loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Thursday, October 30, 2025

पृथ्वीवर कलियुगाचे आगमन याची कथा - पौराणिक

राजा परीक्षित जो कृष्णाचा नातू आणि अभिमन्यू चा मुलगा होता तो एकदा जंगलात फिरायला गेला असताना त्याला काळा पुरुष दिसला त्यांनी त्याला विचारले असता तो म्हणाला की मी कलियुग आहे आणि काळाच्या आज्ञेनुसार मी पृथ्वीवर दाखल झालो आहे तेव्हा परीक्षिताने आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला
धर्माचा विनाश करणाऱ्या खलीला पृथ्वीवर घेण्यापासून मी थांबवेल असे राजा परीक्षित निर्धाराने म्हणले आणि कली त्यांना अखेरीस शरण आला आणि काही सीमित जागा परीक्षेत राजाने आपल्याला द्याव्यात अशी त्याने शरणागत म्हणून प्रार्थना केली व परीक्षित राजाच्या जीवनकालापर्यंत तो स्वतःला या विशिष्ट जागांमध्ये निर्धारित करून ठेवेल असे त्यांनी सांगितले. 


शरणागत आलेल्या कलीला परीक्षेत राजाने चार जागा सांगितल्या. 
जुगार मद्यपान परस्त्रीसंग हिंसा येथे अनुक्रमे असत्य मद काम आणि निर्दयता हे चारधर्म आहेत म्हणून तू तिथेच राहा. जागा अत्यंत सीमित असल्याने कलीने अजूनही एक जागा मागितली तेव्हा परीक्षेत राजाने त्याला धनामध्ये रजगुणाचा वास असल्याने तो सोन्यातही राहू शकतो असे सांगितले. 

तर क्षणी राजाच्या मुकुटामध्ये सोने असल्याने कलियुग त्या सुवर्ण मुकुटावर बसून हसू लागले त्यादिवशी परीक्षेत शिकाऱ्याच्या शोधामध्ये भटकले परंतु त्यांना शिकार मिळाली नाही संध्याकाळी थकून भागून ते शौमिक ऋषींच्या आश्रमात पोहोचले ऋषी समाधीत असताना तहानेने व्याकुळ परीक्षित राजाने त्यांच्याकडे पाण्याची मागणी केली.

राजमुकुटात मुकुटात बसलेल्या कलियुगाच्या प्रेरणेमुळे राजाची सात्विक बुद्धी भ्रष्ट झाली आणि समाधीस्थ ऋषींनी आपल्याकडे लक्ष न दिल्यामुळे परीक्षेत राज्यात त्यांना मारून टाकावे अशी बुद्धी झाली परंतु पूर्व संस्कारांमुळे परीक्षेत राजाने स्वतःच सावरले.. 

रागावून त्यांनी एक मेलेला शाप महर्षी शोमिक यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि कलियुग हसू लागले. ऋषींचा मुलगा ऋषीशृंग अत्यंत तेजस्वी होता आणि नदीच नाम करताना त्याच्या इतर आश्रमातील मित्रांनी त्याला घटना सांगितलं. आपल्या पित्याचा अपमान झालेला सहन होऊन तात्काळ त्याच नदीतील पाणी हातात घेऊन या तेजस्वी बालकाने या राजाला शाप दिला की तो आज पासून सात दिवसानंतर तक्षक नागाच्या शापाने मृत पावेल आणि कोणीही हा शाप बदलू शकत नाही. 

ध्यानात असलेल्या ऋषींना परिस्थिती लक्षात येतात त्यांनी डोळे उघडले परीक्षित सारखा  राजा पुन्हा कुठे मिळेल या काळजीने राजा परीक्षितकडे स्वतः जाऊन याविषयी माहिती दिली.

उरलेल्या सात दिवसांमध्ये परीक्षित राजाने सर्व सुखांचा त्याग करून मनविरक्त करावे तसेच आपल्या कुटुंबीयांची सोय करावी व आपल्या गुरूंना भेटून केवळ सात दिवसांमध्ये असे काय करता येईल जेणेकरून पुण्यातमा परिक्षित राजाला ज्याप्रमाणे पृथ्वीवर मान सन्मान उत्तम स्थान मिळाले त्याचप्रमाणे परलोकामध्ये देखील उत्तम स्थान मिळेल व त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल याची त्यांनी सोय करावी असे ऋषींनी स्वतः भेटून राजाला सांगितले.

यानंतर राजाने आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार महर्षी व्यासांचे पुत्र शुक्र यांच्याकडे भागवत कथा ऐकण्यासाठी धाव घेतली. कलियुगामध्ये जेव्हा धर्माचा केवळ एकच चरण शिल्लक राहील तेव्हा भागवत पुराण ऐकल्यानेच भक्तिमार्गाने मनुष्याला मुक्ती मिळू शकेल असे त्यांच्या गुरुंनी सांगितले. यानंतर संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र त्यांनी भागवत कथेच्या रूपाने श्रवण केली केले आणि परीक्षित राजाच्या मृत्यूनंतर कलीने पृथ्वीवर आपले स्थान अधिकाधिक बळकट करण्यास सुरुवात केली.
..........
अर्थातच कलियुगाच्या आगमनाने द्वापार युगाचा अंत झाला. सत युगानंतर त्रेता युग अवतारीले जेव्हा श्रीराम रूपाने तर त्यानंतरच्या द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण रूपाने महाविष्णूंनी अवतार घेऊन पृथ्वीवरील जीवनाविषयी मानवाला महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. आपण कलियुगामध्ये जगत असून कलियुगाच्या अखेरीस मोठा महाप्रलय होऊन पुन्हा सर्व पृथ्वी आणि विश्व निर्माण केले जाईल जेणेकरून सर्व पापाचा आणि अधर्माचा नाश होऊन विष्णूचा कलकी अवतार पुन्हा एकदा धर्माची स्थापना करून सतीयुगाचा प्रारंभ करतील.
...........
ही अतिशय सुंदर कथा रामानंद सागर कृत श्रीकृष्ण या टीव्ही सिरीज मध्ये सुरुवातीला सांगण्यात आली आहे जी मला आवर्जून येथे नमूद करावी आणि सजग वाचकांना देखील उपलब्ध करून द्यावी असे वाटले म्हणून येथे लिहिली आहे अभिप्राय जरूर कळवावा. 

Our Partners Indiblogger

पृथ्वीवर कलियुगाचे आगमन याची कथा - पौराणिक

राजा परीक्षित जो कृष्णाचा नातू आणि अभिमन्यू चा मुलगा होता तो एकदा जंगलात फिरायला गेला असताना त्याला काळा पुरुष दिसला त्यांनी त्याला विचारले ...