loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, May 27, 2011

लहानपण देगा देवा ...........

हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच  गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते. 
     गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. ! 
     तस म्हणलं तर प्रत्येकाला एकमेकांची गरज असते. कोणीतरी कोणालातरी त्रास देत असत. कोणीतरी कोणाचा तरी खांदा शोधत असतं. मग त्रास देणारेच खांदा देणारे का नाही होऊ शकत ? त्रास देणार्यांना असा वागण्यास कोण प्रवृत्त करते? यशाची अतिरिक्त हाव , सौज्ञा हरविलेले यश शोधण्याची व्यर्थ धडपड , चुरस , इगो,  पायखेची मनोवृत्ती, दडपण , एकाकी पण , व्यसनाधीनता , सारासार विचार करण्याची क्षमता हरविणे, गैर मार्गाने विचार करणे.... आणि बस ! चक्र सुरु ! 
      केवळ मनातून स्वच्ह राहिल्याने जगातील कित्येक हृद्य विकार टाळतील, माणूस  मन्सासची माणसासारखा वागल्याने तणाव, दडपण आणि कित्येक मनोविकार टाळतील. काम करणे आनंदमय होईल , एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद द्विगुण करता येईल. 
     तम वृत्तीच्या , वाम मार्गाला लागून आपण स्वतः आपल्या आयुष्याचे नुकसान करीत आहोत. कोणी वाचलच हे लिखान , पटलच यातलं काही, तर सुरुवात करावी स्वतः पासून.
    मनाशी म्हणून नका, असा वागला तर आमचा टिकाव कसा लागणार ! Define your definition of Success . कोणी वाईट वागल्यास आपण टिकाव धरू शकणार नाही असे वाटले , तर तोलावे स्वतःला आणि अपेक्षांना. बघावे समाधान . योग्य मार्गांनी मिळविलेले अमुक एक माझ्यासाठी समाधान कारक आहे ; हे जर कोणाला वाटलं तर मला नक्की कळवा. 
     असा एक प्रामाणिक रिप्लाय ; हे खरे यश असेल.
     


2 comments:

  1. हे तु लिहिलयस ?? खुपच भारी बाकीचे लिखाण पण सुंदर

    ReplyDelete
  2. @ sandeep : Yup ! kdhitri scrible krte asa kaitri ! Thanx for appreciation. You can also share your views / opinions about over here.

    ReplyDelete

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...