Outdated झालाय आयुष्य,
स्वप्नही Download होत नाही
सौवेदानांना virus लागलाय,
दुखः send करता येत नाही...|
जुने पावसाळे उडून गेलेत
Delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असते
range नसलेल्या mobile सारखे |
हंग झालेल्या PC सारखी
मातीची स्थिती वाईट'
जाती-माती जोडणारी
कुठेच नाही वेबसाईट ..!
एकविसाव्या शतकातली
पिढी भलतीच cute
contact list वाढत गेली,
मात्र सौवाद झालेत mute ..|
कॉम्पुटर च्या चीप सारखा
माणूस मानाने झाली खुजा,
मोठेर नावाचा बोर्ड,
त्याच्या आयुष्यातून झालाय वजा|
Floppy Disk Drive मध्ये
सौस्कारांना जागा नाही,
फाटली माने साधणारा
इंटरनेट वर धागा नाही...|
विद्विज्ञाच्या गुलामगिरीत ,
केवढी मोठी चूक..
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते Facebook |
कवी - श्री. बबलू वडार ( कोल्हापूर )
सौजन्य - अमृत , मराठी मासिक , ( मे २०१२ ), नाशिक
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!