४ जून १९४७ म्हणजे अशोक मामांचा वाढदिवस ! या दिवशी मराठीतले अष्टपैलू अभिनेते , तुफ्फान वेड - कॉमेडी अभिनेते आणि समस्त मराठी सिने सृष्टीचे " मामा " या जगाच्या रंगमंचावर अवतरले ! आजपर्यंत अफलातून चौकार - षटकारांची उधळण करीत त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे असेच अधिराज्य गाजविले ! सध्याच्या केबल युगामुळे मामांचे अनेक चित्रपट आमच्या तरुण पिढीला बघायला मिळाले. त्यांच्या विविध भूमिका , गेटअप , त्यांने सादरलेले प्रत्येक पात्र जणू " बास ... ह्या भूमिकेसाठी अशोक मामा च ! " असे दिलखुलास उद्गार प्रत्येकाच्या तोंडून काढावयास लावतात ! त्यांची जादू काळाच्या बंधनाला झुगारून चालूच राहील , नि:सौंशय ! दिवाळी चा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि मामांच्या अभिनयाला सॉल्लिड झकास आतिषबाजीयुक्त मानवंदना करण्यासाठी त्यांच्या अभिनयाची फोडणी असणारे माझे आणि साऱ्यांचेच प्रचंड आवडते चित्रपट - खास रसिक वाचकांसाठी !
वाचताना , ते क्षण - सिन जगताना साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलावे आणि आठवणी आणि धमाल चित्रपटांच्या सोबतीने आपले काही विरंगुळ्याचे क्षण हास्यमय व्हावेत म्हणून मामांच्या चित्रपटांची लिस्ट. कधी वाटते , काही बघावे आणि नेमके तेव्हा काही नसते टीव्ही वर ! किंवा आमच्या बंधुराजांसारखे मराठी मनाचे काही बंधुलोक फिरत असतात परदेशात आणि आठवण येते आपल्या घराची , त्या वातावरणाची --- तेव्हा मग काढा ही यादी , युट्युब वर होऊन जाऊद्या !
काही मस्त मराठी सिनेमे - आवर्जून बघावेत असे . जेव्हा निवांतपणा , घरगुती टच , आपुलकी , निखळ करमणूक , स्वा - नंद हवा असेल तेव्हा !
२. बाळाचे बाप ब्रह्मचारी - अशोक सराफ , लक्ष्या , रे काका , सुधीर जोशी, निवेदिता आहेतच. मर्फी rocks …. ! किशोरी शहाणेच्या बाबांचे काम करणारे , TV दुरुस्त करायला घरी अशोक सराफ येतो तेव्हाचा सीन झकास ! आणि …. सरकारी नोकर बारीकसे ते काका - तोड नाही राव ! मस्त ! लक्ष्याच्या लायब्ररीचे ते क्लाएंट असतात आणि त्यांची मुलगी जाडी लक्ष्यावर लाईन मारत असते . अशोक सराफ लक्ष्याचा मामा बनून त्यांच्या घरी जातो तेव्हाचे सौवाद म्हणजे हसा आणि हसा फक्त ! छान आहे मूव्ही . यात कांचन अधिकारी ने घारपुरे असताना ( लग्ना आधी ) अभिनय केला आहे.
३. अशी ही बनवा बनवी - ए ! लिहित का कोणी या मूव्ही वर ! सगळे प्रसंग म्हणजे हिट सीन , सुधीर जोशी rocks … दारू पिउन घरी येतात तो सीन झकास ! ( Scene Video Added ) सगळंच आणि सगळेच बेस्ट
४. शेजारी - शेजारी - " प्रश्न उत्तर असते नेहमी शेजारी शेजारी " गाणे मला फार आवडते म्हणायला . भारी आहे. पूर्वीचे लाईफ स्टाईल मस्त दिसते यातून. मोठाले बंगले , निवांतपणा , बायकांची खरी मैत्री :D , शेजार्यांची एकमेकांना मदत करायची प्रवृत्ती , झकास निवांत , आणि फारसा न बघितलेला छान पिक्चर आहे.
५. धुमधडाका - हा माझा all time fav. माझ्या भावाचा पण ! अरे तोड ए का ! निवांत बंगला , मर्सिडीज …… आजही सातार्याला परमेश्वर कृपेने वातावरण , लोकं अशीच छान आहेत . अशोक सराफ ने बेस्ट actor चे सगळे निकष तोडत विक्रम केलेले आहेत . आवाजाची चढ - उतार , " व्याख्या -वूक्खू -विक्खी " खोकत बोलणं …