loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Wednesday, February 12, 2014

खड्डा

 खड्डा

प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा हा अतीव महत्वाचा  असतो.
खड्डा ह्या गोष्टीचा नेमका अर्थ जे पुणेरी लोक याचा चपखल वापर करतात त्यांनाच माहित असून बाकीच्यांना याचा सुगावा देखील लागत नाही ; या गोष्टीचा भयंकरच फायदा होतो. तणाव - नियमन , Anger - Control & Stress Management वगरेंच्या कार्यशाळेत जाण्याची गरज पडत नाही. राग आल्यास मोठ्याने हसणे वगरे तत्सम गोष्टींची चित्रपटात बघून सवय करून घ्यावी लागत नाही. आयुष्यात अनेक अमुलाग्र बदल घडविण्यासाठी " खड्डा " अतिशय महत्वाचा ठरतो. आजच्या जगात वय वाढण्याच्या लक्षणांमध्ये केस पांढरे होणे , सुरकुत्या पडणे इत्यदि बरोबरच मनापासून निखळ हसण्याचे प्रमाण कमी होणे हा देखील निकष महत्वाचा ठरत आहे. तरी या अनुशंघाने विचार केल्यास मनापासून खळखळून आणि उफाळून -उफाळून हसवण्यासाठी कारणीभूत ठरणारा हा शब्द " खड्डा" - हा चिरतारुण्याचे रहस्य
म्हणण्यास हरकत नाही. ( ज्या व्यक्ती ह्या " खड्डा" शब्दाचा मार्मिक अर्थ जाणतात ; त्या हे वाचताना देखील पोट धरून हसत असतील : D  )

लहानपणी मी मराठी गोष्टींच्या कसेट ऐकत असे. त्यातील " राजाचे कान सुपाएवढे " ही अत्यंत , माझी आवडती कथा केवळ आणि केवळ " खड्डा " याच घटकामुळे घडली. तरी " ओकण्यासाठी " हा घटक आपले महत्वाचे स्थान सिध्द करून आहेच  !

" खड्डा " या राजनैतिक विषयाचा बाऊ न करता यांमुळेच अनेक प्रेमकथा जन्मास येतात , माणसांमधील माणूसकी नामक गूण जागृत होतो. अशा अनेक तर्हेने "खड्डा" सार्यांच्याच आयुष्यात महत्वाची भूमिका वठवतो . याचा फायदा घेण्यासाठी आणि या उतार्यावर खळखळून हसण्यासाठी कृपया  " खड्डा " या शब्दाचा सार्वजनिक वापर सुरु करणे.

- इति.

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

Different stages in my life.. lets connect like minded 😊

Hi everyone...!!!  It's really after long time writing on my blog.  I have gone through a considerable phases in my life where I have al...