loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Thursday, September 10, 2009

"ऑफ़ीस"........


"ऑफ़ीस"........

काय येतं आज डोळ्यांसमोर ""ऑफ़ीस" म्हणल्यावर ...!! बहुतेकांच्या चेहेर्यावर आठ्या.. त्रस्त भाव. कधी एकदा तो रविवार येतो याकडे लागलेले डोळे..

तरुण सुकन्या घड्याळाकडे बघत राहिलेल्या दोन तासांपासून २ मिनिटांपर्यंत चा वेळ मोजतात.. मोबिईल वरच्या कॅलेंडरकडे बघत कधी सिहागड तर कधी तुळशीबागेचा प्रोग्राम ठरवतात. सगळ्या आई घरी जाऊन कोणती भाजी करायची आणि सकाळसाठी कोणती निवडायची याचा विचार करतात. मुंम्बापुरीच्या ट्रेन मध्ये भाजी निवडण्यापासून  घरकामाला सुरुवात होते.. अहो - रात्री  ८ ३० नंतर घरी पोहोचून काय-काय करणार..! पुरुष लोक वेळेवर घरी पोहोचता पोहोचता सामानाची यादी चाचपडत कधी सोसायटीच्या मीटींगला कसे पोहोचणार या लगबगीत असतात; तर कधी सकाळ च्या पेपरातल्या ठळक बातम्या का होईना पण रात्री वाचाव्यात असे मनसुबे करत घरी येतात.

उच्चशिक्षित अथवा श्रीमंतांचेही या घड्याळाच्या काट्यावर नाचणे चुकत नाही ... कधी पार्लर , कधी कींटी पार्टी , कधी हि न ती मीटींग- नांहींतर साल्साचे क्लास.. मग यात "ऑफ़ीस" म्हणजे रेमंड चे ब्लेझर , फोर्माल कपडे, रात्री च्या पार्ट्या , टार्गेट अचीव करण्यासाठी तारेवरची कसरत. कोण कधी "बेंच वर" येईल सांगता येत नाही !

"ऑफ़ीस" म्हणजे रात्रंदिवस समोरचे ते ड्बडे ( संगणक) , महीना-अखेर, राजकारण , ९-१२ तासांचे काम, जेवणाच्या वाट्टेल तश्या वेळा, कॅन्टीन मधले पीझ्झा-बर्गर आणि कोकच्या बाटल्या. गलेलठ्ठ पगाराच्या गलेलठ्ठ नोकर्या !

.......... तरीही.......का हरवल ए "ऑफ़ीस" ????? ....................................

चाळीतल्या सुमी ला नोकरी लागली म्हणून तिला बस खाम्ब्यावर सोडायला जाणारी कुमी  आणि "जपून जा गो पोरी ....." सांगणारे आण्णा आणि आप्पा आज हरवलेत ! कारकुनाची नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारा जयवंत आज हरवला ए.. "ऑफ़ीस" मधला चहा देणारा गणू आज हरवला ए..

बॉसची नजर चुकवत कोपर्यावरचा कटींग चहा घ्यायला पाळणारे राघव आणि त्याची चांडाळ-चौकडी आज हरवली ए. "गुड मोर्निंग-गुड आफ्टरनून "च्या नादात " देशपांड्या,पाध्या,टकल्या आणि कुसुम ताई " आज हरवल्याएत .. मंगळागौरीच आमंत्रण देणारी लांब वेणीतली वसुधा आणि खांद्या एवढे केस भूर-भुरात चालणारी गोखल्यांच्या वाड्यातली लतिका कुठेतरी हरवली ए.. कधीही हाक मारायला सैदैव मदतीला येणारा गल्लीतला उडाणटप्पू सद्दाम कुठेतरी हरवला ए.. गणपती चे कार्यक्रम बसवायला "ऑफ़ीस" नंतर जमणारा शीर्या, मंग्या आणि त्यांचा कंपू कुठेतरी हरवला ए..

साडे दहा ते साडेपाच काम करून दमून घरी येणारा मध्यमवर्गीय माणूस कुठतरी हरवला ए .. ४ रुपयांच्या तिकीट काढून बालगंधर्वला नाटक बघणारा एक कुटुंब-वत्सल माणूस कुठेतरी हरवला ए....

१२ तास काम करून मिळणाऱ्या ५०-७५ हजारांच्या बदल्यात कचेरीतले २०० रुपये आज हरवलेत.. केवढी मोठी किंमत .. !! आख्ख  "ऑफ़ीस" च हरवला ए.. !!

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...