loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Sunday, September 30, 2012

Punyache Ganapati aani wisarjan mirawnuk 2012

        अनंत कामे असूनही आवर्जून लिहिण्यास वेळ काढावाच लागला. नैतिक जबाबदारी ! अनंत चतुर्दशी ! पुण्याचे गणपती विसर्जन ! लहानाची मोठी नारायण पेठेत झालेल्या मला या सोहोळ्याचा अद्वितीय , भारावून टाकणारा अनुभव चांगलाच माहित आहे , अनुभवात आहे.

सहा वर्षांपूर्वीचे गणपती 
         नारायण पेठेत असताना गणेश चतुर्थी ला कसबा गणपती ; जे आमच्या पुण्याचे ग्रामदैवत आणि मनाचे पहिले गणपती आहेत ; ते सकाळी आमच्या दारावरून जात. हमाल वाड्यातून बाहेर निघून कोणीतरी बसावयास जागा पकडून ठेवीत. मग मी , माझही आते-चुलत भावंड , गल्लीतले मित्र मैत्रिणी, आम्ही तेथे जाऊन बसत असू. घरचे गणपती बसल्या नंतर ! दुपारी ४ - ४: ३० पर्यंत बसून मनाचे गणपती , रांगोळ्यांच्या पायघड्या , ढोल-तश्या नची पथके बघित आम्ही घरी येत. मग बाहेरगावचे नातेवाईक मुन्जोबाच्या बोलाच्या येथून मुख्य रस्त्याला काही वेळ मिरवणूक बघित. काहीतरी चटक-मटक भेल वगरे खून ते रवाना होत. आम्ही गणपती बघण्यासाठी १० दिवस फिरत असू. गौरी असल्याने गौरींचे आगमन, जेवण , हळदीकुंकू यातच इतके मोट्ठे काहीसे वाटत असे; कि बस! आमच्यासाठी ते सारे दिवाळीपेक्षा अंड दायी , सुखावह. गौरींचे विसर्जन झाल्यान्नात्र मात्र रात्री भटकायचे ! एकदा शाळेत असताना ( हाय स्कूल मध्ये बर का ) १४ लोकांचा चमू जुळला. रात्री १ वाजता गंधर्व हॉटेल मध्ये साग्रसंगीत पंजाबी दिश घेऊन जेवण केल्याचे आठविते. एकदा माझ्या आते बहिणी बरोबर भाताक्ल्याचे आठविते. कोपर्यावर च्या गाड्यांवर १० रुपयात झकास SPDP वगरे हनली; रात्रौ १२ ३० चे सुमारास. बाबांबरोबर गणपती बघणे ; याची वर्णने करता येणार नाहीत.  हत्ती गणपती, बाबू गेनू, हिराबाग विशेष. टिळक वाद्याचा गणपती आधी होत. तेव्हाही तेथील सौस्कृतिक कार्यक्रम बघण्यास आम्ही आवर्जून जात असू. आभाळमाया जोरात चालू असताना सुकन्या कुलकर्णी , संजय मोने यांना बोलाविले होते. मजा ! पत्र्या मारुती च्या स्पर्धेत माझह धाकटा भाऊ लिंबू-चाचा मध्ये जिंकला. मात्र मागून हि बिचार्याला बक्षीस सुपूर्त करण्यात आले नाही. :)) आणि अनंत चातृर्दशीला साश्रू नयनांनी आम्ही आमच्या गणपतींचे विसर्जन करून मग नातेवैकांसह लक्षुमी रोड ला जात असू. आमचा केबल वाला , व्हीनस केबल ... त्याच्या कामेर्याचा शोध लागला कि तेथे उभे रहावयास मिळत. तेव्हा केबल २५०-३०० रुपये महिना असे. माझ्या चुलत बहिणीच्या मैत्रिणी मलाही नेत बरोबर. त्या त्या असत. मी लहान मुलगी. म्हणजे दोघेही उत्साही ! दगडूशेठ च्या रथाप्र्यंत कडे कडेने जाऊन परत यावयाचे. आणि पाहते साडेतीन वाजता दग्दुषेत आमच्या घरासमोर , लक्ष्मी रोड वर येत . केबल वर बघायचे. आणि मग समोर जाऊन दर्शन घ्यावयाचे. :)  या सार्यांमध्ये आमच्या शेजारच्या शेजारचा वाडा झकास होता. बिल्डींग झाली असली तरी तो वडाच! त्यांचा गणपती असे सोसायटीचा. सभासद चांगले सगळे. मुले- मुलीही उत्साही. त्यातली एक जन माझ्या शाळेत मला जुनियर. हाय - बाय चालत. " सगळ्यांनी आरतीला चला SSSSSSSSSSSSS " हे त्यांच्या वाड्यात रोज रात्री घुमणारे नित्याचे सूर. काय आरत्या होत ! झकास !

