किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य !
अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला ..
मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे .. आयुष्याला लिहायचं विसरले नव्हते :)
पण ब्लॉग वर नाही फार
हा ब्लॉग अचानक सुरु झाला प्रेमातून
आयुष्यावरच प्रेम ह्यातून लिहिलं
खरंच परिकथेसारखा एक देवमाणूस भेटला
च्यायला ! प्रेमातच पडले !
माझ्या प्रेमाच्या एक स्त्री फिगर आहेत आयुष्यात माझ्या
त्या म्हणल्या - केतकी .. अगं तू काय आहेस ! कशी गं अडकलीस !
श्रद्धा , प्रेम , विश्वास , ज्ञान , सकारात्मक दृष्टिकोन
ह्याने मी जगत आले .. पण ह्या ब्लॉग मुळे माझ्या डोळ्यांतून आसवं बाहेर आली
कित्ती मोकळं वाटलं --- लोकं म्हणतात तू स्ट्रॉंग आहेस !
मी प्रेमळ आहे खरंतर , माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे
सगळ्यावर माझं प्रेम आहे , घर , कुटुंब - माणसं
त्यामुळे ती विचित्र वागली तरी प्रेम जिंकते माहित असल्याने मी आनंदी राहू शकते
देव आहे, आध्यात्मात बरीच उंच पोहोचले मी
ह्या प्रेमाच्या आयुष्याच्या प्रवासात
ज्याच्यावर प्रेम केलं .. भावी जोडीदार म्हणून.... तो आहे प्रेम ...
पण मनाने हरला होता - असं काही नसतं , जाऊ दे , नाही शक्य ..
मी प्रेम करत राहिले. स्वतःवर , देवावर , सगळ्यांवर , त्याच्यावर
आयुष्य एकदम सिनेतारकांसारखं चालू आहे
कदाचित मी उद्या मोठी सिनेतारका होईन देखील .. असो
प्रेम , मान्य न करणं , तरी चिडवणं - भांडणं , मग क्लायमॅक्स १
तोडातोडी , वाईट माणसं ...
केतकी काय करेल ? चिडले ..आधी समजावलं , ह्याच्या आईशी बोलले
कानाखाली काढली त्याच्या .. घरी आले .
आयुष्य बदलण्याची ती सुरुवात होती , त्याच्याशिवाय आयुष्य नाही हे समजलं
जितकी लांब होते त्याच्यापासून तितकं ...
मी प्रेम झाले , दिसणं ..वागणं ..बोलणं बदलून गेलं :)
आम्ही लांब आहोत , हे पण हवेत विरून गेलं
तू हवी आहेस , म्हणून आहे त्या परिस्थिती शुद्ध वेडेपणा
हा माणूस करत गेला
मी त्याच्यावर प्रेम करत गेले...
अचानक माझ्या ह्या प्रेमाच्या स्त्री पात्राची जबरदस्त कॉन्ट्रास्ट इव्हेन्ट मुळे
आयुष्यात एंट्री झाली , त्यांनी काही सांगितलं .. माझं त्याच्यावरचं प्रेम बघून
सगळे स्तिमित झाले ! मी .. ?
मी जगते आहे , प्रेमाने .... कोणी दुखापत करण्याचा प्रयत्न केला ..
पण मी प्रेमानी मलम लावला आणि काही झालंच नाही असं दाखवलं
काय होणार पुढे ? ( तसं माहित आहे , पण कसं घडणार )
हा प्रेम करणारा वेडा माणूस , खमका पुरुष म्हणून वागेल ?
आयुष्यभर वेडेपणा सांभाळत का जगू ? लग्न महत्वाचं आहे
तसंच ह्यानी चांगलं व्हर्जन होणं पण... एकत्र येऊन आयुष्य प्रेमाने जगावं ..
ह्याला कधी कळेल ?
हा वेडेपणा थांबवेल ?
चिडू ? रागावू ? त्याला भित्रा म्हणू की मूर्ख प्रेमी ?
.. हिजडा ?
एक स्त्री , मंगळसूत्र , कुटुंब ..
प्रेमाची परिपूर्णता म्हणजे पवित्र पती पत्नीचं नातं , लग्नात बांधलेलं
कधी रुसायला कधी मस्ती करायला लागणारा लाडाचा दीर
ब्लाउज शिवायला वगरे न्यायला सोबत - प्रेमाची जाऊ
चौघांची मस्ती , खादाडी ..
ह्या माठ्याला कधी कळेल का ?
मला असं वागवण्यापेक्षा एकत्र मजा जास्त येते
आणखी काही प्रगती करता येते आयुष्यात , ह्याला कळेल ?
कधी ? दीर काय करेल माझा ?
पहिले मला हा नकोच होता , बेवडेगिरी करायचे ना दोघे ..
मग ह्याचं लग्न झालं तेव्हा मी , आमच्या येड्याला सांगितलं
अरे , त्या दोघांना जरा फिरू दे
सारखं मागे जाऊ नकोस त्याच्या ...
आणि आता ?
आता मला मस्ती करायला , ह्याला सपोर्ट देण्यासाठी
आपला माणूस म्हणून कोणी हवा वाटतो - तर तो माझा हा दीर.
मराठी सिनेमा - आनंदी आनंद
त्यातली अशोक मामांची भूमिका बघून मी ह्याला भाऊजी म्हणायचं ठरवून टाकलं आहे
मी आहे ५ फूट , दिसते कॉलेजमधली , ३/४थ मध्ये फिरते
पण .. काही झालं की हक्कानी .. भाऊजी ? :)
हे त्या सिनेमातलं नातं मी ह्याच्यात शोधतेय :)
काय होईल ? कसं होईल ?
माझ्या आयुष्याची गोष्ट आहे , कॉपीराइट्स माझ्याकडे
प्लिज सिनेमा काढू नका . चालू आहे स्टोरी