तू भेटशील तेंव्हा,
खूप काही बोलायचे आहे..
थोडे फार भांडण आणि,
खुपसे प्रेम करायचे आहे...
प्रत्येक विरहक्षणाचा,
तुला जाब विचारायचा आहे...
तो हरेक क्षण मला,
व्याजासकट वसूल करायचा आहे..
मनी साठवलेल्या क्षणांचा
एकेक पदर उलगडायचा आहे..
तू न केलेल्या प्रत्येक फोन ची,
तुला शिक्षा द्यायची आहे...
इतके दिवस जातात का दुर?
म्हणत मी तुला रागवणार आहे,
माझ्यशिवाय कुठेही जाऊ नयेस
अशी सॉलिड धमकी देणार आहे..
पण हे सारे...
तू भेटशील तेंव्हा... !!
सध्यातरी तुझी वाट बघणे,
हा एकच छंद जिवाला जडला आहे.........
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!