साऱ्यांसाठी पूरक योगा: शवासन
आजच्या दैनंदिन जीवनात घड्याळाच्या तालावर नाचताना
व्यायाम करा अशी पुस्तके आपण इंटरनेट वर वाचतो ! काय हे उपरोधात्मक वागणे !
व्यायाम करा म्हणून पूर्वी आजी -आजोबा सक्तीने
जोर -बैठका काढावयास लावत. टेकड्यांवर धावायला -पळायला मिळे . उन्हाळ्याच्या सुट्टीत
मामाच्या गावी / आजोळी जाऊन दिवसभर धुडगूस चाले. कधी परसातल्या विटी दांडू - क्रिकेट
च्या मॅचेस . कधी आंबा - माडाच्या झाडावर चढून गोळा केलेला अमृततुल्य माल , कधी रानातल्या
करवंदे - मैना - आवळ्यांने भरलेली ओंजळ ! धमाल !
आता मात्र समर -कॅम्प किंवा व्हेकेशन
बॅच मध्ये जाऊन पोरं नाकावर चष्मे चढवून कॉम्पिटिशन च्या चक्रावर चालण्याचे बाळकडू
घेत असतात. मग ऐन तिशीत , डोक्यावर चाकाकता चांदोबा , पोटाचा नगारा , खिशात बीपी -डायबेटीस
च्या गोळ्यांची पाकिटे आणि खूपच यशस्वी उद्योजक आहात याचं प्रूफ म्हणजे झोपेच्या गोळ्या
! असा राजेशाही थाट दिसतो. तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट रेट च्या चक्रवाढ व्याजात
बोनस म्हणूनही असे निरोगी आयुष्य आणि निवांत पणा मिळेना !
कालाय तस्मै नमः ! हे वचन ध्यानी ठेऊन माणसाने
आनंदाने जगावे . अगदी बरोबर . पण माणसाच्या हुशार बुद्धीला यातून योग्य पर्याय निवडून
तब्बेत सांभाळणे सहज शक्य आहे. सांगतेय भन्नाट -फट्टू आयडिया - फास्ट फूड च्या जमान्यात
फिट राहण्याच्या !
१. साऱ्यांसाठी शक्य आणि उपयुक्त व्यायाम :
फास्ट चालणे
जॉगिंग करणे
दोरीवरच्या उड्या मारणे
टेनिस, बॅडमिंटन यांसारखे खेळ.
पोहण्याचा नियमित व्यायाम
सायकल