एकदा येन - तेन निमित्त्यानं महिला मंडळाच्या गप्पा कानावर पडल्या.
मजेशीर आणि माझ्यातल अभ्यासू कुतूहल जाग्या करणाऱ्या ! गूण आला नाही म्हणून डॉकटर बदलणाऱ्या
; पण गुरुजी आणि ज्योतिषांच्या नियमित वाऱ्या करणाऱ्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या लोकांचे
प्रतिनिधित्व करणाऱ्या ! भारी ए नाही !
विषय गंभीर आहे. प्रत्येक
कॉमन मॅन ला वाटते, आपला कस सुरळीत व्हावं. शिक्षण , नोकरी , पैसे , घर , लग्न , पोरं
इति. मग मनासारखे काहीही घडत नाही , अडथळे येतात किंवा विलंब होतो तेव्हा समस्या निर्मिती
होते. थोडक्यात काय , मनासारखे न घडणे म्हणजे समस्या ! इथे सारेच काही कागदावरच्या
रेषेसारखे सरळ नसते , आपलं आणि इतरांचे आयुष्य वेगळे असू शकते हे मान्य करण्याचीच मनाची
तयारी नसते ! मग होते ते “दुःख” ! एखाद्या समस्येवर मार्ग काढणे हे मग सुचतच नाही
! कारण , डायरेकट किंवा इन्डायरेकट तुम्ही सफर होत असता. साधे उदाहरण , शारीरिक क्षमता
कमी झाल्याने साध्या सर्दी -खोकला -तापातही नेहमी इतके १००% जोमाने तुम्ही काम करू
शकत नाही. काही माणसे काम करणारच नाहीत , काही उशिराने सुरु करतील , काही रेटून नेतील
" कुछ नही होता " म्हणून ! तरी , एखाद्या समस्येला / प्रसंगाला तुम्ही कशा
पद्धतीने बघता , कशा पद्धतीने हाताळता या गोष्टी अनेक मुद्दांवर अवलंबून असतात. कोणत्याही
समस्येत तुम्ही असाल तरी ह्याचे “मॉडेल” असेच असते. शारीरिक , बौद्धिक , मानसिक , भावनिक , सामाजिक , आर्थिक मुद्दे इथे
महत्वाचे ठरतात. तुमचे मूळचे व्यक्तिमत्व आणि
स्वभाव तर यात अत्यंत महत्वाचा ! मग विशिष्ट परिस्थिती मध्ये तुम्ही कसे वागता , हे
तुमच्यासाठी योग्य असते. परंतु साऱ्यांनाच हे योग्य वाटत नाही. कारण , त्यांची विचारसरणी
आधी नमूद केलेल्या मुद्द्यांना धरून त्यांच्यासाठी योग्य अशी असते .
सेविंग्ज मध्ये १२
लाख असणारा माणूस घेईल ती आर्थिक रिस्क २ लाख सेविंग्ज वाला घेऊ शकणार नाही. डिहायड्रेशन
जास्त होतंय हे वेळीच लक्षात येऊन डॉकटर दाम्पत्य घरीच एक बाटली सलाईन आणि औषधे घेऊन, २ तासात टुणटुणीत होऊन संध्याकाळी ओपीडी ला बसेल
(माझ्या डॉकटर आत्या - काकांकडे हे बघून मला हे "used to" झालंय !!! ) पण
म्हणून मेडिकल बॅकग्राउंड नसलेल्या माणसाने वरून पाणी पिऊन अंगावर काढले तर हे जीवावरच
बेतणार ! तर , समस्या कोणत्याही असोत - " मॉडेल " हे आणि असच असत.