loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Thursday, September 15, 2016

मी , मराठी आणि इंग्लिश

मी पुण्याची आहे. पुणे हे सौस्कृतीचे माहेरघर म्हणले जाते. अर्थातच आमच्या पुण्याचे वागणे -बोलणे सर्वश्रूत आहेच !
अनेकदा लोकं विचारतात , माझ्या भाषेविषयी ! "तू टिप्पीकल पेठी बोलतेस , बोल ना "....  असेही सांगणारे भेटतात. आणि "अक्सेंट छान मारतेस😍 " असे सांगणारे पण आहेत. लोकहो ...  ह्या साऱ्याचे श्रेय माझ्या "bringing -up" ला आहे. नारायण पेठेतील जन्म , तिथले बालपण, मराठमोळे ब्राह्मणी वातावरण अशा अनेक गोष्टी माझ्या उपजतच ठसकेबाज बोलण्याला मिळाल्या.

इंग्लिश विषयक किस्सा मस्तच आहे ! शाळेत असताना एकदा रस्त्यावर एका माणसाला सुनावले ... बारकी पोरगी म्हणून आगाऊपणा करून अंगावर सायकल घातली माझ्या ! मग , आईला धक्का बसला ! ही इतकं फाडफाड इंग्लिश कशी बोलते ! :)

मला खूप संताप आला की मी आपोआप इंग्लिश मधून सुनावते, हा अनूभव १-२ लोकांनाच असल्याने आवर्जून नमूद करत आहे ! :)) इतक्या टोकांपर्यंत मी कधी चिडत नाही :))

तरी , टिपिकल पुणेरी शोभेल अशीच माझी प्रोफाइल आहे.  अत्यंत हुशार  मेडिकल प्रॅक्टिशनर , स्पीकर , लेखिका म्हणून मी कार्यरत आहे. अस्खलित मराठी चे बाळकडू च आम्हाला मिळालेले आहे. तरी देवकृपेने मराठी लेखिका म्हणून गेली ८ वर्षे अनेक नियतकालिके , मासिकांमधून हेल्थ , ज्योतिष , आध्यत्म विषयक लिहिता आले ; त्याला वाचकांचा व संपादकांचा उत्तम प्रतिसाद आहे !
इंग्लिश जणू दुसरी मातृभाषा ! अभ्यास आणि सर्व कामकाज इंग्लिश मधेच होते. ब्रिटिश लोकांनी राज्य केले तरी अनेक सुंदर गोष्टींचा मिलाफ आमच्या दोन्ही सौस्कृतींमध्ये आहे ! काही सुंदर खाण्या पिण्याच्या गोष्टी , भाषेची सरमिसळ , भारतातल्या पुरातन पण आजही मजबूत असणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारती इत्यादी !

सारांश म्हणजे , भारतात काम करणाऱ्या हुशार लोकांना इंग्लिश म्हणजे दुसरी मातृभाषा च ! आमचे युरोपातल्या लोकांसारखे नाही . आम्ही आमच्या प्रांतवार मातृभाषा अस्खलित बोलतोच , हिंदी आमची राष्ट्रभाषा आणि आणि इंग्रजी आता आमचीच झालेली आहे ! तरी भाषांचे हे नाते जोपासणे आणि फुलवणे याचा मला मूळातच छंद आहे. 

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८ १. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत. https://www.google...

Listed on: link directory