loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, April 26, 2013

काही रेअर मोमेंट्स -काही रेअर मोमेंट्स . सध्या भारतातला मे २०१३ . आजची उन्हाळी सुट्टी आणि १५ वर्षांपूर्वीची अशा काही सहजच निघालेल्या गप्पा. आमच्या नारायणपेठेतल्या वगरे आठवणी . अर्थातच त्या एव्हर ग्रीन आठवणी कधीही आठवता याव्यात म्हणून काही बारकावे नमूद करीत आहे . " क्विकली गो थ्रू " टाईपमात्र माझ्या तोंडाचे अखंड चर्हाट ऐकण्यात जी मजा आहे ती येथे नाही. इच्छुकांनी माझ्याबरोबर बिनधास्त गप्पांचा अड्डा मांडवा ..….  :))

प्रकरण - नारायण पेठ


. नारायण पेठेत आमचे पार्किंग उभट बोळा सारखे . त्यातल्या त्यात मोठी मूले - नावे लिहित नाही . मी , माझ्या समोरची , वरच्यान्कडे आलेला मुंबईकर भाच्चा - आम्ही दगड का माती खेळत असू .
. माग्च्यांचा लहान मुलगा , खालचा, त्याचा आतेभाऊ आणि माझा भाऊ - खाली क्रिकेट खेळत . एकदम वरच्या मजल्यांवरील दोघे नंतर येऊ लागले . हे खेळ चालू असताना खाल्च्याची आजी नेहमी त्याला " इनो " आणायला सांगत . एकदा त्याने आजीला उच्चारून फेकलेला दायलोग अजूनही आम्ही अनेकदा आठवून आठवून पोट धरून हसतो. त्या आजी परवाच्या रामनवमीस स्वर्गवासी झाल्या . असो.
. खालचा आणि माझा भाऊ एका वयाचे. आणि मागचा छोटा मुलगा - हा आमच्या घरात खेळणारा ग्रुप. पिकनिक - हा गेम घरात - सतत .
दर शुक्रवारी शाळा सुटली , की यांचे विक एंड सुरु होत. एकमेकांना बोलवायला जाणे ; हा दप्तर घरात टाकल्यानंतर चा पहिला कार्यक्रम . मग " इनो " …… या बहाण्याने कोपर्यावरच्या मन्या च्या दुकानात . मग बिग बाबुल / बुमर वरचे Tatu साठी ते घ्यायचे . किवा ही लहान गटातील मंडळी पोकेमोन आणि क्रिकेट चे Tazo आणि कसली ती कार्ड्स जमा करायची - त्यासाठी पेप्सीकोला सदृश्य लिक्विड चोकलेत. मी आणि मझा भाऊ आम्ही जरा standard - जेली खात आसू :)
. माझ्या भावाकडे अजूनही - गठ्ठे ट्रम कार्ड्स आहेत ! एकदा त्याचा शाळेतला एक मित्र बाईंना फितूर झाला . आणि त्याची काही कार्ड्स जप्त केली . माझा भाऊ तेव्हातर फारच शांत . घरी आल्यावर गपचूप - तोंड पाडून . आणि मी पहिल्यापासून आगाव , डेरिंग बाज , नाटकात उत्तम अभिनेत्री , दरवर्षी वक्तृत्वाच बक्षीस मिळवणारी .. मी आगदी " Dont worry ! Mai हू ना " टा ईप तितक्याच गांभीर्याने माझ्या भावाच्या पाठीशी उभी राहिले.
 . दुपारी आंबे - कार्टून नेटवर्क वरचे रोड रनर किवा स्कूबी डु ची मुव्ही . मग संध्याकाळी रुपये / तासाला या दराने छोटी सायकल समोरच्या " आनंद " वाल्याकडून घ्यायची . हमाल्वाड्यात तासभर पिदडायची. दर शनिवारी मी आणि माझ्या समोरची . :) ( आता तेथे बहुमजली पार्किंग आहे ::( )
. मुंबईकर भाच्चा आला असताना एकदा त्याने मला रम्मी शिकवायचा प्रयत्न केला होता . पण भिकार सावकार सोडले तर मला फारसे येत न्से. अजूनही येत नाही . पुढे उल्लेख येईलच. असो , तर त्यांच्या घरी मामा-मामी , जुळ्या बेबीज , आजी आजोबा , आणि मुंबैकर भाच्चा आम्हा पुणेकर दोस्तांबरोबर . :) अशी एखादी दुपार असे
. शनिवारी बाबा घरी . मग दुपारी अडीच ते साडेतीनला कुल्फीवाला येत . १० रुपयात 3 ! मी आणि मागचा छोटू आम्ही कुंडा घेऊन तयारच असू . आवाज आला ; की पळत सूटू. :)
 . मोठे झालो - म्हणजे हायस्कूल मध्ये तसं रात्री 0 नंतर रस्त्यावर - badminton . आम्ही इतके पुढे -मागे होत की आमचे घर ते लोखंडे तालीम एवढे मोठे फेरे होत :)
१० . पुणे मराठी ग्रंथालयात मी बाल विभागापासून आजपर्यंत मेम्बर . पण पुस्तक तासात वाचून होई . दुसर्या दिवशीच नवे मिळे . मग मोफत बालवाचनालय सुरु झाले - उन्हाळी सुट्टीत . मी काय पुस्तकं खल्लिएत ! :) हाहा …. :)
११. नंतर नंतर माझी आते बहीण यायची दुपारी किवा संध्याकाळी - शनिवारी . राहायला चिंचवड . पण रेणुका स्वरूप मध्ये ती भरत नाट्यम ला येत.

