loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, September 14, 2009

नो कमेंट्स.....!!!!




....... आयुष्य म्हणजे फक्त अस चं , सुंदर, गुलाबी, रेशमी आणि मखमली नसतं. दरवेळी मोरपिसे अंगावरून फिर्व्व्ल्यासार्ख्खे अनुभव येत नित. कधी असा राग येतो या माणसांचा काय सांगू.. ! वैताग..वैताग नुसता. दरवेळी स्वार्थ, मात्लाबिप्ना. काय माझ काय दुसर्याच काय.. पाय खेचा , अडवणूक करा. ..........ईईईई.......! किळस कशी येत नाही त्यांची त्यांना. !!!!!
जग लाख सुंदर असेल हो; पण त्याच पावित्र्य हे लोक ठेवताच नाहीत . सगळीकडे नासधूस.. चिखल-फेक.. सगळ्या गोष्टीत राडा , किडे स्वतः निईत वागा; दुसर्याला हि वागू द्या.. ! सो सिम्पल ..! नाआआआआआआआअही.....

आम्ही किडे करणार, राजकारण ( हल्ली राजकारण या शब्दाचा अर्थ केवळ वाईट पद्धतीनेच घेतला जातो..! ) खेळणार. आमचा फायदा होवो न होवो आम्ही लोकच भले होऊ देणार नाही.. आणि जो चांगला वागेल त्याला त्याचा गळा आवळून त्याला मारणार. त्याला जगायचा हक्कच नाही ए चान्गुल्पनानी .. इथे काहीच सभ्य, सुसौस्कृत असताच नये.

माणूस माणूस राहिलाच नाही ए हेच खरे.. वैताग नाही चीड येते अशी भयंकर.. वाटते कोणीतरी सन्क्न मुस्काडात माराव्यात ..( माझा हात कोणाला लागणार नाही म्हणून दुसर्या कोणी तरी मारावे अश्यांना.. ) अशक्य..

याहून अधिक यावर काहीही बोलणे केवळ अशक्य अन्नी व्यर्थ देखील. कोण अंड कधी , कसा सुधरणार देव जाणे !!!!!

Thursday, September 10, 2009

"ऑफ़ीस"........


"ऑफ़ीस"........

काय येतं आज डोळ्यांसमोर ""ऑफ़ीस" म्हणल्यावर ...!! बहुतेकांच्या चेहेर्यावर आठ्या.. त्रस्त भाव. कधी एकदा तो रविवार येतो याकडे लागलेले डोळे..

तरुण सुकन्या घड्याळाकडे बघत राहिलेल्या दोन तासांपासून २ मिनिटांपर्यंत चा वेळ मोजतात.. मोबिईल वरच्या कॅलेंडरकडे बघत कधी सिहागड तर कधी तुळशीबागेचा प्रोग्राम ठरवतात. सगळ्या आई घरी जाऊन कोणती भाजी करायची आणि सकाळसाठी कोणती निवडायची याचा विचार करतात. मुंम्बापुरीच्या ट्रेन मध्ये भाजी निवडण्यापासून  घरकामाला सुरुवात होते.. अहो - रात्री  ८ ३० नंतर घरी पोहोचून काय-काय करणार..! पुरुष लोक वेळेवर घरी पोहोचता पोहोचता सामानाची यादी चाचपडत कधी सोसायटीच्या मीटींगला कसे पोहोचणार या लगबगीत असतात; तर कधी सकाळ च्या पेपरातल्या ठळक बातम्या का होईना पण रात्री वाचाव्यात असे मनसुबे करत घरी येतात.

उच्चशिक्षित अथवा श्रीमंतांचेही या घड्याळाच्या काट्यावर नाचणे चुकत नाही ... कधी पार्लर , कधी कींटी पार्टी , कधी हि न ती मीटींग- नांहींतर साल्साचे क्लास.. मग यात "ऑफ़ीस" म्हणजे रेमंड चे ब्लेझर , फोर्माल कपडे, रात्री च्या पार्ट्या , टार्गेट अचीव करण्यासाठी तारेवरची कसरत. कोण कधी "बेंच वर" येईल सांगता येत नाही !

"ऑफ़ीस" म्हणजे रात्रंदिवस समोरचे ते ड्बडे ( संगणक) , महीना-अखेर, राजकारण , ९-१२ तासांचे काम, जेवणाच्या वाट्टेल तश्या वेळा, कॅन्टीन मधले पीझ्झा-बर्गर आणि कोकच्या बाटल्या. गलेलठ्ठ पगाराच्या गलेलठ्ठ नोकर्या !

.......... तरीही.......का हरवल ए "ऑफ़ीस" ????? ....................................

चाळीतल्या सुमी ला नोकरी लागली म्हणून तिला बस खाम्ब्यावर सोडायला जाणारी कुमी  आणि "जपून जा गो पोरी ....." सांगणारे आण्णा आणि आप्पा आज हरवलेत ! कारकुनाची नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारा जयवंत आज हरवला ए.. "ऑफ़ीस" मधला चहा देणारा गणू आज हरवला ए..

