एकदा येन - तेन निमित्त्यानं महिला मंडळाच्या गप्पा कानावर पडल्या.
मजेशीर आणि माझ्यातल अभ्यासू कुतूहल जाग्या करणाऱ्या ! गूण आला नाही म्हणून डॉकटर बदलणाऱ्या
; पण गुरुजी आणि ज्योतिषांच्या नियमित वाऱ्या करणाऱ्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या लोकांचे
प्रतिनिधित्व करणाऱ्या ! भारी ए नाही !
विषय गंभीर आहे. प्रत्येक
कॉमन मॅन ला वाटते, आपला कस सुरळीत व्हावं. शिक्षण , नोकरी , पैसे , घर , लग्न , पोरं
इति. मग मनासारखे काहीही घडत नाही , अडथळे येतात किंवा विलंब होतो तेव्हा समस्या निर्मिती
होते. थोडक्यात काय , मनासारखे न घडणे म्हणजे समस्या ! इथे सारेच काही कागदावरच्या
रेषेसारखे सरळ नसते , आपलं आणि इतरांचे आयुष्य वेगळे असू शकते हे मान्य करण्याचीच मनाची
तयारी नसते ! मग होते ते “दुःख” ! एखाद्या समस्येवर मार्ग काढणे हे मग सुचतच नाही
! कारण , डायरेकट किंवा इन्डायरेकट तुम्ही सफर होत असता. साधे उदाहरण , शारीरिक क्षमता
कमी झाल्याने साध्या सर्दी -खोकला -तापातही नेहमी इतके १००% जोमाने तुम्ही काम करू
शकत नाही. काही माणसे काम करणारच नाहीत , काही उशिराने सुरु करतील , काही रेटून नेतील
" कुछ नही होता " म्हणून ! तरी , एखाद्या समस्येला / प्रसंगाला तुम्ही कशा
पद्धतीने बघता , कशा पद्धतीने हाताळता या गोष्टी अनेक मुद्दांवर अवलंबून असतात. कोणत्याही
समस्येत तुम्ही असाल तरी ह्याचे “मॉडेल” असेच असते. शारीरिक , बौद्धिक , मानसिक , भावनिक , सामाजिक , आर्थिक मुद्दे इथे
महत्वाचे ठरतात. तुमचे मूळचे व्यक्तिमत्व आणि
स्वभाव तर यात अत्यंत महत्वाचा ! मग विशिष्ट परिस्थिती मध्ये तुम्ही कसे वागता , हे
तुमच्यासाठी योग्य असते. परंतु साऱ्यांनाच हे योग्य वाटत नाही. कारण , त्यांची विचारसरणी
आधी नमूद केलेल्या मुद्द्यांना धरून त्यांच्यासाठी योग्य अशी असते .
सेविंग्ज मध्ये १२
लाख असणारा माणूस घेईल ती आर्थिक रिस्क २ लाख सेविंग्ज वाला घेऊ शकणार नाही. डिहायड्रेशन
जास्त होतंय हे वेळीच लक्षात येऊन डॉकटर दाम्पत्य घरीच एक बाटली सलाईन आणि औषधे घेऊन, २ तासात टुणटुणीत होऊन संध्याकाळी ओपीडी ला बसेल
(माझ्या डॉकटर आत्या - काकांकडे हे बघून मला हे "used to" झालंय !!! ) पण
म्हणून मेडिकल बॅकग्राउंड नसलेल्या माणसाने वरून पाणी पिऊन अंगावर काढले तर हे जीवावरच
बेतणार ! तर , समस्या कोणत्याही असोत - " मॉडेल " हे आणि असच असत.
साहजिक आहे, अनेकदा
मन खिन्न होते , उदास - निराश होते. कधी मनात गोंधळ होतो , कधी भांजाळून जायला होते
, कधी द्विधा होते ! आपण स्वतः सफर होत असल्याने तटस्थपणे समस्येकडे बघून मार्ग काढण्यापेक्षा
होणाऱ्या वेदनांमुळे माणूस ओरडत सुटतो. मग कोणाचा तरी सल्ला लागतो. रास्त आहे ! मात्र
, चूक होते जेव्हा ह्या सल्ल्यावर आपण अवलंबून होतो ! तुमच्यातले " ऍडव्हाइस सीकिंग
" वागणे जोमाने वाढू लागते. विशेषकरून ज्योतिषी / आध्यात्मिक सल्ले याबाबतीत विशेष
व्यसनाधीन ठरतात ! (लोक म्हणतील , तुम्ही स्वतः ज्योतिषाचे लेख लिहिता आणि तुम्ही असे
विधान करणे म्हणजे ... ! किंबहुना, म्हणूनच मी हे विधान अधिक नेमकेपणाने करू शकते
!)
