जाण ठेवणे , सदैव शिकण्याची तयारी ठेवणे , समजून घेणे , दुसर्यासाठी म्हणून काही गोष्टी करणे , सद्विचार -सद्वर्तन -विवेक हरवून बसणारी माणसे फार मोठ्या मानसशास्त्रीय प्रश्नांना जन्म देत आहेत. अत्यंत स्वार्थीपणा , आपले ते खरे , न बोलून शहाणे अशा हेकेखोर प्रवृत्तींमुळे सुसौवाद , विश्वास , सोज्वळ -सुंदर -निरागसपणा या सार्यांच्या बळी जात आहे. " सब घोडे बारा टक्के " हे अनुभव खरेपणाने वागणाऱ्या मुठभर सरळ लोकांना वेडे ठरवीत आहे. प्रांजळपणे बोलताना कोणी दिसले तर मृगजळ म्हणून विशेष सावध रहावे हेच खरे ! रस्त्यावरून जाताना बघून न बघितल्यासारखे करणे आणि क्वचित घरी आल्यास थेट स्वयंपाक घरात शिरणे ( प्रत्यक्ष रित्या देखील आणि बातमीदार असल्याचा समज करून मारलेल्या गप्पांनी देखील ! ) या वागण्याला काय म्हणावे ? descent professional वागणे म्हणजे औपचारिक असले तरी ते उत्तम असते. आणि खरोखर असेल मनाची जाण तर आप्त स्वकीय वागणे हे स्तुत्य ! मात्र माणूस विक्षिप्त वागण्याचे निवडीत आहे , हे नोंद करण्यासारखे .
सौवाद साधण्याची जितकी म्हणून साधने माणसाने शोधून काढली तितके माणसे माणसापासून लांब गेली . सुधारले ते फक्त दळण-वळण ! मला माणसांच्या स्वभाव धर्माचा अभ्यास करण्याचा छद आहे. पुस्तकात गढून जाऊन नव नवी विश्व बघण्यात आणि जगण्यात हरवून जाण्याचा छद आहे.
सुरेख व्यक्तिरेखा अनुभवण्याचा छद आहे. मग तो जेम्स बॉंड असो वा शेरलॉक होम्स! चौघीजणी मधली एमी - ज्यो असोत वा विजय देवधरांच्या पुस्तकातील आफ्रिकन जुजु चा बुद्धीला न पटणारा अनुभव घेणारे कोणी ब्रिटीश अधिकारी असो ! वास्तविक आयुष्यात अनेक व्यक्तिरेखा बघितल्या , अभ्यासल्या . कलियुगात जगण्यासाठी योग्य असे अनेक लोक उत्तम उत्तम फंडे घेऊन जगत असतात. सार्यान्क्डून काहीना काही घ्यावेसे नक्कीच असते.
खोच म्हणाल तर बर्याच खोचा आढळतात. गमतीची गोष्ट आहे पण सारे मोठे ; मोठे झालेलेच नसतात ! म्हणाल तर गंमत आणि म्हणाल तर ही गंभीर गोष्ट. अनेक युवा चेहरे आपण मोठे आहोत म्हणून जे काही वागतात त्याला एक उपमा - छोट्या मुलीने साडी नेसून आईची नक्कल करावी तसे ! बाकी सार्यांना कळत असते आणि कित्ती गोड म्हणून ते कौतुकाने ठकीचे कौतुक करीत असतात :p याचा दुष्परिणाम खरेतर फारच बेकार होतो. मला सारे समजते म्हणून सुधारणेच्या शक्यता पुसल्या जातात. नम्रता , आज्ञाधारक पणा , वडीलधार्यांना द्यायचा मान हे सारे लहानग्याच्या निरागसतेने नव्हे तर मोठ्यांच्या त्रासिक नजरेने होऊ लागते . आजूबाजूला भेटणारी आणि आपल्या संपर्कात येणारी माणसे भुइसुरुङ्ग लावल्यासारखे एखाद्याच्या मनाला " Boooooooom " करून टाकतात. म्हणूनच रामदासांनी म्हणले आहे - " बहुसंग धरू नये । संतसंग सोडू नये " . या उक्तीचे सदैव ध्यान ठेवावे. तत्सम सोशल होताना माणूस स्वत्व हरवून बसला आहे , ह्यावर मी आधी लिहिले आहेच एका पोस्ट मध्ये !
एकंदरीत माझ्या अभ्यासाला अजून अनंत उदा मिळतील. मात्र एकंदर चित्र फारसे समाधानकारक नाही हेच खरे.
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!