अक्षरशः अनेक वर्षांनी मी इथे लेख लिहीत असेन. मराठी ललित / वैचारिक मधला मोडणारा. अनेक मुद्दे आहेत , कुठेतरी खुपणारे. मी काही कोणी प्राज्ञ, वैचारिक म्हणून लिहीत नाहीए. पण दिलखुलास , बडबड्या , मस्तीखोर केतकीचे हे म्हणणे आहे.
मला पुन्हा एकदा खूप छान वाटते , की मी खूप छान काळात जन्म घेतला. आम्हाला खूप छान शाळा , मराठी सौस्कृती , खूपच अप्रतिम मैत्री , टिपिकल पुणेरी चौकोनी कुटूंब , पुणेरी पेठेतील बालपण , पुण्याचा गणपती उत्सव अनुभवायला मिळाले ; आणि करिअरच्या टप्यावर इंटरनेट , आयटीचा जमाना पण आम्हाला मिळाला. मला इंटरनेटशिवाय जगणे आज अशक्य आहे. मी कामासाठी सोशल नेटवर्क वापरते, वैयक्तिक आजिबात नाही. पण तरीही ऑनलाईन शॉपिंग , वाचन , यु ट्यूब , भाऊ परदेशी असल्याने व्हिडीओ कॉल , मग तो येताना मला हवे त्याची मी इथून परदेशी वेबसाईटवर त्याच्या परदेशी पत्त्यावर होम - डिलिव्हरी पाठवा म्हणून ऑर्डर देते त्याची मजा , अनेक नव्या लोकांना भेटणं - गप्पा मारणं इंटरनेट मुळे शक्य आहे. अनेक देशातले , विविध वयोगटातले लोक विविध निमित्ताने संपर्कात आहेत. पण मला असे वाटते , ह्या साऱ्या शिवायचे आयुष्य आजच्या पिढीला माहीतच नाही. मी काही म्हातारी नव्हे. जेमतेम कॉलेज मधली दिसते - त्यापेक्षा वयाने थोडी मोठी आहे. पण पिढीचे अंतर पडावे इतके आयुष्य १० वर्षांत बदलले.