इतकं शहाणं आणि जबाबदार कोणी होऊ नये. समजूतदार माणसाचा सदरा घालून कोणी फिरू नये. परमेश्वर एकदाच का देत असेल लहानपण ? आपण ते जपायलाच शिकलो नाही तर ? आई वडिलांचे छत्र आणि पाठीत बसलेले धपाटे कशाला निर्माण केले असते ? निरागस हसू आणि द्वांड दंगामस्ती विरून का गेले नसते कधी ! इतके खट्याळ , मिश्किल लिहिणारे नामवंत लेखक जबाबदार नव्हते का कधी ? Tom & Jerry बघत हसणारे तुमचे आई -वडील दिसले नाहीत का कधी ?जबाबदारीच्या नावाखाली काय गमाव्ताय ? लाख - दोन लाख पगारात अकाली वार्धक्य विकत घेताय ?
हासत जगणं हे मोठ आव्हान आहे. खूप मोठ होऊन लहान रहाणे यात सार सूख आहे. दुसर्यांना हसवणे हे आयुष्य जिंकल्याच लक्षण आहे. भूमिका बदलत रहातील. आपला अनुभव , शिक्षण , मन , सौस्कार , समाजातील निरनिराळे घटक आपल्याला अनेक गोष्टी शिकवत रहातील. भूमिका कशा हाताळाव्यात , हे तुमचं batting skill आहे . स्वतःला विसरून जीवन जगणे सर्वात गैर आहे. प्रश्न पैशांचा नाही , कावर्या -बावर्या होणार्या मनाचा आहे. मोठे -मोठे म्हणत ओंठ काढून रडणाऱ्या आपल्यातल्या निरागस पोराचा आहे.
पैशाचे आणि EMI चे हिशोब करताना कधीतरी विनहिशोब कोणाला तरी काहीतरी देऊन बघा . एटीकेट्स पळताना कोणाशीतरी खर खर बोलून बघा . केलेलं काम लहानपणी दिलेल्या घरच्या आभ्यासा सारख केलं असेल , तर जवळच्या मित्राला तरी पोरसवदा उत्साहाने दाखवून बघा . त्याच्या शाबासकी वर स्वतःचा खुललेला चेहरा खरच एकदा तरी आरशात बघाच ! अजून शिकावस वाट्ट , मग खूप काहीतरी करीत रहावसं वाट्ट …………. ते काम नसतं फक्त . ते म्हणजे आपला आनंद असतं . आज घालवून उद्याची चिंता अतिरेकी होऊ देऊ नका . दिल तो पागल है । ची instrumental धून ऐकत कधीतरी अशाही स्वप्नात रमून बघा.
जबाबदार्या येत रहातील . त्याची आठवण करून देणारे एक नाही हजार मिळतील.
तुमच्यातल्या तुम्हाला जपणारे खूप कमी असतील. सुख , आनंद , धीर आणि सकारत्मक विचार देणारे खूपच कमी भेटतील.
जो हसत यशस्वीपणे जगतो , तो जग्त्त्जेता असतो . कारण अशा सार्या अवडंबरात तो हसू जपण शिकलेला असतो.
कर्तृत्व आणि स्वभाव दोन्ही जपताना स्वत्व हरवू देऊ नका . आयुष्यातल्या अनेक ठिकाणी " Being Wise & Smart : इथे सपशेल मना आहे ! " बिनधास्त सांगायला घाबरू नका.
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!