पावसाळा किंवा आवडता ऋतू यावर शाळेत निबंध लिहिला असेल मी बर्याचदा . पण आज
आमच्या पुण्याच्या पावसावर लिहिते. केतकी इतराज आणि पावसाचा काय संबंध ते
आधी बघू ! :D
कधीही पावसात चिंब भिजायला आवडते अशी " ती " म्हणजे केतकी इतराज ( म्हणजे मी :D )
लहान असताना हुजुरपागेतून ( शाळेचे नाव ) नारायण पेठेतल्या घरी म्हणजे बेताचेच अंतर. मग सगळ्या लक्ष्मी रोडला प्रदक्षिणा घालून मग आमची स्वारी भिजत घरी येत. :D येताना साडेतीन रुपयांची क. दा . खायची गरम गरम ! झकास ! :D शाळेचा पहिला दिवस - ७ जून . नवे रेनकोट घालून शाळेत जायचे या पिढीचे स्वप्न साकारायला या वर्षी मान्सून वेळेत दाखल झालेला आहे. हे भाग्य माझ्या पिढीला नेहमीच लाभले. शाळेत नवे पावसाळी फ्लोटस आणि गुढघ्या पर्यंत स्कर्ट घालून जायचे. वर्गात सार्यांचे निथळत लावलेले रेनकोट खिडक्यांच्या दारांची शोभा वाढवत :D काय मस्त असतो नव्या रेनकोट चा वास ! झक्क !
मी भिजून शाळेत बसले आहे. चित्रकलेच्या वर्गात , मधल्या सुट्टीत , लायब्ररीतून धावत बाहेर येउन सुद्धा मी भिजले आहे. शाळेतला पाउस नेहमीच धमाल होता.
पुण्याचा पाऊस ………. ! तर , अजूनही पाणी बघायला बा .
पुं . वर जाणे म्हणजे पुण्याचा पाऊस . आमच्या ओम्कारेश्वारास नदीचे पाणी
लागणे म्हणजे पुण्याचा पाऊस . भिडे पूल पाण्याखाली गेला ; म्हणून माझे
कोलेज बुडले आहे. आजी माझी - ओमकारेश्वराजवळ रहाते न … नारायण पेठेत . तेथे
" नदीपात्रा जवळील लोकांना सतर्कतेचा इशारा ! " असे सांगत फिरणाऱ्या
कॉर्पोरेशन च्या गाड्या बघत थांबणे म्हणजे पुण्याचा पाऊस. आमचे आजोबा 1९६२ च्या पुराच्या रिअल स्टोरीज पण सांगतात मग .