२०१२ चे गणपती:

आता आम्ही पेठ सोडून ६ वर्षे झाली. शांतता! श्रींचे विसर्जन येथे चार चाकीतून होते. प्रेम कमी नाही हो! " सगळ्यांनी आरतीला चला SSSSSSSSSSSSS " हे पालुपद मी स्वतः माझ्या घरात आजवर चालू ठेवले आहे. विसरल्यास आमचे बंधुराज आवर्जून सांगतात , " केतकी , जरा आवाज दे बर तुझा ! " :)) गणपती बघायला आम्ही गेलो कि या वर्षी. मैत्रिणी आणि परिवार. आवर्जून खरे नमूद करीत आहे.


१. अत्यंत बकाल माणसे , गाड्या पार्वतीच्या पुलाखालीच लाल्व्लेया. दुचाकी लावण्यास जागा नाही.
२. १५ वर्षांची मुले देखील तोल जात झिंगताना दिसली.
३. गर्दीमध्ये "देशी "वाल्यांचा भपका श्वास घेणे मुश्कील करीत होता.
४. मुद्दाम अंगावर येणे वगरे चालू होतेच.
५. ज्ञान प्रबोधिनी सोडून कोणत्याही पथकात परम्पारीक्ता दिसली नाही. ( मी सकाळचे मनाचे गणपती बघितले नाहीत. हि रात्रीची परिस्थिती)
६. मोठ्यांनी लावलेली " रिक्षावाला ' वगरे गाणी , गणपती डान्स म्हणून प्रसिद्ध असणार्या पोसेस. गुलाल उधळून लाल झालेले चेहेरे.
६. मुले-मुली यांचे ग्रुप दिसले. मात्र अत्यंत थिल्लर पणा. एकमेकांना मारणे , गळ्यात गले घालणे, गाल चोळीत बसणे.
७. ३-४ पोरींनी जेमतेम १२-१३ वर्षाच्या झोप्द्पात्तीतील मुलंना धाम्काव्लेले बघितले. उगाचच मागे लागली म्हणून. त्या मुली गेल्यानंतर ती मुले हसताना दिसली. क्षणाची गम्मत केल्यासारखी !
८. बाहेर गावाहून  प्रचंड लोक आलेले दिसले. मोठाल्या चारचाकीतून.
९. अश्लील नृत्य प्रकारात श्रींचे र्रथ दिसतही नव्हते. केवळ धक्का बुक्की.
१०. दुचाकइ चालविताना देखील मोठ्यांना आवू - त्यावू करून ओरडत जाणारी टगी मुले / माणसे होती.

माझा कयास :
१. सगळ्या न्यूज चानेल वरून पुण्याचे गणपती म्हणून खूप गोड कौतुक केलेलं गेले. मात्र सुशिक्षित , उच्च मध्यमवर्गीय , उच्चभ्रू पुणेकर यातून अलिप्त राहिले.
२. सारा रागरंग बघून आमच्या हि घरच्यांनी पुढल्या वर्षी आम्ही येणार नाही ; अशी भूमिका घेतली.
३. निवांत कणीस खात गणपती बघण्याची , भटकण्याची मजा अनुभवणे मला वाटते केवळ अशक्य.
४. लहान मुलांना सौस्कृती कळावी म्हणून लहान मुलांना आवर्जून अश्या गोष्टी दाखवीत. आम्ह्च्या बाबतीत हेच घडले. मात्र माच्या भाच्च्याना / मुलांना नेण्याची आमची हिम्मत च होणार नाही.

काही प्रांजळ , विनम्र सूचना;
१. दारू आणि सिगरेट यांना गणपतीत आणि कोणत्याही धार्मिक सणाच्या वेळी बंदी घालण्यात यावी.
२. नार्कोटिक टेस्ट करून मगच mirwnukit सामील होण्याची परवानगी द्यावी.
३. समस्त गणपती मंदाच्या अध्यक्षांनी , नाचणाऱ्या मुलांना आणि पोलिसांना फळे , एलेक्टलाईत , ग्लुकोज बिकीते द्यावीत. जेणेकरून दुपारच्या उन्हात मुले चक्कर येऊन पडणार नाहीत. रात्री देखील नाचायला ताकद राहील.
४. पायी चालणार्यांसाठी साखळ्या लाऊन मार्ग सुनिश्चित करण्यात यावा.
५. मध्ये मध्ये लाईन आणि फ्री झोन ठेवल्यास लोकांना मुख्य रस्त्यावरून बाहेर पडता येईल.
६. . बाहेर गावाहून येणार्यांनी पुण्याच्या गणपतींचा मान राखून सभ्य , शांत , सामंजस्याने आनद घ्यावा.
७. चार चाकी गाड्यांना काही विशिष्ठ रोड वर मनाई करून , पार्किंग ची सुविधा अधिक सुनियोजीय असावी.

मला हे लिहिण्याची बुद्धी गणेशाने दिली. कोणालाही दुखविण्याचा हेतू नाही. सार्यांच्याच सहभागाने बाप्पांच्या मिरवणुकीचा आनद वाढो , द्विगुणीत होवो हि सदिच्छा.

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...