अनंत कामे असूनही आवर्जून लिहिण्यास वेळ काढावाच लागला. नैतिक जबाबदारी !
अनंत चतुर्दशी ! पुण्याचे गणपती विसर्जन ! लहानाची मोठी नारायण पेठेत
झालेल्या मला या सोहोळ्याचा अद्वितीय , भारावून टाकणारा अनुभव चांगलाच
माहित आहे , अनुभवात आहे.
सहा वर्षांपूर्वीचे गणपती
नारायण पेठेत असताना गणेश चतुर्थी ला कसबा गणपती ; जे आमच्या पुण्याचे ग्रामदैवत आणि मनाचे पहिले गणपती आहेत ; ते सकाळी आमच्या दारावरून जात. हमाल वाड्यातून बाहेर निघून कोणीतरी बसावयास जागा पकडून ठेवीत. मग मी , माझही आते-चुलत भावंड , गल्लीतले मित्र मैत्रिणी, आम्ही तेथे जाऊन बसत असू. घरचे गणपती बसल्या नंतर ! दुपारी ४ - ४: ३० पर्यंत बसून मनाचे गणपती , रांगोळ्यांच्या पायघड्या , ढोल-तश्या नची पथके बघित आम्ही घरी येत. मग बाहेरगावचे नातेवाईक मुन्जोबाच्या बोलाच्या येथून मुख्य रस्त्याला काही वेळ मिरवणूक बघित. काहीतरी चटक-मटक भेल वगरे खून ते रवाना होत. आम्ही गणपती बघण्यासाठी १० दिवस फिरत असू. गौरी असल्याने गौरींचे आगमन, जेवण , हळदीकुंकू यातच इतके मोट्ठे काहीसे वाटत असे; कि बस! आमच्यासाठी ते सारे दिवाळीपेक्षा अंड दायी , सुखावह. गौरींचे विसर्जन झाल्यान्नात्र मात्र रात्री भटकायचे ! एकदा शाळेत असताना ( हाय स्कूल मध्ये बर का ) १४ लोकांचा चमू जुळला. रात्री १ वाजता गंधर्व हॉटेल मध्ये साग्रसंगीत पंजाबी दिश घेऊन जेवण केल्याचे आठविते. एकदा माझ्या आते बहिणी बरोबर भाताक्ल्याचे आठविते. कोपर्यावर च्या गाड्यांवर १० रुपयात झकास SPDP वगरे हनली; रात्रौ १२ ३० चे सुमारास. बाबांबरोबर गणपती बघणे ; याची वर्णने करता येणार नाहीत. हत्ती गणपती, बाबू गेनू, हिराबाग विशेष. टिळक वाद्याचा गणपती आधी होत. तेव्हाही तेथील सौस्कृतिक कार्यक्रम बघण्यास आम्ही आवर्जून जात असू. आभाळमाया जोरात चालू असताना सुकन्या कुलकर्णी , संजय मोने यांना बोलाविले होते. मजा ! पत्र्या मारुती च्या स्पर्धेत माझह धाकटा भाऊ लिंबू-चाचा मध्ये जिंकला. मात्र मागून हि बिचार्याला बक्षीस सुपूर्त करण्यात आले नाही. :)) आणि अनंत चातृर्दशीला साश्रू नयनांनी आम्ही आमच्या गणपतींचे विसर्जन करून मग नातेवैकांसह लक्षुमी रोड ला जात असू. आमचा केबल वाला , व्हीनस केबल ... त्याच्या कामेर्याचा शोध लागला कि तेथे उभे रहावयास मिळत. तेव्हा केबल २५०-३०० रुपये महिना असे. माझ्या चुलत बहिणीच्या मैत्रिणी मलाही नेत बरोबर. त्या त्या असत. मी लहान मुलगी. म्हणजे दोघेही उत्साही ! दगडूशेठ च्या रथाप्र्यंत कडे कडेने जाऊन परत यावयाचे. आणि पाहते साडेतीन वाजता दग्दुषेत आमच्या घरासमोर , लक्ष्मी रोड वर येत . केबल वर बघायचे. आणि मग समोर जाऊन दर्शन घ्यावयाचे. :) या सार्यांमध्ये आमच्या शेजारच्या शेजारचा वाडा झकास होता. बिल्डींग झाली असली तरी तो वडाच! त्यांचा गणपती असे सोसायटीचा. सभासद चांगले सगळे. मुले- मुलीही उत्साही. त्यातली एक जन माझ्या शाळेत मला जुनियर. हाय - बाय चालत. " सगळ्यांनी आरतीला चला SSSSSSSSSSSSS " हे त्यांच्या वाड्यात रोज रात्री घुमणारे नित्याचे सूर. काय आरत्या होत ! झकास !
२०१२ चे गणपती:
आता आम्ही पेठ सोडून ६ वर्षे झाली. शांतता! श्रींचे विसर्जन येथे चार चाकीतून होते. प्रेम कमी नाही हो! " सगळ्यांनी आरतीला चला SSSSSSSSSSSSS " हे पालुपद मी स्वतः माझ्या घरात आजवर चालू ठेवले आहे. विसरल्यास आमचे बंधुराज आवर्जून सांगतात , " केतकी , जरा आवाज दे बर तुझा ! " :)) गणपती बघायला आम्ही गेलो कि या वर्षी. मैत्रिणी आणि परिवार. आवर्जून खरे नमूद करीत आहे.