्रपट , काहीसा मनोरंजनाचा टच देऊन ! पण परिस्थिती ची मनोरंजनातून करून दिलेली जाण सुरेख !

१३. दोस्त असावा तर असा - रमेश देव यांचा जुना .

१४. गंमत - जंमत - अशोक, वर्षा , सचिन वगरे असा टिपिकल पिळगावकर -चित्रपट . वेगळी पटकथा पुन्हा एकदा. कहरच , मराठीतले हे सिनेमे इतके सुंदर , वेगळे आणि अभिनयाचा कस दाखवणारे आहेत कि हिंदी वाल्यांनी शिकावं काहीतरी. कुठेही अश्लीलतेचा आधार नाही, अतिरेकी मारामार्या नाहीत , फार बजेट उतू घालवलेल नाही. कथा - अभिनय - उत्कृष्ट स्क्रिप्ट , बेजोड सौवाद -फेक , एक से एक अभिनेते - अभिनेत्री , मराठी मातीतल्या भावनिक , सौस्कृतिक जिव्हाळया चा विचार करून अपार्ट फ्रॉम प्रेमकथा असे भन्नाट पिक्चर्स आहेत हे.

१५. सवत माझी लाडकी - ए किती ग गोड ती नीना कुळकर्णी काकू ! तिला बघितल की मला माझ्या पाळणाघरातल्या काकूची आठवण येते- तोच जेन्युअन पणा , टिपिकल मराठी गोडवा ! बाकी प्रशांत दामले , वर्षा  उसगावकर , मोहन जोशी सारेच बेस्ट ! स्कौट मध्ये गेलेल्या त्या काकू - झकास कॉमेडी पात्र ! सुधीर जोशी काकांची मोठी family , आमच्या आयांसारखी सगळ्या प्रकारच्या नातेवाइकान्चे प्रेमाने करणारी नीना काकू एकदम आमच्यातली वाटून जाते. आणि मेडिकल फिल्ड शी निगडीत असल्याने हा चित्रपट मला जास्त टच करतो ! :D  पण मुद्दा काय आहे , " आपला नवरा काय आहे आणि त्यांची उडी कुंपणा पर्यंतच असते हे सगळ्या मराठी स्त्रियांना माहित असतें ! :))  " त्यामुळे , कुठली गोष्ट कशी हाताळायची हे त्यांना बरोब्बर समजते . या जमान्याच्या फोरवर्ड पोरी वगरे काहीही म्हणलं नं आम्हाला तरी हे इथे बर्याच जणी मागे पडतात आजकाल !

१६. सगळीकडे बोंबाबोंब - दैनिक बोंबाबोंब पेपरचा किती साधा पत्रकार असतो अशोक मामा ! प्लीज , पत्रकार इतके साधे नसतात हे मला आता माझ्या ओळखीतल्या पत्रकार मित्रांमुळे माहित आहे ! छान ए पण पिक्चर - just for a change is  nice !

१७. अफलातून - लक्ष्या + अशोक मामा + वर्षा ........ कळलं नं ? :D

१८. आमच्या सारखे आम्हीच - तो नाही का - अशोक मामा आणि सचिन पिळगावकर यांचा डबल रोल . छान ए हा पण !

१९. एक डाव भुताचा - अशोक मामा rocks  !

२०. छक्के -पंजे - इतका बेस्ट पिच्चर आहे ! प्रभावळकर , अशोक सराफ , माचीन्द्र कांबळी , सविता प्रभुणे , आत्माराम भेंडे आजोबा वगरे ! आणि प्रभावळकरांनी मराठी व्याकरणाच्या ज्या शिव्या केल्या आहेत ……………………. A १ ! आणि आत्माराम आजोबा आणि लागू श्रीराम यांचे भांडण झालेले असते तेव्हा मारुतीला प्रदक्षिणा घालत ते १-१ वाक्य भीमरूपी चे इतकं भारी म्हणतात … ! झकास ! निखळ करमणूक . फारच सुंदर.

२१. अष्टविनायक - सचिन पिळगावकर खूप तरुण -लहान असतानाचा . त्यांची प्रेस असते आणि गणपती मंदीर हलवण्याचा त्याचा चुकीचा प्रयत्न असतो तो. शरद तळवलकर also rocks in this movie . सचिन ची नायिका कोण आहे नाव माहित नाही - वीणा ची भूमिका केली तिने. She is very cute lady in ८०s  मराठी सिनेमा .

२२. कळत  नकळत - सविता प्रभुणे आणि गोखल्यांचा . नाकावरच्या रागाला औषध काय ! (Song's Video Added) गाण अशोक सराफ ने स्वतः म्हणलाय  यात ! Best ! Best मामा म्हणून हाच अशोक सराफ येतो डोळ्यासमोर !


२३. नवरी मिळे नवर्याला - यात सचिन - सुप्रिया शेजारच्या शेजारच्या बंगल्यात नोकर असतात . या सिनेमा नंतर त्यांचे लग्न झाले म्हणे. पूर्वीच्या राजघराण्यातल्या राणी साहेब , अशोक सराफ काम न करणारा शिकलेला त्यांचा मुलगा , मग " इशारा तूला कळला ना ! " गाणे । छान आहे सिनेमा, सर्व मोठ्या कलाकारांचे कामही सुंदर.

२४. नवरा माझा करोडपती - सचिन सुप्रियाचा अजून एक छान सिनेमा . सुप्रिया काकू विधवा युवतीचे नाटक करतात तो . शोभा खोटे आजींचे काम फारच genuine !

२५. धाकटी सून - सगळ्यांनाच माहित आहेच. सविता प्रभुणे , उदय टिकेकर , शरद तळवलकर , लक्ष्या , स्मिता तळवलकर ….  सगळ्यांचेच काम , कथा बेस्ट . गुरुवारी सारे जमून जे भजन म्हणतात ते अजूनही फेमस आहे. " मंदिरात - अंतरात तूच नांदत आहे  । नाना देही , नाना रुपी …. "

२६. गोंधळात गोंधळ - रवींद्र महाजनी , प्रिया तेंडूलकर मुंबईतले कपल असतात. त्यांच्याकडे रवींद्र महाजनी यांच्या साऊथ इंडिअन बॉस ची मेहुणी येते रहायला . कारण ती मराठी मध्ये Phd करत असते. मग अशोक सराफ पण येउन -जाऊन असतो. आणि रंजनाची धमाल " प्यांट वालं " म्हणून ती हाक मारत असते अशोक सराफ ला . Nice  Chill -Pill movie . रवींद्र महाजनी was really handsome मराठी स्टार , accepted ! ऑफिस ची कामे मग पिक्चर ची तिकिटे फाडून टाकणे ……। आजच्या IT  च्या जमान्यातला हा टिपिकल घरोघरी असणारा सीन आहे ! :))

1 comment:

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

Different stages in my life.. lets connect like minded 😊

Hi everyone...!!!  It's really after long time writing on my blog.  I have gone through a considerable phases in my life where I have al...