loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, February 6, 2017

Donald Trump! : ट्रम्प आजोबा नक्की करताएत तरी काय ?

Donald Trump & India

Donald trump news, Donald trump wife, muslim ban in america

डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी २०१७ ला अमेरिकेचे सर्वोच्च नागरिक म्हणून शपथ घेतली आणि लाडक्या ओबामांना अमेरिकन जनतेने अश्रुपूर्ण निरोप दिला. "४ यर्स मोअर" अशा पाट्या ही अनेकठिकाणी झळकताना दिसल्या.  माझा याच्याशी सम्बंद्ध आला जेव्हा गडगडता शेअर बाजार मी अभ्यासला ! ट्रम्प च्या रक्तातच बिझनेस असताना सारीकडे वास्तविक पाहता अधिक चांगले वातावरण हवे ! ओबामा आणि मोदी यांची मैत्री जगभर गाजली . ओबामा भारतात अनेकदा पाहुणचार घेऊन गेले . मोदींच्या ९ दिवसांच्या नवरात्रीच्या कडक उपासात मोदींना डिनर टेबल वर लेमन वॉटर दिले गेले . यामुळे खरतर ओबामा माणूस म्हणून दिलखुलास आदमी है ! हे प्रत्येक भारतीयाच्या मनात ठसले . मग गुडबाय ओबामा म्हणताना भारतीयांचे ही मन "४ यर्स मोअर" म्हणून गेले. मग माझा याच्याशी जास्त सम्बन्ध आला !

ट्रम्प आजोबा आणि टिपिकल अमेरिकन पुरुष :


ट्रम्प आजोबांचे हेअरकट आणि टिपिकल अमेरिकन पुरुषाचा लूक माझ्या आवडत्या " स्मॉल वन्डर्स " सिरीयल मधल्या " टेड " या टिपिकल अमेरिकी रोबोट इंजिनियर ची आठवण करून गेला. १९८० च्या गाजलेल्या अमेरिकन सिटकॉम पैकी ही सिरीज सोनी आणि स्टार प्लस  या चॅनेल च्या भारतातील विस्तारत्या धोरणामुळे १९९६-९७ च्या सुमारास ( जेव्हा मी हायस्कुल कीड होते ) मला खूप छान एन्जॉय करता आली . ट्रम्प आणि टेडी रियल लाईफ मध्ये कदाचित एकाच वयाचे असावेत. मला वाटते , पुराणमतवादी अमेरिकन विचारांचा पगडा तर नसेल ट्रम्प आजोबांवर ! " अमेरिका प्रथम " म्हणताना त्यांची सध्याची ३री पत्नी मेलॅनिया जन्माने अमेरिकन नाही हे विसरलेत वाटतं ! ज्या वयात पार्किन्सन्स आणि अल्झायमर ची औषधं घेत लोकं दिवस कंठतात , त्या वयात ट्रम्प आजोबांची शारीरिक , मानसिक आरोग्य संम्पदा वाखाणण्याजोगी आहे , हे निश्चित ! (त्यामुळे हा विसर पडला असेल तर हरकत नाही !)


ट्रम्प आजोबा आणि मुस्लिम , ज्यू , भारतीय :


ट्रम्प आजोबा मुस्लिम , ज्यू आणि भारतीयांपासून अमेरिका मुक्त करा असे घणाघाती वाक्य हॉस्टन मध्ये टाकत इंडिया मध्ये लोकांना हादरवून सोडतायत !कालच्या इकॉनॉमिक टाइम्स च्या ब्लॉग वरच हे वाचून नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न पडतो . डोनाल्ड आजोबा राजकारणात सक्रिय नव्हते , पण सिव्हिल लाईन , हॉटेल लाईन इत्यादी क्षेत्रातले त्यांचे भरीव काम बघता राजकारणी लोकांशी , राजकारणी डोक्यांशी त्यांचा फार जवळून सम्बंध आला असणार हे कोणालाही लक्षात येईल ! अनेकदा सिस्टीम मध्ये राहून काम करणाऱ्यांपेक्षा सिस्टीम च्या बाहेर राहून सम्पूर्ण सिस्टीम ओळखणाऱ्यांना छक्के -पंजे जास्त चांगले समजतात !

ट्रम्प आजोबा : " अमेरिका प्रथम " !!!!!


टेरारीसम विरुद्ध युद्ध समजण्यासारखे आहे . मात्र टुरिस्ट पासून , हुशार डोक्यांना देशाबाहेर करणे अमेरिकेसाठी देखील खतरेकी घंटी ठरू शकते ! जग जवळ आले आहे . जगातील हालचालींचा साऱ्या देशातील नागरिकांवर डायरेकट - इन्डायरेकट परिणाम होत असतो . " सब के दिन आते है , भैया ! " ९/११ नंतर आपल्याही धरणीवर अतिरेकी हल्ला होऊ शकतो याची प्रथमतः अमेरिकन लोकांना जाणीव झाली . एकाधिकारशाही पेक्षा डिप्लोमॅटिक वागणुकीकडे अमेरिकी राजकारण झुकले . ट्रम्प आजोबांच्या वेड्या वागण्यामुळे साऱ्या जगापासून अमेरिकेला वेगळे तर व्हावे लागणार नाही ना ! सत्ता साऱ्यांना झुकवावयास लावते ; परंतु लाखो भारतीयांचे ब्रिलियंट माईंड अमेरिकेतून वेगळे काढले तर अमेरिकी जगतावर निश्चितच जाणवण्याइतका परिणाम होईल ! आपल्याकडे म्हणतात " अति सर्वत्र वर्जयेत ! " हे ध्यानी ठेऊन अमेरिका प्रथम साठी प्रयत्न असतील तर निश्चितच स्तुत्य असतील . मात्र रंगभेद , राष्ट्रभेद वापरून वरच्याला खाली खेचून असे केले तर एकंदरीतच गुणवत्तेच्या दर्जावर परिणाम होईल .

भारतीयांनी घाबरण्याचे काही कारण आहे असे मला वैयक्तिक रित्या तरी वाटत नाही ! आपले नाणे खणखणीत असताना आपल्याला भीती कशाची ! अनेक देशांमध्ये फिरलात तर तुम्हाला तेथे एकतरी भारतीय नक्की मिळेल!

सो , मुद्दा अनुत्तरीतच !
ट्रम्प आजोबा नक्की करताएत तरी काय ?
बिझनेस ? पुरोगामी विचारात जखडलेला शेकडो वर्षांपूर्वीच्या मानसिकतेचा संकुचित देश ? राजकारण ?

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...