ज्योतिष हे एक शास्त्र
आहे , थोतांड नव्हे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा गैरवापर आपल्याला दिसतो जगात ; याचेही
काहीसे तसेच. मानसिक शक्ती , योग सामर्थ्य पाश्च्यात्य देशांत देखील मान्य झाले. ते
म्हणू लागले , हे आमचेच " ओरिजनल " आहे ! (वावा !!!) पण साधी गोष्ट आहे-
हजारो वर्षे तप करून भविष्य वर्तविणाऱ्या पूर्वीच्या ऋषींचे सामर्थ्य कुठे , आणि आपण
कलियुगातली मटेरिअलिस्टिक जगात वावरणारी माणसें कुठे ! ज्योतिष हे सागरासारखे खोल आहे , अथांग आहे ; ज्याचा
तळ गवसणे सहजासहजी शक्य नाही ! मग ? देवानी दिलेल्या बुद्धीचा त्याच्याशी मिलाफ होऊ
द्या कि ! गोड खिरीत ते वेलची वगरे बायका का
घालतात ? अधिक परफेक्शन यावं म्हणूनच ना ? मग तुमच्या बुद्धीचा खजिना " लॉक
" करून का ठेवायचा ?आणि आपले भाकीत प्रत्येक वेळेस खरे ठरलेच पाहिजे असे थोडीच
! चूक अभ्यासात असेल , तुमच्या पत्रिकेत असेल !
टोकाची भूमिका प्रत्येक
वेळी गाठणे हा एक साधा नेहमी आढळणारा " पर्सनॅलिटी डिसऑर्डर " चा भाग आहे
! ‘तो माणूस चांगला असेल, ज्योतिष चांगले आहे , त्याचे भाकीत हजार माणसांच्या बाबतीत
खरे ठरले - किती छान ! किती लोकांना मदत झाली , हसू मिळाले ! पण मला नाही गूण आला.
म्हणून मी सदरहू गोष्टी करीत नाही ,’ असे विधान करण्यास आपण घाबरतो काय ! इथली मेख
आवर्जून सांगावीशी वाटते. धार्मिक वातावरण , सौस्कृतीनुसार नतमस्तक होणे , श्रद्धा मनात ठेवणे या गोष्टींमुळे इथे वेगळेच वळण
लागते. भरलेल्या वातावरणात मन शांत होते. इथे मला उत्तर मिळणार , माझे काम होणार याच
स्टेजला आपण पोहोचतो ! काम फत्ते ! खचलेला माणूस कान , डोळे , तोंड उघडून सकारत्मक
देहबोलीने आणि आत्मविश्वासाने पुढे चालतो. आपले मत चांगल्या पद्धतीने पटवून देतो ,
कॉन्ट्रॅक्ट मिळवतो आणि आर्थिक संकटातून सोडवतो ! स्वतः स्वतःला ! म्हणजे क्रेडिट नाही
का द्यायचे अध्यात्माला ? का नाही द्यायचे ? द्या की ! २०००% !!
६ महिन्यांनी होणाऱ्या
कामासाठी खचून न जाता , हसतमुखाने माणूस प्रयत्न करतो. किरकिर बंद होते , घरचे वातावरण
सुधारते , ६ महिने आनंदात जातात. मात्र अशी आशाच ज्याला मिळत नाही तो ह्या ६ महिन्यांच्या
काळात खचून गलितगात्र होईल. त्याचे आणि त्याच्या घरच्यांचे जगणे चिडचिड , रडरड , वैताग
याशिवाय वेगळे उरणारच नाही !
म्हणूनच संगितले आहे
- " केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे " , " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " आपण समजतो त्यापेक्षा
याची यश मिळवून देण्याची “पद्धत” वेगळी आहे !
इथे मात्र मी माझ्या
एका डॉकटर स्नेही दाम्पत्याला प्रश्न विचारला. ते खूप वर्षे सल्ला घेण्यास एकांकडे
जातात. त्यांना म्हणले , " मला तुमची एखादी सक्सेस स्टोरी सांगा की ! त्यांनी
सांगितले , तुम्ही केले आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हड ! :) " त्या म्हणल्या ,
“ असे खरतर नाही. नवरा विचारतो , ते होईल - होईल म्हणून सांगतात. ते सांगतात ते सारेच
काही आपल्याला व्यावहारिक दृष्टीने करवयास जमत नाही .” मनात म्हणले , " च्या मारी ! सेल्फ -ब्लेमिंग
(स्वतःला दोष देणे) व्यक्तिमत्व मुद्दा इथे पण आला की !!! काम झाले नाही , तर सेल्फ ब्लेमिंग , स्वतःला
अधिकतासवून वॉरौवर उपाय करणे चालूच. इथे आपण सदर सल्ला देणारी व्यक्ती बदलत नाही .
( पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे गूण आला नाही तर डॉकटर बदलतो :) ) काम झाले तर सारे काही त्यांच्यामुळे ! त्यांना
क्रेडिट देताना , स्वतः स्वतःला चांगले म्हणवून का घेत नाही ! तुमच्यातला आत्मविश्वास
जागा होण्याऐवजी काम झाले किंवा नाही तरी तुम्ही सदरहू व्यक्तीच्या सल्ल्याना आधीन
होता ! अशा दिव्य शक्ती आहेत , मान्य ! पण मग त्यांच्या मदतीशिवाय आपण आपले प्रॉब्लेम
सॉल्व्ह करूच शकत नाही असे आहे का !
आपले आपल्याला जमत
नाही. मान्य ! कोणी जर निरपेक्ष सकारात्मकता देत असेल , तुमचे शुभचिंतन करीत असेल तर
तुमचे अहोभाग्यच ! हे ठिकाण देऊळ असेल, सायकॅट्रिस्ट असेल, मित्र असेल किंवा ज्योतिषी
! पण अवलंबून राहून अमुक शिवाय तुमचे सारे ठप्प होत असेल , तर स्वतः स्वतःवर मेहनत
घ्यायला काय अवघड आहे ? सुरुवात करायला काय हरकत आहे !
थोडक्यात- तीच ईच्छा
मनात सतत बिंबविणे , अखंड त्या विचाराने प्रेरित होणे , कुठून त्यावर कसा मार्ग काढता
येईल बघणे हे आपले आपल्याला जमले तर ? यासाठी मन शान्त रहावे म्हणून देऊळांत बसावे
शांतपणे , योगा करावे ! नियमित परमेश्वराला नमस्कार करावा. “मी करतोय , मला योग्य मार्ग
दाखव , माझ्याबरोबर अखंड रहा “ म्हणावे ! साधे , सोपे नाही का हे ? कि अवडम्बर माजविल्याशिवाय
आपल्याला हुश्श वाटत नाही , अशी आपली मानसिकता झालीये ?
जग बदलणं कठीण आहे
, अशक्य नसेल. पण स्वतःला बदलणं अशक्य हि नाही आणि कठीणही !
श्रीकृष्णाने भगवत
गीता सांगितली. अर्जुन प्रश्न विचारत होता. कृष्ण म्हणतो - " करायचे की नाही तू
ठरव. कृष्ण त्याला कर म्हणूनही सांगत नाही आणि करू नकोस म्हणून देखील सांगत नाही. कर्म
तुझे. जिंकलास तर तुझ्यामुळे , हरलास तर तुझ्याचमुळे ! " कोणाची काठी करून पंगू
होऊन का चालावयाचे ! हे तर क्रेडिट कार्ड वर शॉपिंग करणे झाले , क्रेडिट सम्पले की
शॉपिंग बंद ! मग आपण आपला बॅलन्स उभा करूया की ! सकारात्मकतेचा , एकसेप्ट करण्याचा
!
सल्ला देणारा माणूस
प्रसंग आपल्या बौद्धिक , सामाजिक , मानसिक वगरे एकूण क्षमतेनुसार ताडतो. मग गृहिणी
ज्योतिषाला ज्या गोष्टी भयंकर वाटतील, त्याच गोष्टी IT मध्ये काम करणाऱ्या ज्योतिषी
काकांना ठीक -ठीक वाटतील.
तुमचे काम उशिरा झाले
यात सल्ला देणाऱ्याचा दोष बहुदा नसतोच. तुम्ही स्वतःहून त्याच्याकडे गेलेले असता. त्याला
हवे तसे तो वागतो. मात्र श्रद्धा(?), खचून पुन्हा पुन्हा तसेच वर्तन, दीर्घकाळ हातपाय
मारताना येणारा शारीरिक- मानसिक थकवा म्हणजे " बॉयलिंग फ्रॉग सिंड्रोम ."
तप्त वातावरणातून वेळीच बाहेर पडण्याऐवजी आपण हात -पाय मारत ऍड्जस्ट (डोंबलाचं ! )
करायचा प्रयत्न करीत सारी ताकद घालवतो. सरतेशवेटी उकळी येताना आपल्याला ते सम्पूर्ण
अशक्य होते. खेळ खलास ! :)
तरी , वेळीच जागेव्हा."
हो मी चुकले, सो व्हॉट ! " म्हणा. चूक
मान्य करा , शिका त्यातून आणि पुढे जा. लाज नको , अहं नको. “नाही जमत माझ्याच्याने”
हे कोणाला न दुखवता , कोणाचे नुकसान न होऊ देता सांगा. पुढच्या गोष्टी टळतील, तुमच्या
मर्यादा मान्य करून तुमच्यातल्या "अहं" वर विजय मिळवाल !
