loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, January 25, 2013

महाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ


     रामरक्षेचे पवित्र शब्द , सूर , ध्वनी उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत असणारी प्रभू रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता विश्वास बसत नाही की हे ही माझ्या ह्याच माधवाचे रूप !
सत्युगात एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरी ने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !
                          युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.
तत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे लोक , त्यांच्या मनाची एक नाडी तो अचूक हेरून होता. सद्वर्तनी सहवासात राहणे सोपे ; मात्र प्रचंड विद्या , शक्ती , बल , सामर्थ्य , संपत्ती असणार्या एक नव्हे अनेक पातळयांत्रि, खल प्रव्रीत्तीच्या कुळांशी , अथि-रथी-महरथिन्शि , जेष्ठ, प्रिय-अप्रीयांशी , योध्यांशी , राजाकुलांशी कोणाचेही मन दुखावता त्याला सुधार्माने वागायचे होते. कृष्ण म्हणतो , " प्रत्येकाने पुण्य कमविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून अरण्यात तपस्या करावी असे मुळीच नाही . प्रत्येकाने आपल्या धर्माचे (अर्थात कर्तव्यांचे) पालन करणे हेच त्याचे पूण्य. नियती नामक काही नसतेच. प्रत्येक जीवाचे पूर्व - जन्मींचे आणि या जन्मीचे कृत्य त्याचे आयुष्य असते. म्हणूनच आपले आयुष्य घडविणे  आपल्याच हातात असते. " महाभारतातील बहुतौश  पात्रे थोर , महान , बुद्धिवान , कर्तव्यदक्ष होती. त्यांना , त्यांच्या मानवी-स्व्भाव्जान्य भावनांना योग्य ती दिशा देण्याचे काम फक्त कृष्णाचे. साऱ्यांत राहूनही सार्यातून वेगळा राहण्याचे कौशल्य त्या ईश्वरी अवताराचे.

              महाभारत ज्याला कळले, समजले , उमगले तो महानच. कित्येक सहस्त्र युगांच्या पाश्च्यात देखील या व्यक्तिरेखा आपल्या मनावर अधिराज्य गाजवितात यातच त्यांचे सामर्थ्य ओळखावे! मग अगदी खल प्रव्रीत्तीच्या व्यक्तीरेखांपर्यंतधर्माचे पालन करून अशा विष प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी क्षण-प्रसंगी त्या भगवंतालाही काही अप्रिय भूमिकेतून जावे लागले असेल. मनुष्य म्हणून सारी सुख-दुखे , पाप-पुण्ये त्या ईश्वरालाही होती. मात्र एका अवतारात एवढ्या मोह, माया, सू , तिरस्काराच्या गुंत्यातून अलिप्त राहून, सारे हिशोब nullify करून त्या महाविष्णूंनी आपले आसन पुन्हा ग्रहण केले यात सारी दिव्यता !!
आपण सर्व सामान्य मनुष्य म्हणून देखील आपल्या पाप-पुण्याचा हिशेब चुकवीत आजही या जन्म-मृत्युच्या वेढ्यात फिरत आहोत !
आयुष्यात कधीही, काहीही आडले ; विचारांच्या पलीकडचे घडले ; फार चांगले किवा फार वाईट घडले की महाभारत , भागवत गीता जरूर वाचावे. त्या प्रत्येक घटना , व्यक्तिरेखा ते सारे सार उलगडवून दाखवीत आहेत. ते समजता येईल इतके स्वतःला पात्र बनविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे निदान या जन्मात तरी आपण चुकणार नाही एवढे नक्की .. !

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

हाय - टी : पक्के ब्रिटिश !!!

BRITISH - Hi Tea हाय टी " हाय टी " म्हणजे नक्की आहे तरी काय ? चहा च्या वेळेस हाय करायला लोकांनी जमणे ? की ...

Listed on: link directory