loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, May 23, 2025

हे सही आहे ! :) लेखन - वाचन ..

 मी ब्लॉग लिहिला इथे , परवाची पोस्ट .  बरं वाटतंय ... लेखन वाचन आपल्याला आपल्या विश्वात आणून सोडते आणि आपण वेळेचा पण छान उपयोग करतो .  नाहीतर सतत बाहेर काहीतरी शोधत राहतो .  

१ . कुठे थांबायचं हे प्रत्येकासाठी वेगळं असतं आणि ते ज्याचे त्याला समजले पाहिजे . आणि आपापल्या स्वभावानुसार आपण आपल्याला छान वाटेल ते करत राहावे .  

२ . आपल्या स्पेशल विश्वाचा ऍक्सेस स्पेशल लोकांना असावा आणि असे खास लोकं आपल्या आयुष्यात असावेत .  

३ . मला वाटतं , कोणाशी बोलल्याने किंवा युट्युब करून आपण ते सगळं बाहेर टाकून देतो .  लिहितो तेव्हा ते सुंदर मऊ मुलायम विश्व आपल्या भोवती थंडीतल्या शालीसारखं गुरफटून राहतं आणि त्या भावविश्वात आपण सुखाने जगतो 

४ . डोकं शांत राहतं लिहिताना आणि लिहिल्यावर .  मग सुचत जातं अजून काही ,  काय करावे वगरे आणि गोष्ट पुढे जाते .  बोलून आपण तिथेच अडकतो आणि कोणाशी बोलले तर त्याला पण प्रोब्लेमच्या त्याच टप्यावर आणून उभे करतो.  :)

५ . आपल्या बेस्ट लोकांशी गप्पा मारायला मला पण खूप आवडते ,  पण त्यासाठी आपला विचारमंथन होऊन आपण रेडी असलो तर मजा येते .  



माझे अपडेट्स -

मला आयुष्यात ह्या वळणावर आपले परके कळले .  त्यामुळे फायदाच असतो .  पण कळण्याची दैवी योजना धक्कादायक आणि संकटासारखी भासते .  पण हे शहाणपण म्हणजे सुखी आयुष्याची गुरुकिल्लीच नव्हे का . .! 

मला हे पण समजले ,  की अनेकदा काही प्रेमाच्या लोकांनी सहज काही छान क्षण मला दिले , माझ्या लक्षात पण नाही आले .  म्हणूनच ,  ह्या अनुभवांना मी थँक्स म्हणेन .  जिथे असं नसतं ते ओझरतं का होईना बघितलं आणि जे आहे ते अनमोल आहे हे समजले :) म्हणजे मी परीक्षा वगरे तत्सम आयुष्यात व्यस्त होते . हे लोकं छान वागले मी पण .  आम्ही मजा केली .  तेव्हा त्यात काही विशेष आहे मला समजले नाही .  आज समजले .  


आयुष्यात प्रेमाच्या माणसांना जोडायचे मी पुन्हा ठरवले आहे :) मी शिकलेले अनुभवाचे आणि शहाणपणाचे धडे ह्यातही माझे मार्गदर्शन करतील .  हेल्थी बाउंड्रीज दोन्ही पक्षांच्या दोन्ही पक्षाने पाळाव्या .  प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर सारी नाती असावीत .  सिक्रसी फार महत्वाची. आणि आपल्या खास लोकांना हे फक्त जाणवून द्यावे की तुम्ही स्पेशल आहात माझ्यासाठी .  सर्व लोकांबाबत आणि निगेटिव्ह लोकांबाबत हे करू नये .  लांब राहावे .  आपले आयुष्य प्रेम ,  शांततेने जगण्याचा आपल्याला अधिकार आहे साऱ्यांनाच ..हेहे.. :) बरं , तर इथे उल्लेखित एक स्त्री असून त्यांच्याशी मी काही कालांतराने बोलण्याचे ठरविले आहे . सिक्रेट गप्पा :)

मी देवप्रेमी आहे ,  देवाने खूप प्रेम केले आणि पदोपदी माझ्याबरोबर राहिला .  म्हणून आज मी इथे पोहोचले .  बरेच काही हॅन्डल करून .  पण हे सही आहे ...  :)

ह्याआधी मला हे इतके समजले नव्हते .  कोणाच्या बरोबर राहणे ...ह्यात आमूलाग्र बदल झाला माझ्या आयुष्यातील घडामोडींमुळे .  मी तशी प्रेमी , आळस हा माझा मित्र आहे हे ब्रीदवाक्य पाळणारी. हेहे ........... पुस्तकं , झकास यमी फूड , ( सिक्रेट -  माझं वॉलेट .. :p ) झकास स्टाईलिश लूक आणि मग आपले कॅट्स - डॉग्गी वगरे आणि लॅपटॉप मोबाईल टॅबलेट . आपण सेट .  प्रेमात ..... स्वतःच्या ,  आयुष्याच्या ..आणि हो ,  माझ्या आयुष्यात एक टाळकं आहे खास - प्रेमात आहे त्याच्या पण .  

शॉपिंग ऑनलाईन आणि गप्पा इन द शाल , मुव्ही ऑन द सोफा ----------------------------

झक्कास ! ही मी .  

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

पृथ्वीवर कलियुगाचे आगमन याची कथा - पौराणिक

राजा परीक्षित जो कृष्णाचा नातू आणि अभिमन्यू चा मुलगा होता तो एकदा जंगलात फिरायला गेला असताना त्याला काळा पुरुष दिसला त्यांनी त्याला विचारले ...