प्रकरण : माझ्या चुलत भावाच्या घरी

. तो आणि मी एका वयाचे . मी महिन्यांनी मोठी . चिंचवडचे त्यांचे घर .
. कधीही गेले , तरी बिचारा अभ्यास करीत असायचा . तो गाईड वापरे . मला त्याचे भारी अप्रूप ! मी वापरले नाही कधी . मी स्व अभ्यास आणि व्यवसाय . व्यवसाय तो पण वापरी.
. त्याच्याकडे मला " चांदोबा " वाचायला मिळे . स्वभावाने तो शांत . आजी त्याला " श्री " म्हणे . :) हिंदी , मराठी चांदोबा तो माझ्यासाठी जपून ठेवी :)
. त्यांच्या भिंतीत खिडकी आहे . आम्ही दोघे खिडकीत बसून ( फर्निचर मध्ये खिडकीपाशी बसण्यास जागा आहेसमोरचे आवळ्याचे झाड न्याहाळीत असू . नुसते हलविले की चिक्कार आवळे पडत ! :D ( झाड शेजारच्या बंगल्यातले :-p  )
. संध्याकाळी तो ग्राउंड वर खेळायला जात असे .

विशेष आठवण :

. मी
एकदा मी सिनिअर केजी मध्ये असताना शाळेतून लवकर निघून आले . आईची आठवण आली म्हणून . ते पण वेल प्लंड ! आईने बँकेत बोलावले आहे असे सांगितले . मी बाईंची लाडकी . त्या स्वतः मला सोडायला आईच्या बँकेत . ते आम्ही कसे पोहोचलो ते पण प्रकरणच आहे . असो . बँकेत सगळे माझे लाड करीत . मला घेतले ठेऊन . आई पुण्याला आली होती . आम्ही तेव्हा चिंचवडस रहायला होतो . बाईंना बाय केले ! डिंकाचा लाडू बीडू दिला मला , सगळ्यांच्या कडेवर फिरले . मग हाफ डे बँकेचा शनिवारी ! लोकांनी विचारले ; कोठे
जाणार ? मी तेव्हा पाळणाघरात राहत . पण  काका माझ्या धाकट्या काकाच्या घराजवळ . मी सांगितले - काका कडे ! :D  त्यांनी मला काका कडे सोडले ! काका ने आपले - "अरे वा ! याया ! " म्हणत मला ठेऊन घेतले . तेव्हा मोबाईल काय घरी फोन पण नव्हते ! माझ्या आई बाबांना मी पाळणा घरात नाही हे बघून काय धक्का बसला असेल , ईश्वर जाणे ! कुठे कुठे शोधत काकाकडे आले असतील - देवा ! मी काकाकडे खेळत होते . नंतर काकाला सारी हकीकत कळली ! :)

माझा चुलत भाऊ:
एकदा आम्ही रात्री सारे हॉल मध्ये पडलो होतो . मी हायस्कुलात असताना ! बघितले तर दार उघडे ! माझा चुलत भाऊ गायब ! बाहेर बघितले तर तो एकटाच जिन्यापाशी हवा खात होता ! तो झोपेत चालत असे. :D

आमच्या नारायण पेठेतल्या घरी सुद्धा त्याने एकदा झोपेत खिडकीवर चढण्याचा प्रयत्न केला होता . आम्ही दिवस हसत होतो !

