loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, July 13, 2020

प्रेम


माझ्या ब्लॉग वर प्रेम नावाची पोस्ट नाही , नवलच !
हम  :) मी कुठे होते असं मला कोणी आज विचारलं.
आयुष्य अफलातून आहे आणि मी जगत होते अफलातून :)
मी उत्तर पण दिलं अफलातून ! मी म्हणलं , स्वर्गात ! सत्य च बोलते मी नेहमी.
गंभीर न लिहिता सुंदर लिहिते कारण माझे बरेच साम्राज्य आहे इंटरनेट वर आणि इथे आज अचानक आले :)
फक्त प्रेमाबद्दल लिहिते.

प्रेम म्हणजे सर्व जग , प्रेम म्हणजे परमेश्वर. सारीकडे प्रेमाची दुनिया आहे जी देवाने वसवलेली आहे.
आपण ह्या मायावी दुनियेमध्ये प्रेम होऊन जगावं , आयुष्य भरभरून जगावं आणि सगळ्यांना आपलं सुंदर
पॉझिटिव्ह रूप दिसेल ह्याची काळजी घ्यावी :) अखंड पॉझिटिव्ह राहावं , हे जमतं जिथे प्रेम असतं कारण प्रेम वेडं असतं.
ते गणिती हिशोब मांडत नाही , काळ -वेळेचे , ते प्रेम करतच राहतं .. जे असीम आहे , ज्याला कसलीही सीमा नाही असे
हे प्रेम आपल्याला विश्वास रुपी मार्गाने आयुष्यातल्या सर्वोच्च आनंदाकडे नेते.

प्रेम स्वतःवर असावं , नवरा - बायको चं असावं , पशु -पक्षांवर असावं , वाऱ्यावर हलत्या झाडांवर - गालांवर स्पर्श करत्या झाडांच्या फांद्यांवर - प्रेमळ वाऱ्यावर असावं , एकांतावर असावं , झोका - डिझायनर कॉफी मग , क्मफी उशी , मोकाट झिपरे , सुंदर लिपस्टिक , घरातल्या प्रत्येक कोपऱयावर असावं. माझं तर एक विशेष प्रेम आहे , अंधारात जळणाऱ्या समईवर :) मग येणाऱ्या त्या विशिष्ठ वासावर :) जेव्हा आपण प्रेम होऊन जातो तेव्हा सारीकडे प्रेमच प्रेम दिसतं :)
प्रेम नसतं तर मीच नसते :) अगदी प्रियकर - प्रेयसी च्या प्रेमा आधीपासून माझं पुस्तकांवर प्रेम जडलेलं आहे , आई बाबांच्या कडेवर फिरायचे तेव्हापासून. देवबाप्पावर भयंकर प्रेम आहे , माझ्या घरावर प्रेम आहे , पेट्स वर आहे आणि खूप खूप आहे

बाकी काय चाललंय सोडा , इंटरनेट नव्हतं तेव्हा जग लहान होतं
आमही टिपरे बघायचो , पती सगळे उचापती नाटक बघून कुटुंब हसायचो
आता सगळे मोबाईलमध्ये मुंडी :) सारे होते ते चांगल्यासाठीच. टेक्नॉलॉजीवर प्रेम करा , म्हणून जुन्या छान प्रेमांना पण सोडू नका.
मी आहेच टेक्नोसॅव्ही , सगळं तर माझं काम तसंच आहे. लॅपटॉप , मोबाईल , टॅबलेट सगळं असलं म्हणजे मला क्मफी वाटतं.
आता टँबलेट वर रस्किन बॉण्ड चं निसर्ग वर्णन असलेल्या गोष्टी वाचतेय - झकास ! भाषेवर प्रेम पहिल्यापासून , मी लहान असताना पण रागावले की
इंग्लिश मधून भांडायचे . आता प्रेमाने राग उडून गेला पण इंग्रजी आणि मराठी वर प्रेम सारखेच ! अमेझॉन किंडल हक्काचे झाले , इंग्लिश बुक्स वाचते , लिहिते सवयीचे कधी झाले कळले पण नाही. आयुष्य कॉम्बो -मिलाफ -फ्युजन झाले पण आयुष्यावरचे प्रेम वाढत गेले :) प्रेमाने माझ्या आयुष्याचा कायापालट केला , ब्लॉग चा नव्हे ! ( ह्या वेड्यावर कुठनं प्रेम केलं आणि अडकले असं होतं कधीतरी , पण तेच - वेडं प्रेम ! )

सगळं कसं हातचं राखून असावं .
सिक्रेट्स इन. पोस्ट एंडुंग. ;) 

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...