बॉसची नजर चुकवत कोपर्यावरचा कटींग चहा घ्यायला पाळणारे राघव आणि त्याची चांडाळ-चौकडी आज हरवली ए. "गुड मोर्निंग-गुड आफ्टरनून "च्या नादात " देशपांड्या,पाध्या,टकल्या आणि कुसुम ताई " आज हरवल्याएत .. मंगळागौरीच आमंत्रण देणारी लांब वेणीतली वसुधा आणि खांद्या एवढे केस भूर-भुरात चालणारी गोखल्यांच्या वाड्यातली लतिका कुठेतरी हरवली ए.. कधीही हाक मारायला सैदैव मदतीला येणारा गल्लीतला उडाणटप्पू सद्दाम कुठेतरी हरवला ए.. गणपती चे कार्यक्रम बसवायला "ऑफ़ीस" नंतर जमणारा शीर्या, मंग्या आणि त्यांचा कंपू कुठेतरी हरवला ए..

साडे दहा ते साडेपाच काम करून दमून घरी येणारा मध्यमवर्गीय माणूस कुठतरी हरवला ए .. ४ रुपयांच्या तिकीट काढून बालगंधर्वला नाटक बघणारा एक कुटुंब-वत्सल माणूस कुठेतरी हरवला ए....

१२ तास काम करून मिळणाऱ्या ५०-७५ हजारांच्या बदल्यात कचेरीतले २०० रुपये आज हरवलेत.. केवढी मोठी किंमत .. !! आख्ख  "ऑफ़ीस" च हरवला ए.. !!

Sunday, September 6, 2009

"शांतता " ..

दूसरी पोस्ट या ब्लॉग वरची..लोक म्हणतील नवा ब्लॉग.. नीदान न्वाचे नौउं दीवस तरी अपडेट ठेवावा! पण नाही हो ; 'आयुष्यावर' लीहायच म्हणून लीहीता येत नाही.
कधी वाटते एक नीरव शांतता हवी.. गर्भ-रेशमी रात्रीसारखी.. शांत; पण हळुवार, मखमली ..!! कधी भर दुपारी देखील केवळ डोळे मीटून पु. लं. ची "Nilaee" अनुभवता यावी.. शांत.. खोल.. प्र्सन्न .. आल्हाददायक.. निलीशाआआआर ..! कधी मात्र ती असावी शांत, थंडगार, पवित्र.. अन्थाकारानाच्या आर-पार जाणारी.. घंटानादाने मंगलमय होणारी ..!! कधी स्नीगह्द.. बर्फाल्ललेली..
खोलीतल्या फुलदाणीतील फुले देखील कागदी भासवीत अशी.. जणू काही आयुष्याच्या कॅनवास वर फ़ीकट दगडी रंगाचा वश दिल्यासारखी.. !
शांतता.. निव्वळ शांतता म्हणावे आणी ही -न -ती कित्येक नाना-विविध रूपे दत्त म्हणून समोर उभी .. ! काही रूपे भीषण आणी अभद्र देखील.. !! एकांत हा शांततेचाच एक भाग. छोटे पिल्लू म्हणतात यावे असा! एकांतात असो-नसो ; पण आजकाल बहुदा सारे शांततेच्या शोधात असतात इतके मात्र नक्की.
शांतता " शोधा म्हणजे सापडेल " यानुसार आचरण करते असे माझे व्यक्तीशा म्हणणे आहे. काहींना शोधावी लागत च नाही .ती असतेच मुली त्यांच्याकडे. काहींना ती मिळवता येते. काहींना काळातच नाही आपण काय शोधात आहोत.. ! काहींना या शांततेचा गांध्मात्र ही नसतो .. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हनतात .. त्यामुळे बराच जणांना या शांततेच शोधच लागत नाही. काही लोक व्यर्थ घुटमळत राहतात; बाजारभावात शांतता शोधताना .. !! बिग बझार च्या सवलतीत बुधवारी एका वर एक फ्री मीळणारी ही गोष्ट नव्हे हे वीसरून .. ;)

................... असो .. मला नीदान कळले तरी .. शांतता शोधतय हो मी.. !

Thursday, September 3, 2009

आयुष्य .... !!

आयुष्य .... !!

आयुष्यावर आजवर खूप लोकांनी खूप काही लीहीले आहे. आयुष्य हे कोणाला समुद्रासारखे अथांग नीळेशार वाटले ; तर
कोणी आयुश्याला ऊन-पावसाचा खेळ म्हणले. कोणी तर आयुष्याला आपला गुरू मानले. कोणी मात्र आयुष्याला अगदी
दुतासारख्या जुगाराची उउप्मा दिली . पण कोणी त्यातूनही मखमली धाग्याने रेशमी-शेले वीणले.... आठवणींचे...!!
हे आहे माझे 'आयुष्य" .... आयुष्य माझ्या नजरेतून .. माझ्या शब्दांतून ..

जमल्यास आयुष्य काहीसे नव्याने जगण्यासाठी ... जमल्यास काही कोडी उलगडण्यासाठी .. खूप काही शीकण्यासाठी ...
आनंदातला आनंद खार्याने उपभोगण्यासाठी .. दुखाच्या फोडनीने काही क्षण चवीने चाखण्यासाठी ..

........... खर्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी .. !!

Our Partners Indiblogger

Different stages in my life.. lets connect like minded 😊

Hi everyone...!!!  It's really after long time writing on my blog.  I have gone through a considerable phases in my life where I have al...