प्रकरण - आजीकडे - नारायण पेठ ( आई ची आई )

. क्वचित दुपार आजीकडे .
. आजी . मावशी , मी - आम्ही पत्ते खेळत असू . मला -- येत . इकडच्या आजीने शिकवलेलं.
. मग समोरची . जोशी ताई आणि खालची . कुलकर्णी मुलगी - आम्ही . कडे पत्ते खेळत असू . पेठेतल्या आजीने एकदा झब्बू शिकवलेला . . ने " Not @ Home " शिकवले . बाकी पत्ते या प्रकारात माझी प्रगती इतकीच. कित्येक वर्षे माझा कधी संपर्कही नाही त्या पत्यांशी !
. एकदा . ने खळ + कागद मिक्स केले . एका फुग्या वर  दोरा बांधला सगळ्या बाजूने - जाळीदार . त्यावर तो तयार केलेला गम . रात्रभर ठेवला आणि दुसर्या दिवशी फोडला म्हणे फुगा . मी गेले तर मला मस्त पोकळ दोर्याचे गोलाकार नेट दिसले . ती आता कायमची अमेरिकावासी . तिची मुलगी छोटी - आजी कडे येउन गेली म्हणे ! :)
. मग मला ताकातले पोहे लागत . चहा नंतर . " आईसारखे केलेस तरच मी खाईनअसे मी आजीला निक्षून सांगत .

प्रकरण - आत्याकडे

. तिकडे दादा आजोबा असत. ते फार वेगळे हसत . आणि खूपच छान होते एवढे आठवते .
. माझ्या आते- भावाला मी पाटीवरच्या पेन्सिली खाताना पकडले आहे . तो त्याच्या मित्रांना त्यांची पार्टी देत .
. माझी आते बहीण प्रेमाची . ती मला तिच्याबरोबर तिच्या मोठ्या मैत्रिणींकडे नेत. हळदी - कुक्वाचे बोलवायला पण.
. आते - भाऊ सारखा " आजूबाचा मास्क लाऊन फिरे . किवा खाली क्रिकेट . घरी असला तर घोडे . त्यांच्याकडे लाकडी घोडे होते हातभर . मला खेळायला घेत नसे . अगदीच मी म्हणले तर एक घोडा मला . घोडा घेऊन काय करणार ! हाहा ……
. पण मला आत्याकडे चंपक , ठकठक मिळे . आणि त्यांच्याकडे बाल्कनीत झोका होता . आणि आत्या ने एकदा लाल पोहे केलेले मला
आठवतात .मिरची घालता तिखट घालून ! तेव्हा भारी मजा वाटली होती . आईचे पोहे तर पिवळे असतात !! :) हाह्ह्हाहा !

प्रकरण - माझी मोठी चुलत बहीण

. ही मला खेलावतानाचे फोटो आहेत . पण मला आठवत नाही . मी खूप लहान तशी . वर्षांनी .
. मला तिचे परीक्षेचे पेपर बघायला आवडे . मोठी मुलंच फूल स्केप वर लिहित . ते कुतूहल . आणि हीच अक्षर सुंदर !
. ही आणि हिची मैत्रीण . मला त्या दोघी हाय स्कूल मधे असताना चुकता शाळा सुटल्यावर ; माझ्या घरी येउन हाक मारीत . मी खाली गेले ; कि मला वेग वेगळ्या आकाराच्या - रंगीबेरंगी पेपर मिंट च्या गोळ्या मिळत . :)
. आणि हि मोठी म्हणून हिच्या मैत्रिणीन्न्ब्ररोबर  आम्ही एकदा रात्री गणपती बघत हिंडलो होतो . ती एक मजा .
. आणि गणपतीत हमाल वाड्यातून जाऊन आम्ही लक्ष्मी रोड वर जागा पकडून ठेवत असू . मिरवणूक बघायला . त्यातही हि असायची :)

आता दमले मराठी टायपून ………… हूश !

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

BRITISH - Hi Tea हाय टी " हाय टी " म्हणजे नक्की आहे तरी काय ? चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे ? की ...

Listed on: link directory