loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Thursday, November 22, 2012

ताक फुंकून पिणा र्याचा किस्सा !

   मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
     काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.

मग यातल्या ताक फुन्कानार्यांची अवस्था बिकट असते. पण यात हि एखादे चांगल्या मनाचे , कोवळ्या पालवीचे , आपल्या नेहमीच्या भाषेत अतिसभ्य कोणी मिळाले तर भंबेरी उडते ! कारण इतर सर्व प्रकारच्या माणसांशी वागण्याचे सवयीचे होऊन जाते. पहिली गोष्ट विश्वास बसत नाही. आपल्या भाषेत- " झेपतच नाही ! असा कुठे असू शकत का ! " नंतर वाटते , अशा सभ्य माणसाशी आपण हि मार्दवाने वागावयास हवे. उगीच आगाऊपणा नको.
       थोडक्यात  काय , गोची होते ती ताक फुकंणा यांची !  आता खरेच , यासाठी खरा पारखी हवा. ( केवळ आडनावाचा पारखी चालणार नाही :-p  ) सभ्य सरळ माणसाला जाणीव च नसते याची. फाटाकड्यान्ची
लवंगी फुटत जातात , छोट्या मोठ्या लढाईत सुद्धा ! सार सांभाळून , सार्यांना सभालायचा प्रयत्न करतो तो बिचारा आड्कतो ! या उतार्याला शेवट नाही , हो ! सारेच केवळ अनुत्तरीत प्रश्न !

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...