loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Saturday, March 5, 2011

सुख आणि दुखः ...


आयुष्यातला हा एक कोपरा. सुख आणि दुखः !

आज आम्ही बाग बघत होतो त्यांची . ओळखीची , अनोळखी एक न अनेक चिक्कार झाडे, रंगीबेरंगी फुले .. . प्रत्येकच रंगरूप वेगळा आणि त्यांचा स्वतःच असा वेगळेपण होतं. कित्यिक जुन्या आठवणी हरेक वासाच्या झुळूकेनिशी दडून आल्या. गप्प्पा , बडबड यांमध्ये वेळ कसा निघून गेला कळलेच नाही !
  घरी येऊन रूम मध्ये बसले ; नेहमीसारखा निवान्त पणा , वार्रयाची झुळूक , गल्लीत ली तुरळक लोकांची हालचाल ; एक ओळखीच , विश्वासाचं , आपलेपणा वाटणार असं ते वातावरण ! पण समोर नजर जाताच वाटलं ती रंगीबेरंगी फुले माझ्याकडे का नाहीत ! एक एक रंगचाता किती लोभस , हवीशी वाटणारी ! खूप विचार केला , कुठली खाते घालावीत पासून कुह्तली झाडे लावावीत इथपर्यंत ! ऋतू , हवा , पाणी , अजून काय काय करू काय नको .. विचारात अंधार कधी झाला कळेना . झोपताना उशासारखा हाच एक विचार . कुशीवर कूस बदलत होती , टीक-टीक करणारे घड्याळ हि दुडू - दुडू पुढे प्लावेसे पळत होते.
             किती वेळ लागली कि नाही लागली झोप कोणास ठाऊक ! फाटे जग आली अन पडदा सरकवला .. आह्हा !! कित्त्त्तत्ती टवटवीत हवा , पहाटेचा एक वेगळाच तजेला घेऊन ..! झोप झाली नसली तरी परत लोळत पडावेसे नी वाटले मुळीच . भला मोठा ग्रील उघडून नुस्ती उभी राहिले खरी. हातावर वार्याच्या झुळकेने किंचित हलणारा कडीपत्ता लहान मुलाने खुनावावे तसे खुणावत होता. केवढा मोठ्ठा झाला हा कडीपत्ता ! कोपऱ्यात बघितले ते जरबेरा सारखे दिसणारं एक राणी कलर च फुल तुकतुकीत उभा होतं ! म बघितलाच नाही काळ ! वास नाही म्हणून ! कि ते एकटाच दिमाखात उभा होतं म्हणून ! आणि एवढ्या सगळ्या हिरवळीत ते लालचुटुक फुल कसं राजबिंड तोरा मिरवत होत ! आणि त्या पर्यटक झाडाच्या पानांची देखील कशी नाना - विविध रंग छतांची कशी स्पर्धा चालू होती जणू ! आणि त्या हिरवागार मोगऱ्याला बाई ! किती त्या चिमुकल्या कळ्या ग त्या .. !  लपून बसल्या होत्या त्या पानांच्या हिरवळीत ; म्हणून म त्याही नाही बघितल्या !
                     कधीही पाणी न घालता तलवारी काढून उभारलेला कोरफड एकमेव . कितीही तीव्र उन्हाळ्यात तितकाच गारवा देतो डोक्याला लावला की ! उंची भर वाढलेला हाच कडीपत्ता पोहे कसे झकास फक्कड करतो ! इमारती खालून  लांब वर पहिला तरी तो लाल चुटूक लॉरेन्स सगळ्यांच्या नजरेत भरतो . एक चिमणी मोगर्याची काळी केवढा तरी सुगंध अंड शांत पणा देते !
                     सगळकाही असण्यापेक्षा आणि काहीच नसण्यापेक्षा ; माझ्याकडे खूप काही होतं . बघायचं राहून गेलं; की काळोखामुळे नजरेतून निसटत होतं कोणास ठाऊक !

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

Different stages in my life.. lets connect like minded 😊

Hi everyone...!!!  It's really after long time writing on my blog.  I have gone through a considerable phases in my life where I have al...