दुसर्याने ‘आपल्याला’
योग्य वाटेल असे वागावे , ही अपेक्षा सोडा. आपणही स्वतःच्या अपेक्षांना अनेकदा खरे
उतरत नाही ! कोणीतरी तुमचं ऐकावं वाटत असेल तर तुम्ही पण कोणाचं तरी ऐकायला शिका.
(सल्ला देणे घेणे नव्हे ! नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! कोणालातरी तुमच्याशी
बोलून हलके वाटेल एवढे जमले तरी उत्तम ! ) स्वतःकडून , इतरांकडून अनेकदा अति -चांगल्या
अपेक्षा असतात , त्या न ठेवता बिनधास्त जगा
!
देवाने सप्तरंगी इंद्रधनुष्य
केले , म्हणून आपल्याला आवडते. सारे काही तुमच्याच रंगात रंगविण्याचा प्रयत्न केलात
तर सारे बोर होऊन जाईल ! इंद्रधनुष्यातला प्रत्येक रंग कोणाला आवडलाच पाहिजे असे नाही
! पण त्या एका रंगाशिवाय देखील इंद्रधनुष्याचे सौंदर्य खुजे होते ! आयुष्याचे ही असेच
असते ! मला वाटते , आयुष्याकडे सिनेमा म्हणून बघितले तर अनेकदा मजा येते !
योगा , आध्यात्म आणि
सौसारिक जीवन याचा मेळ घालायला हवा ना ! "बाहेरचे आत जाऊ न देणे " इतका सोपा
मतितार्थ आहे याचा ! साऱ्यांना संन्यास नाही
घेता येणार ! आयुष्य पण भारी देखणे आहे हो ..... ! :) जरा त्याच्यावरही प्रेम करा की
! का सतत वैताग , वीट , टेंशन , रडू ? माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासातून मला इतके कळले
की प्रॉब्लेम प्रत्येकाला असतो. शिक्षण , मुले , आर्थिक , शारीरिक इत्यादी . त्याचे
हे स्वरूप प्रत्येकाचे वेगळे असते इतकेच! लोकांचे प्रॉब्लेम्स बघितल्यावर समजते कि
" बापरे ! माझ्या कटकटी काहीच नाहीत ! भगवन्ताने किती काही दिले मला ! त्याकडे
माझे लक्षच नव्हते !” कडाकडा भांडणार्या नवरा
बायकोंना समस्या असतात, पण त्याच बाईला अशी बाई दाखवली जिचा नवरा सतत फिरतीवर , बोलायला
सुद्धा मिळत नाही तर भांडणाने वैतागलेली बाई म्हणेल , " अगो बाई ! आमचं आहे ते
बरंय ! ओकून तरी टाकता येतं ! मनात ठेऊन जगणं किती अवघड आहे ! "
तर .....
सुख आणि दुःख , चांगले
आणि वाईट या सापेक्ष आणि आनंदी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाच्या कल्पना आहेत ! आपण ह्या
कशा हाताळतो यावर तुमचे सुख आणि हसू अवलंबून आहे ! मला वाटते , साऱ्यावर प्रेमाने मार्ग
हमखास निघतो ! स्वतःपासून सुरुवात केली तर ?
"
Decide This Minute to Never Again Beg Anyone
For
Love, Respect & Attention That You Should Be Showing Yourself! "
माझ्या ह्या लेखात
म्हणले तर शब्द आहेत , म्हणले तर आनंद ! घेता आला योग्य अर्थ , तर लेख वाचताक्षणी अनेक
जण होतील चिंतामुक्त ! डायरेकट आनंदी , ज्यांना काहीच " प्रॉब्लेम " नाहीए
,इतके आनंदी :) साऱ्यांना "हैप्पी लिव्हिंग , कीप स्मायलींग "
!
- डॉ. केतकी स. इतराज,
पुणे । +९१ ९९७० ९६६ ३०४
www.greenaapples.com | Holistic e-Rx Clinic
(Published in : Kanheri 2016 : Diwali Issue)
Hii, मस्त लेख आहे विचार खुप सूंदर आहेत. Content उत्तम आहे लेखाचा.
ReplyDeleteलेखनी हातात घेवून एक बैठकीत लेख लिहला आहत आपण. माझी छोटिशी सूचना आहे. थोडासा तुकड्या तुकड्यात लिहाल्या सारख जाणवत कही ठिकाणी. एडिट ( मराठी शब्द सूचत नाही) करून लिहल्यास अजुन उत्तम होईल.
धन्यवाद